गुरुवार, ३० जून, २०१६

RELATIONSHIP... never DIES a NATURAL DEATH but.....



आज जवळच्याच त्याच्या कुणा एकाने असा स्टेटस अपडेट केला..अन राहवलं नाही . 
म्हणून तो ही भरभर लिहत सुटला.
RELATIONSHIP... never DIES a NATURAL DEATH but MURDERED by EGO, ATTITUDE and IGNORANCE.

तू म्हणतेयस ते खरंय रे ...
पण ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत ,
आधी नातं म्हणजे काय ? आणि नात्यातला मूळ गाभा काय ?
हे आपण समजून घेतलं पाहिजे नाही का ?
ते समजलं , की ह्या अश्या गोष्टी उध्दभवनारच नाही.
आपण नाती निर्माण करतो. (आपण म्हणजे सगळेच ग )निर्माण करतो म्हणजे नकळतच ती गुंफली जातात. 
पण काहीवेळा त्यातला मूळ गाभा अंधारातच ठेवून.

मुळात हे नातं म्हणजे तरी काय असतं रे ? तर
'दोन मनाच्या सात्विक भावसुरातून एकत्रित जुळलेली वीण म्हणजेच नातं '
'आपुलकी अन प्रेमानं बांधली गेलेली विश्वसनीय दोरं म्हणजेच नातं.'
हे ना ?
पण तीच दोर कुठेशी ढिली पडते रे .. कारण काय तर 'वेळ ' 
आपण ना, खरं तर एकेमेकांना पुरेसं वेळच देत नाही बघ.. .
एकमेकांना जाणून समजून घेण्यासाठी, एकमेकांच्या उणीवा, आवडी निवडी वा कलागुण वा जे काही प्रश्न समस्या असतील त्याच्या मुळाशी जाण्यासाठी....
आपले कष्ट कुठेशी कमी पडतात. 

आणि तिथेच खरी फसगत होते आपली. आपल्यातील आडमूठपणाची .
आपण फक्त वरवरचा शोध लावतो. 
तर्क वितर्क लावून नात्याची तर पार अवहेलनाच करतो. 
आणि मग एकमेकांना दोष देत सुटतो.
खर तर नातं हे एकमेकांच्या सहवासातून आणि समंजस वाणितूंन उमलतं, फुलतं.
पण आपण ना तेच होवू देत नाही.
नात्यात महत्वाची असते ती वेळ रे ...
योग्य वेळी योग्य तेंव्हा योग्य क्षण पाहून साधली गेलेली .
ही वेळ जुळवता आली ना की मग बघ सगळच सुरळीत
...
बघ तुला ही... ती वेळ देता येते का ....साधता येते का ?
असंच काहीस सुचलेलं .
~संकेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .