Thursday, April 30, 2015

'संवाद' हरवलेलं नातं ...

खूप काही लिहूस वाटतंय आज ? कारण हे मनं ,  फारच अस्वस्थ झालंय .
हळवं झालंय ते ,  'कारण 'संवाद'  हरवला आहे'.
बंध नात्यातला आपलेपणाचा 'संवाद'

कुठे दिसला का हो , तो ?
नाही ? नाही ना.....  ?
कुठेसा  निघून गेला आहे बघा   ... दूर कुठे , नाराज होवून माझ्यावर ...
कसं शोधावं अन कसं परत आणावं  त्याला  ? काही काही .... कळेना.
तुम्ही सांगू शकाल का ?
नाही.................असो,

आयुष्याची सगळी बहरच निघून गेलेय आता,
सगळे रंगच  जणू  धुसर झालेत  ,   रखरखत्या उन्हासारखं  अगदी...कालपटलेलं  जगण झालंय हे.
नाही राहवत आता..

तू हवा आहेस रे , खरचं  तू  हवा आहेस.
तुझ्याविना  ह्या नात्याला गंध नाही ..आपलेपणाचा स्वर  नाही,  चैतन्याचा बहार  नाही .
हास्य रंगाची  ती मुक्त उधळण  हरवलेय रे , तुझ्याविना . . .,

कुठे आहेस  तू , कुठे आहेस ?
सांगशील का ? बोल ना  काहीतरी...,

येशील  माघारी....  ..येशील  ...  ? बघ नाराज  नको होऊ असा ..
मला हवा आहेस  रे.......हवा आहेस तू...

मनाचे असे पुटपुटने सुरु होते . शब्द शब्दांची कागदावर  रीघ लागली होती.
भाऊक होवून ते स्वतःला त्यावर झोकु देत होते.

इतकं  वर्ष जीवापाड जपलेल्या नांत्यातला  मधाळपणा  , 'एकाकी कुठे  आणि  कसा   हरपला  कुणास ठाऊक , मनं  अगदी सैरभैर झालंय . अस्वस्थ होवून बसलंय आणि होणारच हो ,

जीवापाड जपलेल्या नात्यातला,  आपलेपणाचा गोड संवादच कुठेसा हरपला  म्हणजे मन असंच  सैरभैर होणार ,  नाही का ? .घुटमळनारचं  ते  मनातल्या मनात .

किती विश्वासाने नाती जोडतो आपण ? कितीशी स्वप्न बघतो . त्यात  हरखून जातो अगदी..
पण एकाकी......

विश्वासाची हि नाती , आपलेपणाची  साथ  कशी काय सोडतात, कळत नाही ?
त्याचा घाव मात्र झेलावा लागतो . ह्या इथे.... हृदयी...!
असो,

खूप काही विचार केला ह्या गोष्टीचा   , रात्रंदिवस अगदी..
मी चुकलो का, कुठे ? ते हि शोधून पाहिलं. कित्येक प्रश्नाचा संच पुढे मांडला .

तेंव्हा कुठे ऊतर आलं समोरून ...

तू कुठेच चुकत नाहीस रे , परिस्थितीनेच  मला बदललय.  

मी अगदीच सुन्न ...

परिस्थिती...,

हि परिस्थिती सुद्धा  अजब असते. खरच  बदल घडवते माणसा- माणसात..., त्याच्या विचारंना वेगळ्या वळणावर स्वार करते ती  .. स्वतःच्या निर्णयावर ठाम राहून ...
पण नाती..., त्याच काय ...?

आपलेपणाने जुळलेल्या नात्यात 'दूरत्व' का बरं  यावं.  ? ते हि त्या परिस्थितीमुळे .  ?
परिस्थितीमुळे एखाद नात्यात बदल घडू शकतो ?
छे ...पुन्हा प्रश्न ..

पण ह्याच उत्तर अजूनही काही सापडलं नाही . कित्येक दिवस ओलांडली . वर्ष निघून गेली .
नात्यातला  'संवाद'च हरवला आहे.  आता ते नुसतंच नातं उरल आहे. संवाद हरवलेलं नातं .
त्यात जाणीवा उरल्या  नाहीत .
एखाद्या कोमात गेलेल्या आणि संवेदना हरवलेल्या  व्यक्ती सारखंच  जणू  ..
जगण्यापुरता  श्वावोश्वास  काय तो सुरु आहे  ..बाकी आयुष्यातील  सारे रंग फिके ...

ह्यास जबाबदार कोण ? मी ? समोरील व्यक्ती ? कि हि परिश्तीती ? कि हा स्वार्थ ?
नाही   सांगता येणार मला, . सध्यातरी…
आणि आणि दोष हि कुणाला द्यायचा नाही आहे..
पण हरवलेला  तो 'संवाद'  मला पुन्हा आणावयाचा आहे.
नात्यातली ती  'बहरता  ' कायम ठेवायची आहे.
हास्य विनोदाचा, भरल्या प्रेमाचा , आपलेपणाचा गोड  संवाद हवाय मला.
त्याचसाठीच हि धडपड.
ऐकतेस का तू...
मला संवाद हवाय …आपलेपणाचा… प्रेमानं साधलेला. 
ऐकतेस ना...
संवाद हरवलेल्या नात्याची,  एका मनाची अशी हि अवस्था…

आपलं प्रत्येकाचं  आयुष्यं  तसं ह्या अनेकानेक नात्यांनी गुंफलंय.
मग ती रक्ताची नाती  असतील,  काही आपुलकीनं जोडलेली  ,   मना मनाची .
त्यात आई मुलाचं नातं असेल  , बहिण भावाचं असेल,  प्रियकर प्रेयाशीच असेल  , वा नवरा बायकोच .
ह्या सर्वांना एकसंध ठेवणारा , किंव्हा जोडणारा एक महत्वाचा दुवा म्हणजे हा  'संवाद'  .

नात्यातला मुख्य गाभा, तो नसेल तर नात्याला अर्थ नाही .
नाहीतर एखाद्या पर्णगळीत वृक्षासारखं ...भकास पण आलेलं ते नातं वाटायचं.
त्यातला हिरवा शारपणा जरा कायम  टिकून ठेवायचं असेल .  तर संवाद हवा .
पण नुसता संवाद  काही  उपयोगाचा नाही    ,  सुसंवाद हि हवा.

आपलेपणाचे , आपुलकीने म्हटलेलं  चार एक शब्द  मनाला खूप आधार देऊन जातात हो  . 
नवं काही करण्याची अन जगण्याची  नवी उमेद त्या स्वरातूनच   तर मिळते .  अन हेच तर  हवं असत आपल्याला.  
मनमोकळेपणाचे  आपलेपणाने म्हटलेलं गोड मधाळ शब्द . 
त्यात कधी , एखाद वेळेस उफालेला राग हि मग येवो , आपलेपणाचा  सूर  त्यात  असला म्हणजे त्याच काही वाटत नाही उलट   मनास समाधान लाभतं. आपल्या पाठीशी कुणी उभं आहे.  

जीवनात सर्व काही सहज सोप आहे . 
फक्त जीवापाड जपलेली आपलेपणाची,  आपली हि नाती आपल्या सोबत  असली म्हणजे झालं. 
हे आयुष्य उजळून निघेल . पण त्यासाठी संवाद हवा आपलेपणाचा…

तुमच्या नात्यात तो आहे ना ? असेल तर उत्तमच  , अन असू द्याच तो कायम , दरवळता….

नाती हि खरच अनमोल असतात ओ,  अन हा अनमोलपणा  प्रत्येकाला  जपायला हवा .

शेवटी  मनापासून म्हणावेस वाटतं  , कि…

‘संवाद’ हरवलेलं नातं नको... ‘संवादा’त हरवलेलं नातं हवं. 
… आपलेपणाचं..!

असंच लिहता लिहिता  ,
आपलाच ,
संकेत पाटेकर उर्फ संकु
३०.०४.२०१५

8 comments:

 1. आपला अमुल्य असा वेळ साधून ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल ...
  मनापसून धन्यवाद ..!

  ReplyDelete
 2. आपला अमुल्य असा वेळ साधून ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल ...
  मनापसून धन्यवाद ..!

  ReplyDelete
 3. आपला अमुल्य असा वेळ साधून ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल ...
  मनापसून धन्यवाद ..!

  ReplyDelete
 4. नातं आणि गाणं अगदी एकमेकांसारखे असतात, हव्या तेवढ्या, नेमक्या अंतरावर असणं म्हणजे सूर,
  त्यापेक्षा जास्त किंवा कमी अंतरावर असणं म्हणजे दूर...

  खूप छान लिहिता तुम्ही

  ReplyDelete

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .