गुरुवार, ३० एप्रिल, २०१५

'संवाद' हरवलेलं नातं ...

खूप काही लिहूस वाटतंय आज ? कारण हे मनं ,  फारच अस्वस्थ झालंय .
हळवं झालंय ते ,  'कारण 'संवाद'  हरवला आहे'.
बंध नात्यातला आपलेपणाचा 'संवाद'

कुठे दिसला का हो , तो ?
नाही ? नाही ना.....  ?
कुठेसा  निघून गेला आहे बघा   ... दूर कुठे , नाराज होवून माझ्यावर ...
कसं शोधावं अन कसं परत आणावं  त्याला  ? काही काही .... कळेना.
तुम्ही सांगू शकाल का ?
नाही.................असो,

आयुष्याची सगळी बहरच निघून गेलेय आता,
सगळे रंगच  जणू  धुसर झालेत  ,   रखरखत्या उन्हासारखं  अगदी...कालपटलेलं  जगण झालंय हे.
नाही राहवत आता..

तू हवा आहेस रे , खरचं  तू  हवा आहेस.
तुझ्याविना  ह्या नात्याला गंध नाही ..आपलेपणाचा स्वर  नाही,  चैतन्याचा बहार  नाही .
हास्य रंगाची  ती मुक्त उधळण  हरवलेय रे , तुझ्याविना . . .,

कुठे आहेस  तू , कुठे आहेस ?
सांगशील का ? बोल ना  काहीतरी...,

येशील  माघारी....  ..येशील  ...  ? बघ नाराज  नको होऊ असा ..
मला हवा आहेस  रे.......हवा आहेस तू...

मनाचे असे पुटपुटने सुरु होते . शब्द शब्दांची कागदावर  रीघ लागली होती.
भाऊक होवून ते स्वतःला त्यावर झोकु देत होते.

इतकं  वर्ष जीवापाड जपलेल्या नांत्यातला  मधाळपणा  , 'एकाकी कुठे  आणि  कसा   हरपला  कुणास ठाऊक , मनं  अगदी सैरभैर झालंय . अस्वस्थ होवून बसलंय आणि होणारच हो ,

जीवापाड जपलेल्या नात्यातला,  आपलेपणाचा गोड संवादच कुठेसा हरपला  म्हणजे मन असंच  सैरभैर होणार ,  नाही का ? .घुटमळनारचं  ते  मनातल्या मनात .

किती विश्वासाने नाती जोडतो आपण ? कितीशी स्वप्न बघतो . त्यात  हरखून जातो अगदी..
पण एकाकी......

विश्वासाची हि नाती , आपलेपणाची  साथ  कशी काय सोडतात, कळत नाही ?
त्याचा घाव मात्र झेलावा लागतो . ह्या इथे.... हृदयी...!
असो,

खूप काही विचार केला ह्या गोष्टीचा   , रात्रंदिवस अगदी..
मी चुकलो का, कुठे ? ते हि शोधून पाहिलं. कित्येक प्रश्नाचा संच पुढे मांडला .

तेंव्हा कुठे ऊतर आलं समोरून ...

तू कुठेच चुकत नाहीस रे , परिस्थितीनेच  मला बदललय.  

मी अगदीच सुन्न ...

परिस्थिती...,

हि परिस्थिती सुद्धा  अजब असते. खरच  बदल घडवते माणसा- माणसात..., त्याच्या विचारंना वेगळ्या वळणावर स्वार करते ती  .. स्वतःच्या निर्णयावर ठाम राहून ...
पण नाती..., त्याच काय ...?

आपलेपणाने जुळलेल्या नात्यात 'दूरत्व' का बरं  यावं.  ? ते हि त्या परिस्थितीमुळे .  ?
परिस्थितीमुळे एखाद नात्यात बदल घडू शकतो ?
छे ...पुन्हा प्रश्न ..

पण ह्याच उत्तर अजूनही काही सापडलं नाही . कित्येक दिवस ओलांडली . वर्ष निघून गेली .
नात्यातला  'संवाद'च हरवला आहे.  आता ते नुसतंच नातं उरल आहे. संवाद हरवलेलं नातं .
त्यात जाणीवा उरल्या  नाहीत .
एखाद्या कोमात गेलेल्या आणि संवेदना हरवलेल्या  व्यक्ती सारखंच  जणू  ..
जगण्यापुरता  श्वावोश्वास  काय तो सुरु आहे  ..बाकी आयुष्यातील  सारे रंग फिके ...

ह्यास जबाबदार कोण ? मी ? समोरील व्यक्ती ? कि हि परिश्तीती ? कि हा स्वार्थ ?
नाही   सांगता येणार मला, . सध्यातरी…
आणि आणि दोष हि कुणाला द्यायचा नाही आहे..
पण हरवलेला  तो 'संवाद'  मला पुन्हा आणावयाचा आहे.
नात्यातली ती  'बहरता  ' कायम ठेवायची आहे.
हास्य विनोदाचा, भरल्या प्रेमाचा , आपलेपणाचा गोड  संवाद हवाय मला.
त्याचसाठीच हि धडपड.
ऐकतेस का तू...
मला संवाद हवाय …आपलेपणाचा… प्रेमानं साधलेला. 
ऐकतेस ना...
संवाद हरवलेल्या नात्याची,  एका मनाची अशी हि अवस्था…

आपलं प्रत्येकाचं  आयुष्यं  तसं ह्या अनेकानेक नात्यांनी गुंफलंय.
मग ती रक्ताची नाती  असतील,  काही आपुलकीनं जोडलेली  ,   मना मनाची .
त्यात आई मुलाचं नातं असेल  , बहिण भावाचं असेल,  प्रियकर प्रेयाशीच असेल  , वा नवरा बायकोच .
ह्या सर्वांना एकसंध ठेवणारा , किंव्हा जोडणारा एक महत्वाचा दुवा म्हणजे हा  'संवाद'  .

नात्यातला मुख्य गाभा, तो नसेल तर नात्याला अर्थ नाही .
नाहीतर एखाद्या पर्णगळीत वृक्षासारखं ...भकास पण आलेलं ते नातं वाटायचं.
त्यातला हिरवा शारपणा जरा कायम  टिकून ठेवायचं असेल .  तर संवाद हवा .
पण नुसता संवाद  काही  उपयोगाचा नाही    ,  सुसंवाद हि हवा.

आपलेपणाचे , आपुलकीने म्हटलेलं  चार एक शब्द  मनाला खूप आधार देऊन जातात हो  . 
नवं काही करण्याची अन जगण्याची  नवी उमेद त्या स्वरातूनच   तर मिळते .  अन हेच तर  हवं असत आपल्याला.  
मनमोकळेपणाचे  आपलेपणाने म्हटलेलं गोड मधाळ शब्द . 
त्यात कधी , एखाद वेळेस उफालेला राग हि मग येवो , आपलेपणाचा  सूर  त्यात  असला म्हणजे त्याच काही वाटत नाही उलट   मनास समाधान लाभतं. आपल्या पाठीशी कुणी उभं आहे.  

जीवनात सर्व काही सहज सोप आहे . 
फक्त जीवापाड जपलेली आपलेपणाची,  आपली हि नाती आपल्या सोबत  असली म्हणजे झालं. 
हे आयुष्य उजळून निघेल . पण त्यासाठी संवाद हवा आपलेपणाचा…

तुमच्या नात्यात तो आहे ना ? असेल तर उत्तमच  , अन असू द्याच तो कायम , दरवळता….

नाती हि खरच अनमोल असतात ओ,  अन हा अनमोलपणा  प्रत्येकाला  जपायला हवा .

शेवटी  मनापासून म्हणावेस वाटतं  , कि…

‘संवाद’ हरवलेलं नातं नको... ‘संवादा’त हरवलेलं नातं हवं. 
… आपलेपणाचं..!

असंच लिहता लिहिता  ,
आपलाच ,
संकेत पाटेकर उर्फ संकु
३०.०४.२०१५

शनिवार, २५ एप्रिल, २०१५

' नातं' तुटत नाही , तुटतात ती ' मनं'

'नातं' तुटत नाही , तुटतात ती ' मनं' 
अन ती पुन्हा जुळवायला कधी वेळ हवा असतो तर कधी प्रेमाची हलकीशी थाप , अन आपुलकीचे काही उबदार प्रेमळ शब्द ... 
कितीही वाद विवाद झाले , रुसवे फुगवे झाले तरी प्रेमाचा एक हलकासा शब्द...
एक हलकसा स्पर्श ' मनातला' सारा राग क्षणात विसरून लावतं.  म्हणून प्रेमाशिवाय नातं नाही . 
अन नात्यांशिवाय प्रेम ....
प्रेम जिथे नातं तिथे .... 
 संकेत य पाटेकर 
४.१२.२०१३

अपेक्षांचं लहान मोठं भार..


कुणी रागावतं , कुणी बोलणं बंद करतं, कुणी रुसून बसतं. तर कुणी अगदी जुळलेल नातं तोडण्याच्या मागे पडतं. नाही नाही म्हणता म्हणता प्रत्येकाची आपल्याकडनं अन आपली समोरच्याकडनं  काही ना काही अपेक्षा हि असतेच. 
अन म्हणून रागावणं , रुसणं , ह्या सारख्या गोष्टी घडतच असतात. 
कुणाला आपलं वागणं पटत नसतं , कुणाला आपला चेहरा मोहरा पसंद नसतो.
कुणीकडे आपला स्वभाव नडत असतो, तर कुणाला प्रेमभरल्या मायेची अपेक्षा असते.
पण त्याची पूर्तता होत नसते, कुणाची काही औरच मागणी असते ती पुरी होत नसते , ह्या त्या कारणास्तव अपेक्षांचं लहान मोठं भार आपल्या मनावर थोड्या अधिक प्रमाणात तरी असतच असतं .
आणि ते आपण आपल्या परीने पूर्ण करण्याचा काटोकाट प्रयत्न करत असतो .
व्यक्तीव्यक्ती नुसार ..
मनातले काही ...
संकेत य पाटेकर
१८.०६.२०१४

शनिवार, १८ एप्रिल, २०१५

वपु .. माझे आवडते लेखक ..

वसंत पुरुषोत्तम काळे
वपु ..हे माझे सर्वात आवडते लेखक ..
आज ते हयात असते तर खरच नक्कीच भेट घेतली असती त्यांची.
त्यांच्यामुळे मला माणसातला माणूस शोधण्याच तंत्र गवसलं अस मी म्हणेन .
ती सुरवात हि मी माझ्यापासूनच केली आहे म्हणा, मी हि माणूस शोधतोय ....
स्वतःमधला , दडलेला माणूस , अन आयुष्याच्या ह्या प्रवास वाटेवर येणाऱ्या प्रत्येकामध्ये ...तो शोध घेण्याचा प्रयत्न करतोय ..
वपुंच्याच शब्दात सांगायचं तर ...
माणूस नावाचा प्राणी अनेकदा भेटला.
ना ना स्वरूपात भेटला , कधी खऱ्या स्वरूपात कधी खोट्या ,
तर कधी संपूर्ण स्वरुपात, पुष्कळदा तो निसटला हि , ह्या माणसानं कधी मला रडवलं कधी हसवलं , कधी भुलवलं कधी थकवलं , कधी बैचेनं केलं..कधी अंतर्मुख ..
तरीही माझा शोध चालूच आहे, अन चालूच राहणार ..माझा पेशन्स दांडगा आहे.
ह्याच श्रेय हि पुन्हा माणसांनाच आहे.
वाट पाहत राहण्याची माझी ताकद माणसांनीच वाढवली आहे.
साधारण ६-७ वर्षापूर्वी ठाण्यातल्या मराठी ग्रंथालयाचा मी सभासद झालो. अन तिथपासून खऱ्या अर्थाने वाचनाला सुरवात झाली . मित्रानी (जगदीश शेट्ये ) पाहिलं पुस्तकं हाती ठेवलं ते म्हणजे व्यक्ती अन वल्ली . पु . ल देशपांडे ह्याचं ..
तिथून पुढे मग.. , वि. स. खांडेकर , प्रवीण दवणे ह्यांनी वेड लावलं.
प्रवीण दवणे सरांच्या व्याख्यानाला जावू लागलो. भारावल्या अवस्थेत त्यांच्या व्याख्यानातून बाहेर पडत होतो. एकदा असाच एका पुस्तक मध्ये , त्यांनी पत्राविषयी लिहिलं होतं.
हल्ली ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पत्र सहसा कुणी लिहत नाही .
त्यातच माझ्या मित्राने त्यानां पत्र लिहिलं.  त्याच उत्तर हि पंधरा एक दिवसातच  त्यांच्या पत्रातून त्याला मिळालं .
ते पाहून वाचून त्याचा बोलण्यातून व्यक्त झालेला,  त्याचा तो 'ओसंडता आनंद' मी  हि उपभोगत होतो .
तेंव्हा मी हि मनाशी ठरवलं . आपणही पत्र लिहायचं .
मी  सुरवात केली .पेन हाती घेतला . अन भरभर मनातलं उतरून काढलं .
अन ते पोस्टाने न टाकता. थेट त्यांच्या घरीच जावून दिलं.
त्यावेळेस ते मात्र घरी न्हवते .
त्यानंतर पंधरा एक दिवस ओलांडून गेले . त्याचं उत्तर काही आले नाही.
तेंव्हा मन थोडसं  काळवंडल. तरीही अशा सुटली नाही.
येईल उत्तर एक ना एक दिवस ह्यातच गढून राहिलो. .
आणि खरच ..एका महिन्या नंतर त्याचं सुवाच्च हस्ताक्षरात लिहिलेलं पत्र हाती आलं.
दिलगिरी व्यक्त करत...थोड उशिराने ऊतर देतोय म्हणून ...
तेंव्हाचा आनंद काही औरच होता. इवढ्या मोठ्या लेखकाने माझ्या पत्राला उत्तर दिलं . ह्यातच किती ते सुख होतं . मी ते पत्र सर्वांना दाखवत सुटलो . आनंद कसा गगनी मावेनासा झाला होता.
त्यानंतर वपुंच एक पुस्तक हाती आलं . आणि त्यांच्या लेखणीने मी अक्षरशा झपाटून गेलो.
अधाशासारखी एक एक पुस्तकं त्यांची वाचून काढली.
आपण सारे अर्जुन ,
इन्टिमेट , का रे भुललासी ,
गुलमोहर ,
गोष्ट हातातली होती,
घर हलवलेली माणसे ,
चिअर्स ,
तू भ्रमत आहासी वाया ,
दुनिया तुला विसरेल ,
दोस्त, पाणपोई , पार्टनर ,
प्लेझर बाँक्स,
फॅन्टसी - एक प्रेयसी ,
भुलभुलैय्या, महोत्सव , माझं माझ्यापाशी
मी माणूस शोधतोय , मोडेन पण वाकणार नाही
ही वाट एकटीची ..अशी एक एक पुस्तकांनी माझ्या मनावर छाप उमटवली .
त्याचा मनावर परिणाम झाला. .. माणसं निरखता येऊ लागली.
वपुंची वाक्य अन वाक्य मनावर कोरली गेली.
समाजात विशिष्ट उंची गाठे पर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.
जबाबदारी...
?जबाबदारी आणि ओझं, ह्यातला नेमका फरक सांगाल??
"ओझं म्हणजे खांद्यावर दिलेला बोजा. पण कधीकधी दहा-बारा हजारांचा एखादा
दागिना सांभाळायचा असतॊ. ते इतरांनाही माहित नसतं. त्याला जबाबदारी म्हणतात. आयुष्यापासून मघाशी मी सांगितलेली यादी.."
"प्रेम, मैत्री, संगोपण, शुश्रूषा ह्या सगळ्या जबाबदारया.
त्यांचं ओझं वाटलं की सहजता गेली."
"ओझं हीदेखील जबाबदारी नसते का?"
"ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते.
ओझं बाळगणारयाला कदाचित मदतीचा हात मिळतो. तसं जबाबदारीचं नसतं."
“एकाकीपण वेगळं , एकांत वेगळा . परीसराचं मौन म्हणजे एकांत .आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण .एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं. अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला असेल.”
अशी कितीतरी वाक्य आहेत . ..सांगायला गेलं तर हे पान हि  अपूरं पडेल. त्यापेक्षा तुम्ही वाचाच ...हाती पुस्तक घेऊन smile emoticon
माझे सर्वात आवडते लेखक ..वपु ..
- संकेत पाटेकर


बुधवार, १ एप्रिल, २०१५

असंच लिहिता लिहिता ...

वाऱ्याची एखादी हळुवार झुळूक क्षणभर सुखद गारवा देऊन जाते ना , तसेच काहीसे हे 'क्षण' असतात 
आपल्या आयुष्यातले...
हळुवार  कधी  कुठून,  गुपचूप  संधी साधून येतात अन तना  मनात रोमांच फुलवून जातात . 

मनी आसुसलेल्या  अपेक्षांची हि   पूर्तता  होवूनी जाते मग , सुखावून जातो अगदी त्या क्षणात आपण.

सुखाची एक व्याख्या तयार होते हळूहळू .. .
आनंदाच्या  परमोच्च शिखरावर ताठ मानेने , अभिमामाने आपण विराजमान होतो.
बेन्धुंद होतो बेभान होतो अगदी...

पण हे सगळ क्षणभर  ..क्षणभरच  सगळ...
वाऱ्याची झुळूक तेवढ्यापुरतीच  असते नाही का ? 
पुन्हा ती , कधी कुठून , कशी येईल त्याचा  नेम नाही ...पण तोर्पयंत असंच, असंच  चालत राहायचं .
असंच  चालत राहायचं ...

पण आपलं हे   मनं   ऐकेल  तेंव्हा.. .
ते एकच हेका घेऊन बसत .
जे हवं आहे ते कायम स्वरूपी ...क्षणभरासाठी नको..

इथूनच  मग सुरु होते ..   मनाच्या वेदनेची कथा ...

असंच लिहिता लिहिता ...
आपलाच ,
संकेत पाटेकर
०१.०४.२०१५
_______________________________________________________________________
_______________________________________________________________________

काही जखमा ह्या वेदना विरहित असतात . त्या कधी आपलं व्रण सोडून देतात ते कळून येत नाही
रक्त ओघळलं  तरी त्याची जाणं होत नाही. पण जेंव्हा ते नजरेआड येतं  ,
तेंव्हा कपाळी प्रश्नार्थी आठ्या पडतात ? हे कधी झालं ? कस झालं ?कुठे झालं ?
शोधार्ती मनं मागोवा घेत राहतं.  पुन्हा ते   थांबतं.  
किंचितसं कळवळतं  . पुन्हा हसतं,  पुन्हा भरारी घेतं.

आयुष्यं  अश्याच जखमांच  एक गोफ आहे. काही जखमा अश्याच कळून न येणाऱ्या असतात .
त्याच काही वाटत नाही.  पण  काही  भरून न येणाऱ्या असतात ...
पण प्रत्येकवेळी मनाला  भरारी घ्यावीच लागते .
रहदारीच्या ऐन रस्त्यावर माणसाच्या गर्दीत   कितीसा वेळ काढतो आपण , त्यातून मोकळी वाट काढावीच  लागते तेंव्हा कुठे मोकळा श्वास घेता  येतो . तसंच काहीसं  ....ह्या आयुष्याचं...

असंच काहीसं लिहिता लिहिता...
संकेत  पाटेकर
०३.०४.२०१५