शनिवार, १९ एप्रिल, २०१४

आणि कावळ्याने चोच मारली .......


फार फार वर्षा पूर्वीची हि गोष्ट आहे.
मी लहान होतो . अगदीच लहान नाही , बहुदा चौथी पाचवीत किन्ह्वा सहावीत असेन .
नुकतीच शाळेला सुट्टी पडली होती. म्हणून आत्याकडे राहण्यास आलो होतो काही दिवस .
माझ्या आत्याच घर तस प्रशस्त .

घरासमोरच मोठं मोकळ मैदान . आणि ते हि चहुबाजूंनी , सदाफुली , जास्वंद , पेरू , बदाम , चिंच , बोर , वड, पिंपळ , रुई , अडुळसा, कोरफड , तुळस ह्याच्या सारख्या ना ना विविध वनस्पतींनी फुलझाडे अन फळझाडांनी नटलेल . त्यामुळे हवा नेहमी खेळती अन शुद्ध असायची . 
तसे खेळाचे मौज मजेचे ते दिवस. शिकण्या सावरण्याचे दिवस ..
माझ्या आत्याचा कुटुंब कबिला तसा मोठा. २ मुले आणि २ मुली दोघा बहिणींची लग्न झालेली . एकीला तीन तर दुसरीला २ मुले , ते हि तिथे सुट्टीत असायचे .
 ते हि माझ्याच वयाचे .
आमचा नित्य नेहमीचा क्रम ठरलेला असे.
सकाळी लवकर उठून चहा पोळी खाऊन समोरच असलेल्या मोकळ्या मैदनात सकाळच्या कोवळ्या उन्हात क्रिकेट खेळायचं अन पुन्हा दुपारच्या भोजन कार्यक्रम वेळीसच घरात पाउल टाकयच .
 त्या दिवशीही असच बाहेर पडलो . खेळून वगैरे झालं.
आणि असंच भटकत भटकत एका झाडाखाली मी आलो , मला वाटत तो भेंडीचा झाड असावा .
 त्याच्या उंच शेंड्यावर कावळो बाने आपल घरट बांधलं होतं .
आणि त्यात तो बहुदा एकटा राहत असे .
'' समज'' हि तशी हळू हळू येत असते . जसे वयोमाना नुसार एक एक घडा मोडी घडत जातात .
 लहानपणी काही गोष्टी समजत नसतात . पण त्यातनं मिळणारा आंनद मात्र आपण उपभोगत असतो .
त्या खेळीत आपण मग्न असतो.
असंच झाडाच्या उंच शेंड्यावर आपल घरट बांधून वास्त्यवास असलेल्या त्या कावळो बास त्याच्याच घरट्यातून हिसकावून देण्याच्या प्रयत्नात मी होतो .
माझ्यासठी तेंव्हा तो एक प्रकारे खेळ होता .
जमिनीवर निपचित पडलेले बारीक सारीक दगड धोंडे उचलत त्यावर मारा करत होतो . पहिला नेम चुकला , दुसरा हि चुकला ..आणि तिसरा बरोबर जावून बसला तो त्याच्या घरट्यातच .
ते पाहून कावळो बानी तेंव्हा स्वतःला कसे बसे सावरत पंख फडफडवत इतर ठिकाण उड्डाण केले . पण त्याच्या मनाची माझ्या बद्दल निर्माण झालेली द्वेषाची ठिणगी काही मिटली नाही .मिटणार तरी कशी ? त्याचा प्रत्यय मला पुढे आलाच कावळोबानी पलायन केले हे पाहून मी माघारी म्हणजेच घरच्या दिशेला निघू लागलो.
आणि तेवढ्यात कुठून कसा ....तो कावळोबा सूड म्हणून, नेमका माझ्या मागून येउन बरोबर मानेलाच चोच मारून पसार झाला पुन्हा त्याच्या घरट्याजवळ . अशा तर्हेने मला तिथे एक शिकवण मिळाली .
पक्षी प्राणी हि आपला सूड घेतात .
- संकेत य पाटेकर
१६.१०.२०१३

प्रेम म्हणजे नुसतंच काही बाह्य सौंदर्य नाही...

प्रेम म्हणजे नुसतंच काही बाह्य सौंदर्य नाही ,
पाहताच क्षणी एखाद्याच्या प्रेमात पडणे म्हणजे आपण त्या व्यक्तीच्या दिसण्यावर , त्याच्या सौंदर्या वर प्रथम लुब्ध होतो , ते आपल्याला आकर्षित करत . पण ते काही प्रेम न्हवे .
प्रेम म्हणजे म्हणजे मना मनातल्या गोष्टींच सहजरीत्या पण हळुवार तयार होणार ..
समजुद दारपणाच रसाळ मिश्रण. 

दोन व्यक्ती मध्ये जेंव्हा मना मनाचं समजुददारपणाच , आपुलकीच नातं जुळत तेंव्हा त्यात कुठे प्रेमाचा ओलावा निर्माण होतो. तेच ते प्रेम .
 मना मनातल्या गोष्टी समजायला समजून घ्यायला वेळ हा हवा असतोच , आणि तो द्यावाच.
 एखाद्या व्यक्तीच्या सुंदर दिसण्यावरून जर तुम्ही प्रेम प्रेम करत असाल.
तर ते प्रेम न्हवे . पण हल्ली असंच काहीस घडतंय , आणि त्यातून लग्नाच्या बेड्या बांधल्या जातायेत.
मना मनाला समजून घेण्या आधींच लग्नाच्या बेड्यात दोघे बंदिस्त होतात.
आणि नंतर सुरु होते ती हात घाईची लढाई . एकमेकांशी पटेनास होत. शुल्लक कारणावरून रोज वाद विवाद घडू लागतात.
त्यात इतर अडचणींची , इतर व्यक्ती समस्यांची भर पडते . मन त्यात खचल जातं.
 मानसिक सुखच हरवून जातं .  तन - मन सर्वच तणावा खाली वाहू लागतं. आणि त्यातच मग अविचारंच जाळ पसरल जातं आणि एकमेकांपासून दूर होण्याची दुर्बुद्धी सुचते.
त्यात बिचारी सच्चे मनाने बंधनात अडकलेली व्यक्ती हताश होवून जाते , आणि तिच्या सोबत तिचे नातेवाईक मंडळी हि...

लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ न्हवे कि खेळायचं अन सोडून द्यायचं वाट्टेल तेंव्हा ...आणि प्रेम म्हणजे हि काही नुसत बाह्य सौंदर्य न्हवे कि दिसलं अन जडलं. 
प्रेम म्हणजे नातं मना मनाच्या सौन्दर्याच . ते सौंदर्य कायम जपाव लागत. तरच ते प्रेम प्रेम ठरत .
मनातले काही ...
नातं तुझं माझं
- संकेत पाटेकर
१८-०६.२०१३

नजरेतील वासना ...


६ वाजून गेले होते ..ऑफिस मधून आज जरा उशीरच निघालो.
अंधेरी ते ठाणे हा लोकल प्रवास नेहमीचाच . अंधेरी स्थानकापासून साधारण अर्धा तास तरी पायी चालून ऑफिस गाठव लागतं. संध्याकाळी पुन्हा हि तेच ... ऑफिस   ते अंधेरी पायी प्रवास ..
काल असाच बाहेर पडलो. अंधेरी स्थानका जवळ येतंच होतो .
तेंव्हा त्या एका घटनेने मनाला पार चिघळून टाकले . संताप तर होताच . तो अनावर झाला , पण ते क्षण हातून निसटून गेले . त्याला तिथेच बरडला पाहिजे होता.
म्हटलं किती हि वासना ...आई वडलांनी ह्याना वारयावरच सोडून दिलेलं दिसतंय.
लाज लज्जा शरम ..काहीच नाही .

फक्त स्त्री म्हटल कि ती भोगाची वस्तू बस इतकाच ह्याचा डोक्यात ठनकुन भरलाय कि काय ? 
अशी कशी हि लोक ...... वासनेने भरलेली .
शिवीगाळ करणारे ..संस्कार आई वडलांनी दिले नाहीत , नाहीतर शिव्यांची लाखोली वाहिली असती.
अरे रस्त्यातून जाता येता दिसणारी ' ती' कुणाची तरी बहिण असेल .
मी म्हणतो कुणाची बहिण तरी कशाला मानायला हवी आपलीच समजून  बहिण माना ना रे ? 
निदान ते हि नाही होत तर असे घाणेरड्या नजरेतून बघनं अन नको ते शब्द उच्चारण, जाणून बुजून धक्का देण हे तरी सोडून द्या...माणसात या जरा ....माणसात. 

रस्त्याने सरळ जात असता , त्या मुलाने तिच्या समोर येउन जाणून बुजून धक्का दिला .
अन ती मुलगी स्वतःशीच काही पुटपुटत एकवार पाठीमागे पाहत घाई घाईत निघून गेली.
तो हि तिथून लगेच पसार झाला.
ते सारे क्षण मी पहिले खरे पण काहीच करू शकलो नाही .कारण क्षण हातून निसटून गेले होते .
पण मनाला स्वस्त बसू देत न्हवते .
ती एक बहिण काहीच न बोलता निघून गेली ............., पण तुम्ही नका सोडू अशा भामट्यांना ...
अद्दल घड्वाच........त्याशिवाय सुधारायचे नाहीत ...साले..!
- संकेत य पाटेकर
२८.०१.२०१४

तुझ्याशी बोलणारे , मायेन आपलंस करणारे तरी आहेत कि रे .....


काल एक प्रसंग असा घडला ....ज्यामुळे मनाचा तोल फारच विस्कटला..
जिथे गेलो होतो त्याघरी मायेचं अन प्रेमळ मनाचं पाठबळ मिळालं.
 (माझ्या त्या दोन बहिणी अन मावशी )...त्यामुळे सावरलो ..काही वेळेतच ..!

आयुष्यात बरीच अशी माणसे भेटतात ...पण त्यातलीच काहीच अगदी जिवाभावाची बनतात ...
जिथे प्रेम अन मायेचं , आपलेपनाच खर खुर दर्शन घडतं. .... मी स्वतःला भाग्यवान समजतो अशी माणसं लाभलेत .
-------------------------------------------------------------------------------
ऑफिस मधून घरी परतत असता ...रस्ता ठिकाणी रोज एक व्यक्ती दिसते .
अंगावर फाटके तुटके मळके कपडे असलेली , केसांची जठा झालेली . एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला निवांत पडून असते ... त्या व्यक्तीला पाहून क्षणभर विचार मनात घोळू लागतो.
ह्या व्यक्तीला मायेचं अस कुणीच नाही , कुणी आपुलकीनं विचारणार हि नाही , कशी जगत असेल हि व्यक्ती,  तेंव्हा प्रेम प्रेम करत असलेल मन , प्रेमासाठी धडपडत असलेल मन म्हणत अरे बघ तिथे त्याकडे ....
कुणीच नाही रे त्याचं.. तुझ्याशी बोलणारे , मायेन आपलंस करणारे तरी आहेत कि रे .....
-संकेत य पाटेकर
 ०५.०२.२०१४
मनातले काही...

जगावं कस हे ह्या निसर्गा कडून शिकावं....


जगावं कसं हे ह्या 'निसर्गाकडून' शिकावं. काही न मागता भरभरून देणे हि त्याची खासियत ..
आनंदाची व्याख्या शिकावी हि त्याच्याकडूनच . त्याच्यासारखं 'मित्र' होतां आलं तर 'ग्रेटच' म्हणा , 
कारण एकमेव असा हा मित्र आहे . 
ज्याच्या सहवासात दुखाचा भला मोठा डोंगर हि क्षणार्थात कोसळून पडतो . 
अन चैतन्याचा नवा स्वर अवतीभोवती सतत गुंजत राहतो. 
- संकेत य पाटेकर

मंगळवार, १५ एप्रिल, २०१४

नात्यातील वाद विवाद..

नातं कुठलही असो त्यात वाद -विवाद हे होतंच असतात . रुसवे फुगवे होतच राहतात .
पण इतकं असूनही नात्यातली असलेली ती गोडी काही कमी होत नाही . एकमेकांच एकमेकांवर असलेलं प्रेम काही कमी होत नाही.  बस्स मन तुटली जातात काही वेळा पुरत . तेंव्हापुरतं  सार काही दुरावतं.
तेंव्हा मात्र थोडा अवधी हवा असतो आपल्याला अन समोरच्याला हि सर्वकाही शांत होण्यासाठी, पुन्हा सर्वसुरळीत होण्यासाठी ...तो एकदा दिला, एकमेकांना कि ..बस्स...
पुढेचे क्षण आपलेच असतात .. त्याच गोडीचे ..त्याच हसऱ्या मनाचे ...प्रेमाचे ...आनंदाचे !
असंच लिहिता लिहिता..
-संकेत य पाटेकर
१५.०४.२०१४
 __________________________________________________________________
ज्या व्यक्तीवर आपलं भरभरून अन जीवापाड प्रेम असतं.
 त्या व्यक्तीला विनाकरण त्रास देण्याचं , तसा विचारच आपल्या मनास कधी शिवत नाही .
 उलट ती व्यक्ती नित्य नेहमी हास्य आनंदात बहरली जावी ह्या साठीच , ह्या कडेच आपल्या मनाचा सर्व कल असतो . आणि त्या साठीच सदा सर्वदा त्या ईश्वराकडे एकच मनोभावे प्रार्थना केली जाते ......

ती हि कि तिला सुखी ठेव ....आनंदी ठेव ..भरभरून प्रेम दे !!!
दूर राहूनही ती व्यक्ती मनाच्या अन हृदयाच्या खूप खूप जवळ असते , अन त्याची जाणीव प्रत्येक क्षणी आपणास होत राहते . 
हेच ते प्रेम असत. .... हेच एक अनमोल नातं असतं...
मनातले काही ..
- संकेत
 ०२-०५-२०१३
हा फोटो नेट वरून घेतलेला आहे

रविवार, १३ एप्रिल, २०१४

१०० वर्ष आयुष्य आहे तुला....


१०० वर्ष आयुष्य आहे तुला ..........आत्ताच तुझी आठवण काढली .
सहज कधी , योगा योगाने म्हणा किंव्हा ठरवून म्हणा , एखाद दिवशी कधीतरी अचानकपणे भेट घडते. नेहमीच्याच कट्ट्यावर तर कधी रस्त्याने जाता येता ...कधी कुठल्या एका कार्यक्रमाप्रसंगी , मग तो लग्न समारंभ असो वा इतर कुठला हि ....
एकमेकांना भेटून खुशालकि विचारली जाते .
मग विषयावर विषय निघत एक एक विषय चर्चिले जातात .
गप्पांना हास्याचा आनंदी रंग चढत जातो. मग सरतेशेवटी किव्हा अधे मध्ये एखाद दुसर्या मित्राची किंव्हा आपल्या लाडक्या व्यक्तीची आवर्जून आठवण येते.
तिचा उल्लेख हि होतो .
काय करतो रे तो हल्ली ? कुठे असतो तो ? दिसतो का , भेटतो का ? 
कशी आहे ती ? बरेच दिवस दिसली नाही . असे प्रश्ना वर प्रश्न विचारले जातात .
अन त्या प्रश्नाच उत्तर देण्यास जावे तोच ती व्यक्ती साक्षात देवासारखी तिथे अवतरलेली असते .
अन मग नकळत एक वाक्य निघत मुखातून ...जे सर्व श्रुत आहे.
ते म्हणजे ..
१०० वर्ष आयुष्य आहे तुला ..........आत्ताच तुझी आठवण काढली .
असे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. 
कधी आपण कुणाला १०० वर्ष बहाल करतो , तर कधी आपले जिवलग आपल्याला १०० वर्ष बहाल करतात अगदी प्रेमाने आपण मात्र एक हास्य छबी देऊन मोकळे होतो.
संकेत य . पाटेकर
१६.०२.२०१३

' आठवणी '


ह्या फोटोंच बर असतं. ते कधी पहा, ..कुठे हि पहा ...
त्यातले चेहरे बदलत नाही. चेहर्या वरचे हाव भाव बदलत नाही. त्या व्यक्ती बदलत नाही .
जे आहे ते आहे वर्षानुवर्ष तसच...बदल अजिबात नाही .

म्हणून ते पाहताना ........गेलेले क्षण पुन्हा तसेच्या तशे नजरे समोर येतात .
 अन आपण त्या हसर्या आठवणीत आपलं भान हरपून घेतो.  मन स्वतःशीच प्रश्नोत्तराच खेळ खेळू लागतो.
किती हसरे क्षण होते ना ते ? किती सोनेरी दिवस होते ? काश ते दिवस ते क्षण पुन्हा बहरून आले तर...

 पण ह्या जर अन तर च्या गोष्टी, कारण आपण वेळेसोबत पुढे आलेलो असतो .

काल बदलला असतो. परिश्तिती बदलेली असते. व्यक्ती व्यक्ती बदलेल्या असतात.  पण आठवणी ह्या अश्याच अजूनही ताज्या टवटवीत ...

मनाला प्रसन्न्तेचा लेप देत असतात.
संकेत पाटेकर
२१.०२.२०१४

आपल्या माणसाच 'मन '


म्हणतात , प्रेमाने जग जिंकता येतं , पण मला जग जिंकायचं नाही. 

आपल्या माणसाच ' मन ' जिंकायचं आहे , भले आज मी त्यात हरलो , अपयशी झालो . 
ह्या घडीला मला त्यांचं मन नाही जिंकता आलं , पण एक ना एक दिवस माझा येइलच . 
तेंव्हा त्यांना अभिमान हि असेल . 
स्वतःचा अन स्वतःबरोबर माझा हि , तेवढी मी खात्री देतो . 

 संकेत य. पाटेकर 
 ०३.०३.२०१४

म्हणून बोलावं मनमोकळेपणाने....


मनात जे असेल ते बोलून टाकावं एकदाचं ...मनात काही ठेवू नये , व्हायचा त्रास तो होऊ दे, एकमेकांना , 
जो काही व्हायचा तो एकदाच ....पण त्याची पुन्हा पुन्हा उजळणी नको . तेच.. तेच अन  तेच तेच...
मनाला तोच तोच विचार करण्यास भाग पाडून अस खिचपत पडण्यापेक्षा ..बोलावं..
मन मोकळेपणानं त्यातून काहीतरी मार्ग निघेल.....हव्या असलेल्या प्रश्नाच उत्तर तरी मिळेल.
पण असं एकटक शांत राहून .. एकमेकांशी न बोलताच ...मनातल्या मनात प्रश्नांची जर उजळणी करत राहिलो . तर एक एक दिवस ...जगण फार अवघड होउन जाईल . 
अश्याने त्रासा शिवाय इतर काही गवसणार नाही. इतर कुठल्याच गोष्टीत मन रमणार नाही. 
आहे ते प्रश्न सुटणार नाही. त्याच उत्तर मिळणार नाही... 
म्हणून बोलावं मनमोकळेपणाने ज्याने त्याने ......यायचा राग तो येऊ दे एकदाचं ...!
तो काही क्षणासाठीच असेल ...
पण कदाचित प्रश्नाचं उत्तर मिळेल . पुढचं जीवन सुखरूप होईल. 
आपलं मन हलक होईल.
- संकेत य पाटेकर
१८.०३.२०१४

शनिवार, १२ एप्रिल, २०१४

प्रवास ...

प्रवास कुठलाही असो , कुठे हि असो , कधी हि असो...दिवसा असो वा रात्री असो . 
स्वप्नातल्या लखलखत्या चंदेरी दुनियेतला असो , पायी असो वा चार पायी असो, मुंबईतल्या धावत्या रेल्वे गाडीतला असो .रस्त्यावरल्या गजबजल्या रह्दारीतला असो, एकटक एकांतातला असो , भोवतालच्या निसर्गरम्य परिसरातला असो कि दूर दुरल्या खेड्या पाड्यातल्या , शेंता बांधातला असो . तलावकाठी फुललेल्या सांजवेळीतला असो वा गावागावातल्या गल्लीबोलीतला असो..सह्याद्रीतल्या बळकट दुर्ग राशींवर असो वा सर्वोच्च उंच शिखरावर असो . पुस्तकी दुनियेतला असो , वा काव्यातून नटलेला असो...
प्रवास आनंद देतो . प्रवास नवी उर्जा देतो , नवी प्रेरणा देतो , जगण्याची नवी आशा देतो . 
लढण्याची नवी शक्ती देतो. नवं आत्मज्ञान देतो . हास्य देतो . मायेच स्पर्श हि देतो त्याबरोबर वेदनेचे चटके हि देऊन जातो.
तो घडवतो .शिकवतो , एक विशिष्ट्य आकार देतो आपल्या विचारांना ... नव्या उद्दिष्टांसह , नव्या ध्येया सह..

असा हा आनंद - दुख मिश्रित 'जीवन प्रवास ' हा प्रवासच म्हणजे जीवन नाही का ?
आईच्या पोटी ९ महिने काढल्या नंतर ह्या नव्या जगाशी आपला थेट संबंध जुळतो .
इथूनच आपला मार्ग सुरु होतो . आत्मसात करण्याची अन शिकण्याची मानवी वृत्ती आपल्याला हळूहळू घडवत जाते .
कधी हास्यात कधी दुख वेद्नानाच्या आसवात.......आपण घडतो.
धडपडतो , उठतो , शिकतो ..अन चालत राहतो. आपल्या जीवन वाटेवर...

हाच तो प्रवास असतो ..आपल्या ध्येयाशी जुळलेला .
तर ह्या अश्या प्रवसात काही गमती जमती नक्कीच घडतात ..तर काही गोष्टी मनाला भेदून जातात .
 त्याच इथे मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे .
लवकरच ................
संकेत य पाटेकर
०९.०४.२०१४

______________________________________________________
कालचीच घटना ..
मामाच्या मुलाचं लग्न सोहळा आटपून गावाकडून सायंकाळी पाच च्या सुमारास बाहेर पडलो...परतीच्या प्रवासाठी . पुन्हा त्या कोन्क्रीटी करणाच्या धावत्या शहरात ... जिथे वेळेला हि घाम फुटतो ....कारण ती हि सतत धावत असते . कुणाची पर्वा न करता .. 

खर तर गावातल्या मोकळ्या वातावरणातून पुन्हा त्या प्रदूषणयुक्त धावपळीच्या वातावरणात प्रवेश करन नकोस वाटत होतं .
पण काय करणार ...जिथून आलो आहे तिथे परतावं तर लागतंच ना .
मग ते आपलं घर असो . वा यमदूताच घर ..घर हे घर ...ह्या भूतलावरच अन नंतर मृत्युला कवटाळन्या नंतर...यमाच ...जिथून आलोय तिथे पुन्हा जावंच लागतं .
 तर असो ..
आनंद हा तसा क्षणाचा सोबती असतो. पण तो का एकदा अंगात भिनभिनला कि सदा साथ देतो .
अन अशी आनंदाने भिनभिनलेली हसरी माणसं आपल्याला , 
आपल्या सभोवताली कुठे ना कुठे भेटतच असतात .
असो...
लग्न हा तसा सुख दुखाचा आनंदमय सोहळा . दोन जीवांना एकत्रित करणारा ...
एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची वचनं घेऊन अग्नी भोवती सात फेरे घेण्याचा हा सोहळा..
आसवांचा पाट नकळत ओसंडून वाहणारा हां सोहळा..
आनंदात मौज मस्तीत मुक्त न्हाउन घेण्याचा हा सोहळा ..
साखरपुड्य़ाला सुपारी फोडेपासुन हळद अन लग्ना पर्यंतचा विविध विधींचा हा सोहळा .
तर असा सोहळ्याला साक्षी राहून ..मी निघालो दुसर्या दिवशी घरातून पुन्हा घराकडे ...
गावाकडून शहराकडे ...परळी ते खोपोली. ३ चाकी टमटममधून...
सायंकाळचे ६:१५ झाले होते. परळी तून खोपली फाट्याजवळ उतरलो .
खोपली तून ६ ला सुटणारी मुंबई लोकल आता भेटणारी न्हवती .
त्यामुळे फाट्याजवळच उतरून हात दाखवून पनवेल करिता अथवा ठाण्याकरिता एखादी एस टी किंव्हा दुसरी कुठली चार चाकी मिळते का ते पाहत होतो.  तेवढ्यात एक काळ्या रंगाची करकरीत फोर्ड गाडी रस्त्याच्या कडेला येउन थांबली.
माझ्या बाजूला उभ्या असलेल्या २ स्त्रिया अन एक वयस्कर काका त्या गाडीत जावून बसले .
मी त्यांच्याकडे टकमक पाहत राहिलो. अन विचार करू लागलो. असतील ओळखीचेच कुणीतरी..
म्हणून बसले असतील गाडीत.. आपलं नशीब कुठल थोरं...
आपल्याला दुसर कुठल वाहन मिळत का ते पाहत उभं राहावं लागेल . ..म्हणून आहे तिथेच उभा राहिलो. तेवढ्यात पनवेल का ? अशी गोड हाक कानी ऐकू आली .
नजर त्या स्वराचा मागोवा घेत त्या काळ्या रंगाच्या फोर्ड गाडीकडे वळली.
 आत बसलेली ती जेमतेम ४० च्या आसपासची स्त्री . मला विचारात होती .
पनवेल का ? मी म्हटल हो . अन बसा म्हणून मला त्यांनी जागा दिली .
 पुण्यावरून आलेली ती गाडी आम्हा अनोळख्यांना घेऊन अशी पनवेल च्या दिशेने धावू लागली.
 सुरवातीला वाटलं ती माणसं वाहन चालकाच्या ओळखीचे असावेत . पण तसं काही न्हवतं.
कुणीच कुणाच ओळखीच न्हवतं . पण माणुसकीच्या नात्याने आम्ही काही वेळासाठी हि का असो एकत्रित आलो होतो. अन त्यातून विचारांची देवाण घेवाण ला सुरवात झाली होती . एखादी हसरी अन बोलक्या व्यक्तीमत्वाची माणसं भेटली कि गप्पांना अन वेगवेगळ्या विषयानां उकळी फुटते . मग ऐकणारा शब्द ना शब्द ऐकत जातो . बोलणारा बोलत राहतो. . विचारांची अशी देवान घेवाण होत राहते . त्यातून कधी काही प्रेरणादायी वाक्य बाहेर पडतात. अन ते वाक्य आपल्या जीवनाला काहींदा कलाटणी हि देऊन जातात . 

 पनवेल ला उतरायचं म्हणून गाडीत बसलो खरा ..पण उतरलो ते थेट शीळफाट्याजवळ . ..
ते हि एक पैसा न घेता आणि महत्वाच म्हणजे येता येता आलो ते प्रेरणादायी वाक्य कानी ऐकतच .
 गाडीचे चालक मालक ' मुकुंद कुलकर्णी '' ह्यांच्या जीवनातले अनुभवी बोल.
गरीबलाच गरीबाची अन आपल्या सभोवताली घडणार्या बारीक सारीक गोष्टींची जान असते. 
 जीवनामध्ये चढ उतार असतातच . त्याना सामोरे जा . पडा धडपडा ..पण पुन्हा उभे रहा . प्रामाणिक रहा . जे काम करत आहात ते मनापासून करा ...शिका ..शिकत रहा . 
मला हे जमणार नाही जमत नाही . अस कधी करू नका . स्वतःवर विश्वास ठेवा .  जिथे प्रेरणादायी वातावरण असेल त्या वातावरणातच प्रवेश करा . 

अन त्यातून प्रेरणा घ्या त्यांनी एक उदाहरण दिल . 

कोल्हापूर वरून आलेला एक बारावी झालेला व्यक्ती , शिपाई म्हणून नोकरीला लागतोय काय अन पाच करोडचा BUSINESS करतो काय काय ....अचंबा करणारी गोष्ट आहे .
अफाट मेहनत अन बुद्धीची जोरावर अन शिकत शिकत तो इथवर पोहचला .  अशी काही उदाहरणे देत त्यांनी ते प्रवासाचे काही क्षण अगदी भारावून टाकले .
जाता जाता मलाच THANKU म्हणतं...
म्हणून प्रवास मला आवडतो . तो घडवतो शिकवतो , प्रेरणा देतो . नवी ओळख देतो .
 स्वताची .अन जगाची हि ..
कोण कुठे कसा कधी भेटेल अन आपल्याला MOTIVATE करेल यशस्वी जीवनाकरिता ते सांगता येत नाही . पण ती भेट अविस्मरणीय असते .
- संकेत य पाटेकर
५.०५.२०१४




जीवन एक... प्रवास आहे .
कालचा पुढचा मागचा आत्ताचा , येणार्या उद्याचा , संघर्षाचा , आनंदाचा ..लढून ताठ मानेने अभिमाने जगण्याचा. माझ्या जीवन प्रवासातील अशाच रंजक अन हृदयास भिडणार्या काही आठवणी काही क्षण मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्यातलीच हि एक कालची घटना हृदयास भिडलेली .
' लढा जीवनाशी ...जगण्यासाठी '
सायंकाळी सहाचा न ऐकू येणारा पण डोळ्यांना उभ्या रेषेत दिसणारा घड्याळी टोला वाजला.
 तेंव्हा ऑफिस मधून निघालो. घाई घाईत पायी पायी नेहमीप्रमाणे , डांबरी अन कोन्क्रिट करणाच्या पायवाटेने , कडेकडेने २०-२५ एक मिनिटात थेट अंधेरी स्टेशन गाठले. पुढे चर्चगेट साठी ट्रेन पकडून घामाच्या धारांच्या संगतीने भर गर्दीतून दादर ला पाय उतार झालो.
अन पश्चिमेकडून कडून पूर्वे कडे धावत पळत ७:०१ ची कल्याण लोकल ट्रेन साठी platform क्रमांक ५ वर र एका ठिकाणी रेंगाळत उभा राहिलो.
तोच अन तेवढ्यात नजर एका बाप लेकाच्या जोडी कडे वळली. (खर तर बाप , हा शब्द मी कधी उच्चारात नाही . पण इथे ते देन गरजेच वाटलं म्हणून लिहितोय ) तर माझ्या शेजारीच अगदी platform वर त्या दोघांनी बैठक मारली.
 साधरण सात एक वर्षाचा तो मुलगा अन त्याचे चाळीशीच्या पुढे झुकलेले पप्पा .
 आपल्या लेकाकडे किती आत्मीयतेने पाहत होते. अन बाप लेकाच ते करुणामय चित्र मी अगदी स्तब्ध नजरेने न्हाहाळत होतो. लोकांच्या प्रश्नार्थी नजरा हि त्यांच्याकडे अधून मधून पडत होत्या .
पण त्या दुरूनच .
प्रश्न पडायला कारण हि तसच होत. त्या लहानग्याच्या तोंडावर मास्क लावलेला .
डोक्यावरचे त्याचे केस फारच विरळ झालेले त्यामुळे डोक्यावरची त्वचा अन त्वचा दुरूनही नजरेस दिसून येत होती. अन त्यातच त्या मुलाच्या पप्पा कडे असलेला बगेतील औषधी गोळ्याचा साठा काहीतरी गंभीर आजार असल्याचा दाखला देत होता . 
मी हि ट्रेन ची वाट पाहत त्यांच्या बाजूलाच उभा होतो. त्यांच्याकडे पाहत होतो.
 मनात एकप्रकारे प्रश्नाचं काहूर हि माजलेल. तो औषधी साठा अन त्या लहानग्याला पाहून , नक्की काय आजार असावा ? कॅन्सर सारखा गंभीर आजार तर नसावा ना ?
पण इतक्या लहान मुलाला कॅन्सर कसा होईल . छे, छे ..अजिबात नाही .
 मनात अशा रीतीने माझ्या द्वंद्व सार चालू होतं.
तेवढ्यात त्या मुलाच्या पप्पाने बगेतील औषधाची बिलं काढून अन एकदा स्वताहा चालून माझ्याकडे सुपूर्द केली. , प्रश्नार्थी नजरेने उत्तराच्या अपेक्षातच .
नक्की खर्च झालेला आकडा किती ? ह्या विवंचेत.
हे किती आहे ? त्यांनी माझ्याकडे दिलेल्या बिल कडे बोट दर्शवून मला विचारले ?
हे दीड हजार आहेत अन हे साडे चार हजार , म्हणजे एकूण सहा हजार .
आहे ती आकडे बेरीज करून मी त्यांना सांगितली.
 त्यांनी पुन्हा दुसरं अन तिसरं असं एक एक बिल माझ्याकडे सुपूर्द केलं. त्याचा आकडा हि मी त्यांना सांगितला .  अन त्या सगळ्याची बेरीज करून साडे सात हजार हा आकडा समोर आला . ते समजताच त्यांनी हसतच त्यांच्या डोक्यावर हात ठेवला .
 अन माझ्याकडे पाहून म्हटल .  एका दिवसाचा खर्च ..साडेसात हजार.
मी त्यावर काही बोललो नाही . बस्स स्मित हास्य केलं .
अन प्रश्नार्थी नजरेने पुन्हा त्यांचाकडे अन त्या मुलाकडे पाहू लागलो नक्की काय झालं असेल ?
कसला आजार झाला असेल ? कुठून आले ते ?
असे एक एक प्रश्न मनात एखाद्या वादळीचक्रा प्रमाणे फिरत होते.
म्हणून एकदाच त्यांना विचारल ? काय झाले आहे त्याला ?
 त्यांनी एकवार माझ्याकडे पाहिलं . अन म्हटलं

'' कॅन्सर '' 

ते ऐकून क्षणभर धक्काच बसला .
इतक्या लहान मुलाला कॅन्सर ? कस शक्य आहे ? देवा काय हे ? अजून कळी उमलली नाही तर असा गंभीर आजार...काय केलाय त्याने गुन्हा ?
 पण ते होतं. इवलास वय अन ............ क्षणभर त्यांच्याशी काय बोलावं ते कळत न्हवतं .
त्यांचा मुलगा आपल्या पप्पांच्या मोबाईल वरून आपल्या आईशी संवाद साधत होता . अगदी मोकळेपणाने आपल्या लाडल्या आईशी तो गप्पांत गुंग झाला होता .
' ये आये , आम्ही बारा पर्यंत पोचू बर घरी '
त्याचे त्याचे ते गोड बोबडे बोल अन निरागस हास्य मुकुट माझ्या मनाला मात्र घाव देत होते.
 काय आयुष्य आहे . अजून सुरु हि नाही झालं . तर ....... त्या मुलाला तरी काय कल्पना ...
आपल्याला नक्की काय झालाय .
हुशार आहे हो तो, पण काय ......
त्यांनी एकवार माझ्याकडे पाहिलं ..पण त्यांना पुढे बोलवेना .
तरीही ..'' बरा झालाय तो'' अस म्हणत ते , प्रेमळ आसवांनी आपल्यामुलाकडे पाहताच राहिले.
नाशिक चे ते स्थायिक . गेले तीन महिन्यापासून परेल च्या टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये आपल्या मुलावर उपचार घेत आहेत.
आपल्याला झेपेल तसं ते करतायेत आपल्या मुलासाठी. . कसं जीवन असत एकेकाच .

जो तो लढतोय जीवनाशी . संघर्ष करतोय . कुणी आपल्या जन्मापासून तर कुणी जीवनाच्या अर्ध्या वाटेवर पोहोचल्यावर तर कुणी कधी ... पण संघर्ष आहेच . जीवनाचा जगण्यासठी ....
प्रवास ..... घटना ३
संकेत य पाटेकर
०९.०५.२०१४

























No one has ever become poor by giving ...
वार रविवार आपल्या हक्काचा सुट्टीचा दिवस . दिवस भर आराम करून संध्याकाळच्या वेळेस सहज फेरफटका मारावा म्हणून घराबाहेर पडलो .
दुर्तफा झाडींनी अन फुलांनी बहरलेल्या त्या डांबरी रस्त्यातून ..कडे कडेने ..मनात बहरलेले विचार घेऊन ...भविष्याचा वेध घेत . पाउला पाउलानिशि पुढे जात होतो .
तेवढ्यात कुठेशी नजरा नजर झाली.
 रस्त्या पलीकडल्या त्या ' बाई' भुकेच्या व्याकुळतेने केविलवाण्या चेहऱ्याने माझ्या जवळ आल्या .
अन १०- २० रुपये मिळतील का ? भूख लागले ? अस म्हणत माझ्याकडे हात पसरू लागल्या .
जेमतेम ४०-४५ च्या आसपासच्या नववारी साडी नेसलेल्या त्या बाई पेह्रावरून अन दिसण्यावरून तरी धडधाकट दिसत होत्या .
हल्ली भिख मागण हा देखील धंदा झालाय.
त्यामुळे पैसे काढून द्यावे कि नको ह्या विचारात मी होतो. तसे दहा - वीस रुपये द्याला काही मोठे न्हवते . पण म्हटल त्याआधी तीला विचारुया कुठून आलात ? इथे कश्या ?
आणि भिख का म्हणून मागत आहात ?
तेवढ्याच २ गोष्टी समजतील त्यांच्या जीवनातल्या . म्हणून विचारायला लागलो.
तेंव्हां ती बोलू लागली.
अकोल्या वरून आले . बहिणीसोबत इथेच राहते ..मिस्तर आहेत पण ते साईट वर आहेत त्यांचा फोन लागत नाही.अस तसं..
 माझ्या मनाला मात्र जे तिने सांगितल ते कुणास ठाऊक पटल नाही.
मी मनाशी काहीस ठरवून पैसे न देता..त्यांना sorry म्हणत पुढे निघालो . 
पण मनातली हि विचारांची धारा काही स्थिर राहत न्हवती. रस्त्याने चालत होतो पण मन स्वस्थ बसत न्हवतं .
' मन' च मनास प्रश्न करत होतं .
 काही क्षणाच्या भेटीवर अन कोणत्या विश्वासावर ती तुला तिच्या जीवनातले सर्व गोष्टी सांगत बसेल ?
१०-२ रुपये दिले असते तर काही बिघडल असतं का ? अरे कालच एक वाक्य वाचलंस ना रे ...
No one has ever become poor by giving ...मग का ?
का दिले नाहीस पैसे ? दहा वीस रुपयाने तुझ काही कमी होणार आहे का ?
 इतकं हि तुझं जीवन फाटकं नाही ? चल मागे फिर ..जा पुन्हा त्या बाई कडे ?
दुसर्याच्या आनंदातच आपला आनंद असे मानतोस?
 मग एखाद्याने जर आपल्याकडे काही मागितल अन ते देण्यास आपण सक्षम असू ?
मग ते का देऊ नये ? अरे पण ? कोणालाही अस द्याव ?
उगाच, काही एक कष्ट न घेता आयात अस मिळतंय म्हणून, भिख मागावी का ?
पण दुसर मन हे मानण्यास तयार होईना ... एकच वाक्य ..सतत उमटे मनाच्या अंतरीतून
No one has ever become poor by giving .....
रस्त्याच्या एका वळणावर पाउल थबकली . मी मागे फिरलो . पुन्हा त्याच दिशेने .... नजर इकडे तिकडे वळविली . पण वेळ निघून गेली होती. पुन्हा न परतण्यासाठी...
 एव्हाना त्या बाई दूर निघून गेल्या होत्या ...त्यांच्या वाटेने .. मी मात्र शोधार्ती नजरेने मनाशी एकच वाक्य पुटपुटत होतो.
No one has ever become poor by giving .....
प्रेम असो वा प्रेमळ शब्द वा मायेचा हलका स्पर्श वा इतर गोष्टी मग पैसा असो वा आपली मदत . 
आपल्याने जर एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलत असेल तर ते जरूर करावे .
-संकेत य पाटेकर
१९.०५.२०१४

ते बहरलेलं झाड..

नित्य नेहमीचीच ठरलेली जागा आमची , दुपारचा साडेबाराचा आकडी टोला पडला कि कॅन्टीन मध्ये पळत सुटायचं .
घरातून दिलेलं पोळी भाजीचा प्रसाद एक एक करत पोटात टाकयचा अन मग फेरफटका म्हणून मोकळ्या वातारणात , मोकळा श्वास घेण्यास ऑफिस बाहेरील वृक्ष वेलींच्या दाट छायेत थोडं विसावायच.

आपण एकटाच असू तर निसर्गातल्या त्या विवध खट्याळ गमती जमाती डोळ्यांदेखत पाहायच्या . अन पुन्हा काही वेळत ऑफिस मध्ये परतून आपल्या कामांत स्वाताहाला वाहवून घ्यायचं .
हे नित्य नेहमीचंच ठरलेलं माझं .
निसर्गाच्या सानिध्यात मनाला जी प्रसन्नता मिळते . ती इतरत्र कोठूनही मिळणार नाही .
काही दिवसांपूर्वी च ते पानागलेलं झाड आज चक्क बहरून निघालंय.
मोहर फुललाय म्हणायचा . त्यामुळे विविधरंगी पक्षी पाखरांचा मेळावा त्याच्या अंगा खांद्यावर वाऱ्याच्या सुरेल स्वरात अगदी इकडून तिकडे झुळत असतो.
कधी एखादा दयाळ , तर कधी पिसारा फुलवून नाचणारा ' नाचरा' , कधी विटू विटू करणारा मिठास पोपट , तर कधी चिऊताई पेक्षा हि अगदीच लहान इवलासा पक्षी आपलं गोंडस दर्शन घडवतं .
त्यांचे विविध नखरे नजरेत टिपून घ्यावीत अशीच असतात . त्यातच आपल्या कावळ्या चिमण्याच्या येरझारया होत असतात. मधेच एखादा कोकिळ पानांच्या सळसळत्या लाटेत स्वतःला लपवत आपल्या सुरेल स्वरात गाऊ लागतो.
इवलीशी खारुताई सतर्क नजरेने ह्या फांदीवरून त्या फांदीवर '' मीच इथली राणी '' म्हणत मोठ्या दिमाइक्तेने शेपूट झुलवत बागडत असते .
फुलपाखरे आपल्या विविधरंगी कलात्मक छटा पसरून इथल्या सौंदर्यात अजून भरणा घालत असतात .
झाडाच्या अवतीभोवती मुळाशी पसरलेल्या मातीत किडे मुंग्या आपल्या नेमून दिलेल्या कामात सतत व्यस्त असलेले दिसून येतात.
 फुलांचा सडा सर्वत्र पसरलेला दिसून येतो , त्याचा सुगंध दरवळत असतो एक आल्हादायक वातावरण असत ते ......मनाला रीफ्रेश करणारं ..!
निसर्ग हा अद्भुत आहे रहस्यमय आहे . तितकाच लावण्यमय सौंदर्याने नटलेला देखील. 
ज्ञानार्जनाने समृद्ध असा , अफाट शक्तीचा , ममत्वेने परिपूर्ण हि ... 
अश्या ह्या निसर्गात त्याच्याशी गुजगोष्टी करण्यात , त्याच्या सहवासात स्वतःला हरवून घेण्यास मला खूपच आवडतं. त्याच्यासारखा गुरु नाही .
 कोणतही मानधन न घेता बर्याच गोष्टीच शिकवतो .
असंच लिहिता लिहिता ..
- संकेत य पाटेकर
११.०४.२०१४
* खालील फोटो हा अंतरजालातून घेतलेला आहे हे वाचकांनी ध्यानी घ्यावे . _______________________________________________________________
आज त्याची माझी चक्क दुसरी भेट <<<<
तेही कित्येक दिवसाने घडली ..तेच ठिकाण , तीच वेळ ... पहिल्यांदा जेंव्हा तो भेटला होता , तेंव्हा किती आनंद झाला होता सांगू , एखाद्या गोष्टी विषयी अति उत्सुकतेने अन कुतूहलाने वाचावं अन ते अप्रत्यक्षरित्या अचानकपणे डोळ्यासमोर उभ रहाव, ह्यात किती तो आनंद ......शब्दात वर्णन करता येणार नाही.
तांबट दिसायला तसा फारच सुंदर ...अन तितकाच धीट हि , हाकेच्या अंतरावर मी त्याची सुरु असलेली कसरत पाहत उभा होतो . ते हि दहा पंधरा मिनिटे , अन तो हि न डगमगता आपल्या कामात अगदी तल्लीन झाला होता. एखाद्या पक्षाच घरट आपल्या डोळ्यादेखतं आकार घेताना पाहणं  , किती नाविन्यपूर्ण अन भाग्यातली गोष्ट नाही का ? ते भाग्य मला लाभलं हो आज ..थोड्या अवधीसाठी का होईना ....
आनंदी आनंद गडे..
मागची त्याची पहिली भेट घरट्यासाठी जागा पाहण्यात गेली.
आणि ती त्याने निवडली हि . अन आज चक्क तो आपल्या बळकट चोचीचे दणके देतं.
घरट्य़ास आकार देऊ पाहत होता . पंघांची फडफड करत तो कधी हवेत तरंगत ,तर कधी एका पायवर उभा राहतं , घरट्य़ा ठिकाणी फांदीवर चोचीचा प्रहार करत . अधे मध्ये थोडा विसावा घेत . अन पुन्हा काम चालू करत . वाटावं कि असंच तिथे उभ राहावं त्याची ती कारागिरी पाहत ...
पण ऑफिस ची ' लंच ब्रेक' ची वेळ घटत आल्याने , नाईलाजाने पुन्हा परतावं लागलं
एक चांगल आहे , ऑफिस च्या आसपास झाड्यांची बहरलेली बाग असल्याने , दुपारच्या मधल्या सुट्टीत जेवण लवकर उरकून ..मला विविध पक्षांचे अगदी जवळून दर्शन मिळते.
 कॅमेरा सोबत नसल्याने , डोळ्यात दे क्षण साठवून घेतो... अगदी टकमक पाहत .
नकळत आंनद देतात ..... हि पक्षी पाखरे !
- संकेत य पाटेकर
११.०८.२०१४
* खालील फोटो हा अंतरजालातून घेतलेला आहे हे वाचकांनी ध्यानी घ्यावे .