आणि मी प्रेमात पडलो. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आणि मी प्रेमात पडलो. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ३ डिसेंबर, २०१३

पहिलं प्रेम - कळून हि न कळलेलं


बाळपनितले खेळकर स्वप्न रंगवून आपण कधी तरुणपणाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचतो ते कळत हि नाही .पण एकदा का हा उंबरठा ओलांडला कि नव नवीन आव्हानांच ,नव्या जबाबदारयाचं ,मनी वसलेल्या स्वप्नांनाच भार आपल्यावर येऊन ठेपत आणि ते भार आपलं मन हि तितक्याच जिद्दीन उचलून घेत .
अशातच नव नवीन नात्याची गुंफण मनाभोवती जुंपली जाते.
कुठल्याश्या एका क्षणी प्रेमाची गुलाबी झळ मनाला अलगद स्पर्शून जाते .
पहिल्या भेटीची पहिल्या अनामिक ओढीची ती वेळ अगदी समीप येते.
 स्वप्नातली स्वप्न सुंदरी , प्रत्यक्षात सामोरी उभी राहते. अन नजरेतली लपाछुपीच्या खेळास प्रारंभ होऊ लागतो , हास्याची गोड कुपी हळूच उमलू लागते.
प्रेमाचा सुगंधित वारा हृदयातील स्पंदना सोबत हळूच झुलू लागतो . अन प्रेमाचा ज्वर अंगभर जडू लागतो .
आयुष्यात एकदा तरी आपण कुणाच्या तरी प्रेमात पडतोच .
तेंव्हा मन गाऊ लागतं , नाचू बागडू लागत , पंख नसताना हि दिशा दिशा तिच्या शोधार्थ घिरट्या घेऊ लागतं . स्वस्थता हि कुठे नसतेच तशी मनाला...
विचार हि तिचेच , भास ते हि तिचेच. स्वप्नात ती मनात ती सर्वत्र तीच अन तीच ...
प्रेम हे अस असतं  वेड पीस ...
स्वतःच अस्तित्व हि विसरायला लावणारं स्वर्गाहून  सुंदर...
 पण ते मिळाल तर अन्यथा स्वतःच्या अस्तित्वाची पुन्हा पुन्हा जाणीव करून देणार , जीवनाची व्याख्या अनुभवाने आपल्या मनाशी ठसवून सांगणार अस हे प्रेम ....
काही वर्षापूर्वी असच एका प्रवासात तिची नि माझी भेट घडली .
अन पाह्ताच क्षणी प्रेमातं पडणं म्हणजे नक्की काय असत ते प्रत्यक्ष अनुभवलं .
 तीच गोड स्मित हास्य , तिचे मधाळ शब्द , तीच हसर साजेर रूप मनावर जादू करून गेल .
 एक अनामिक ओढ लागली मनास , क्षण क्षण तिच्या आठवणीत गुंफू लागले. शब्दांनाही कवितेची धार चढू लागली. अन हा हा म्हणता पहिली कविता तिच्यावर रचली गेली.
शब्द होते वेडे वाकडेच पण भावना मात्र कागदावर हळूच उमटून गेल्या .
पुढील भाग लवकरच ... :)
 क्रमश :-
संकेत य पाटेकर
०३.१२.२०१३

बुधवार, २५ सप्टेंबर, २०१३

....आणि मी प्रेमात पडलो.


....आणि मी प्रेमात पडलो.
सांजवेळ होती.मी माझी दुचाकी घेत रस्त्याच्या एका कडेने सरळ मार्गी जात होतो .
 सूर्य मावळतीला त्याच्या परतीच्या मार्गी जाण्यास अतिशय व्याकूळ झाला होता .
 त्याची चाललेली ती धडपड समोरच नजरेला भिडत, मनाला चैतन्य बहाल करत होती.
 त्याची सोनेरी तांबूस प्रकाश किरणे माझ्या अंगा खांद्यला छेदत रस्त्यावर विखुरलेल्या लाल मातीशी लगट करत होती . त्यातच लहरी वारा हळुवार कानाशी गुंजत मनाशी संगीत खेळी करू पाहत होता .
रस्त्यावर तशी रहदारी न्हवती . तुरळक वाहनांची ये जा आणि एक दोन माणसे अधून मधून दिसत होती तेवढीच .
दुर्तफा झाडी आणि अधून मधून दिसणारी हिरवीगार शेतजमीने , आणि त्यावर डोलणारी लुसलुशीत गवतांची पातं . त्या रमणीय वातावरणात , मी माझ्या दुचाकीचा वेग थोडा कमी करत नजरेत ते सारे क्षण टिपून घेण्याच्या प्रयत्नात होतो .
तितक्यात नजरेतील प्रकाशकिरणे थेट एका सुंदर चेहऱ्याकडे खिळून राहिली .नेत्रपटला वरती ती सुंदर आकृती हळू हळू एकजूट होऊ लागली .
गहू वर्णीय गोलाकार चेहरा, काळे भोर सुंदर डोळे ,त्या नजरेतील तिचे आदरयुक्त प्रेमळ भाव .......,
पाहूनच मन वेडावलं .
पाणी भरावयास आलेल्या, विहिरीवरील काठाशी जमलेल्या अनेक मुलीन पैकी ती एक होती . सर्वात उठून दिसणारी . एक सुंदर गोड परी ....
तिच्यावरची नजर काहीकेल्या हटत न्हवती .माझी दुचाकी मात्र तिच्याच वेगेत पळत होती. थोड्या पुढे एका वळणावर उंचच उंच चहूकडे आपले बाहू पसरलेल्या त्या वृक्षाभोवती हळूच माझ्यासकट माझी दुचाकी आदळली. आणि खरच मी प्रेमात पडलो तो असा .
असच थोडा विरंगुळा ........
तुमची प्रतिक्रिया आवश्यक ....
- संकेत पाटेकर