बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१३

नातं - हृदय अन मनाचं

शांत हो , शांत हो मना..
किती त्रास करून घेशील रे,  स्वतःला ?
 शांत हो, का ओढावून घेतोयस स्वतःला ह्या विशाल दु:ख सागरात ?
जिथे आनंदाचा एक थेंब हि मिळणे कदापि शक्य नाही .
 जिथे हास्याची तरल भावना हि कधीच लहरत नाही . का करून घेतोयस त्रास असा ?
का अशा अपेक्षांचं भार स्वतःवर ओढावून घेतोयस हे ठाऊक असूनही कि त्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. ?
का इतकं प्रेम करतोयस त्या व्यक्तींवर जिथे आपल्या असण्याला, जिथे आपल्या शब्दाला हि मुळीच किंमत नाही ?
का अस करतोयस ?
का अस वागतोयस ?
का असा धडपडतोयस ?
जीवन अवघं काही क्षणाचचं आहे रे ,   कधी कोण जाणे ह्या मृत्यूशी गाठ भेट घडेल .
त्यामुळे जे आहे त्यातचं समाधानी व्हायला शिक., थोडं आनंदात जगायला शिक .,
मोकळेपणे हसायला शिक.,दुखात हि आनंदाची कला जोपायला शिक., स्वतःच दुख लपवून दुसर्यांच्या आनंद बनायला शिक .
ऐकतोयस ना ? मी जे काही बोलतोय ते ऐकतोयस ना?
हृदय अगदी तळमळीने मनास समजावून पाहत होता. शेवटी दोघांमध्ये हि घट्ट मैत्रीच नात जे होतं. जीवापाड प्रेम होतं.
कित्येक दिवस झाले . हास्याचा लवलेश हि त्याने मनाशी फिरकताना पाहिला न्हवता .
एकांतात शांत बसून तो कित्येक तास स्वतःच्याच प्रश्नाची उत्तर शोधू पाहे .
पण उत्तर मिळूनही त्याच समाधान काही होत नसे. त्यामुळे सतत दु:खाच्या छायेखाली तो गुरफटत असे . त्याची हि अवस्था हृदयास पाहवत न्हवती . त्याचं अस वागण हृदयास त्रास दायक हि ठरत होतं .
त्याचा वेग कधी मंदावत तर कधी अधिक वेगाने धडधडत. एक दिवस हे सारं अनावर झालं नि हृदयाने ठरवलं आपण थोडस समजावून पाहू .
आणि त्याने सुरवात केली .
ऐकतोयस ना ? मी जे काही बोलतोय ते .. 
हो , ऐकतोय रे भावा..., सर्व काही ऐकतोय मला हे ठाऊक नाही असं नाही रे , सार काही कळतंय .
जीवन अवघ काही क्षणाचचं आहे , ठाऊक आहे.
आज  आहोत उद्या नसू हि . कोण जाणे कधी मृत्यूशी गाठ भेट घडेल , सांगता येत नाही
आनंदित जगायला हवचं यार ..
पण काही गोष्टी नीटशा कळत नाही रे . त्या विचारात मग दिवस रात्र गढून जातो .
 त्यातून बाहेर हि पडता येत नाही . किंव्हा कसं बाहेर पडावं ते हि कळत नाही .
घरा व्यक्तीरिक्त जेंव्हा आपला बाहेरील जगाशी संबंध येतो. तेंव्हा बऱ्याशच्या गोष्टींचा कळत नकळत आपल्यावर परिणाम होत असतो .
वेगवेगळ्या स्वभावाची , वेग वेगळ्या शैलीची माणसे आपल्या आयुष्याशी जोडली जातात वाटेवरल्या टप्प्या टप्प्या प्रमाणे आणि त्यातूनच मग काही अनामिक नाती निर्माण होतात , काही जिवाभावाची जिवलग प्रेमाची . मना मनाची ...
मग रक्ताची नाती नसली तरी आपण त्यात स्वतःला सर्वस्वी वाहून घेतो.
आनंद उपभोक्तो त्या क्षणांचा . त्यावेळेस वाटत देवाने आपल गाऱ्हांन ऐकलं !
आपल्याला हव ते त्यान दिलं. पण ते काही क्षणाचचं असतं अस पुढे समजतं .
कोणत्याही गोष्टीचा आनंद सदा सर्वकाळ टिकून राहत नाही रे ... तसंच काहीस दु:खाच देखील आहे .
पण शेवटी ते आठवणीतले गोजिरवाणे क्षणच आपली सोबत करतात आयुष्यभर . असो ...

प्रेमा सारखी हसरी आणि दुखी गोष्ट इतर कुठलीच नाही. 
प्रेम हेचि जीवन हे आजपर्यंत मी मानत आलो होतो . पण आता अनुभवाने शिकलोय प्रेम हे जरी जीवन मानलं तरी , जीवन म्हणजे प्रेम नाही रे . प्रेमा पलीकडे हि इतर गोष्टी आहेत . ज्यांचं मोल फार मोठ आहे .पण त्यात हि कुठे ना कुठे प्रेमाचा अंश हा दडलेला आहे हे हि तितकंच खरं आहे . .
छान ! म्हणजे अनुभवाने तुला शहाणे केले तर ; मनाचे मनातले हे अनुभवी बोल इतका वेळ शांतपणे एकूण घेतल्यावर हृदयाने हळूच स्मित हास्य केले अन बोलण्यास सुरवात केली.
'बरोबर आहे तुझं ... प्रेमाचा अंश हा सर्वत्र असतोच , कोणत्या ना कोणत्या स्वरूपांत , त्याचाशिवाय जीवनानंद तो कुठला रे'

फक्त अपेक्षांचं ओझं नको त्यात , असलं तरी त्याच भार इतकं नको घेऊ कि हे जीवनक्षण भकास वाटेल. दुखांनी व्यापलेलं .
आनंद तसा सर्वत्र ओसंडून वाहतच असतो रे...तू पहिलस तर..
पण तशी दृष्टी हवी पाहण्याची आणि तुझ्या वेळीच वळणाची .
तसं अडकून कुठेच राहायचं नसतं . नेहमी मार्ग शोधायचा तो आनंदाचा , हर्षाचा ..., मोकळ्या श्वासेचा , प्रकाशित जीवनाचा . बरोबर ना ? मना हो रे भावा..
दुसर्यांनसाठी जरुरू जगावं , पण त्या आधी स्वत:हा जगायला शिकावं . आनंद घ्यायला शिकावं . आनंद द्यायला शिकावं .
ह्यास जीवन ऐसे नावं !
नातं - हृदय अन मनाचं
संकेत पाटेकर
११.१०.२०१३

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१३

आई - माझी गोड प्रेमळ आई ......


काही दिवसापूर्वीच एक स्वप्न पडलं . त्यात आईच दर्शन झालं खरं. पण त्या स्वप्नाच अर्थ काही कळला नाही. संपूर्ण दिवस मात्र भीतीने कापरत गेला .
अजून देखील तो क्षण आठवतो अन काळजात चर्र होत . सकाळचे ८ वाजून ३५ मिनिटे झाली होती. बुधवार होता . घटस्थापनाचा पहिला दिवस - देवीच आगमन झालं होतं.
नेहमीप्रमाणे मी ऑफिस ला जाण्यसाठी बाहेर पडणार होतो. तेवढ्यात आई म्हणाली . मी सुद्धा येते तुझ्या सोबत . मी म्हणालो कशासाठी ? ती म्हणाली असच जरा फेरफटका मारण्यासाठी .
तेंव्हा माहित न्हवत . फेरफटका म्हणून बाहेर निघालेली माझी आई हि आम्हाला सोडून दूर कुठे जाणार आहे ते पुन्हा परतून न येण्यासाठीच . नशिबाची खेळी हि अजब असते . जे घडणार आहे ते घडणारच कसेही करून. आई सोबत मी बाहेर पडलो खरा . घरापासून साधारण १५-२० मिनिटे पुढे चालत आल्यावर कुर्ल्याला जाण्याकरिता मला बस दिसली . म्हणून मी धावत पळत जावून ती पकडली . जाता जाता मात्र आईला हातानेच दूरवरून निरोप दिला . आणि तोच शेवटचा क्षण ठरला तिला पाहिल्याचा .
ह्या नंन्तर मात्र आठवणीतच तिला आता पाहतो . तिच्या मायेचा स्पर्श अनुभवतो . तिचे बोल कानी साठवतो .कळत नकळत कधी डोळ्यातून आसवे गाळतो.
त्या दिवशी नियतीला असच काहीतरी घडवायचं होत . तिने एक खेळी केली . आई घरी परतली नाही हि बातमी सर्वांना रात्री उशिरा कळली . आणि तेंव्हा फार उशीर झाला होता . सकाळी निघालेली माझी आई कुणास ठाऊक कुठे दूरवर निघून गेली होती . ती रात्र , पहाट होईपर्यंत आम्ही रस्त्यावरून नुसत भटकत होतो . तिच्या शोधार्थ . पण नाही .....................ती परतली नाही .
एक मात्र सांगून गेली .हा प्रसंग घडण्याच्या काही दिवस आधी . माझी तुमच्यावर नजर असेल भले मी कुठे हि असेन . आणि ती नजरच आता आमच्यवर लक्ष ठेवून आहे
आई विना भिकारी म्हणतात ना ते खर आहे . मायेच्या स्पर्शासाठी मी आता दुरावलो . आईच्या उबदार कुशीत डोक ठेवून शांत पडून राहणं ते हि हिरावलं. आजारपणात इतरांपेक्षा जास्त काळजी घेणारी . बाजूला बसून डोक्यावरून प्रेमाचा अलगद हात फिरवणारी ती एकमेव आई ..सार माझ्यपासून दूर गेलं. आता फक्त आठवणी आहेत . त्या गोड मधुर तिच्या सहवासातल्या तिच्या शिकवनितल्या .
जे पुढ्यात आहे ते खायचं . जेवणाला नाव ठेऊ नये . हे तिने शिकवल . तसं लहान पण आमच गरिबिचच होतं . घरात रॉकेलच्या दिव्यावर आम्ही रात्र काढायचो . कधी एक वेळ मसाल्या भाताशी जेवायचो. तेलात लाल तिखट मसाला मीठ मिसळत भाताशी लावून लावून खायचो. अजून ती चव जिभेवर रेंगाळते . कधी एक वेळ उपाशी तर कधी मसाल्या भाताशी . तर कधी नुसत भात आणि सोबत कोरी चहा ,तेंव्हा सिलेंडर गस असा प्रकार न्हवता आमच्याकडे .त्यामुळे रॉकेल स्टोव्ह वर सर्व चालायचं . त्यसाठी हि आईची चाललेली धडपड मी पाहायचो . सकाळी सात ते आठ वाजल्यापासून ते दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत धुण्या भांड्याची कामे करत ती आम्हा सर्वाना सांभाळत होती . आणि त्यातच चांगले संस्कार करत होती.
आयुष्यात मी अजून कधी शिवीगाळ केली नाही .हि सुद्धा तिची शिकवण एकदा लहान पणी मित्राशी झालेल्या झटापटीत मी फक्त त्याला '' कुत्रा'' अस रागानेच म्हटलं होत . आणि ती शिवी मानून मी मनाशी पक्का निर्धार केला होता . एखाद्याला कुत्रा म्हणन हि देखील एक शिवीच .आणि तेंव्हा पासून अस बोलन हि मी सोडून दिल . हि सारी तिचीच शिकवण घरी वडिलांना दारू -तंबाखूच व्यसन असतना आम्हाला वाईट व्यसने कधी लागली नाही . हे हि तिच्यामुळेच.अशा किती तरी गोष्टी तिने शिकवल्यात . प्रेमाने समजावल्या त्या तिच्या अनुभवानेच .
त्यातलीच अजून गोष्ट म्हणजे :- माझा भाऊ आणि मी , तिचे शब्द जसेच्या तसे कानी आहेत . एकदा तिने सांगिलते होते . संकेत तू आणि भाऊ आप आपसापासून कधी दुरावू नका . एकत्रित राहा . भले हि काही हि होवो .
आईचा एक दंडक असे . मुलांनी मुलांमध्येच राहावे. मुलींनी मुलीनमधेच राहावे. मुलींच्या बाजूला बसने आईला खपत नसे . मग ती बहिण असो वा इतर कोण . अंतर ठेवूनच बसावं आणि बोलाव जे काही आहे ते. असे ती मला सांगे बहिणीच्या बाजूला हि अस अंतर ठेऊनच बसावं . ह्यावरून मात्र माझ नि आईच कधी पटल नाही.
लहानपणी मात्र आई कडे केलेला हट्ट अजून आठवतो . मला सख्खी बहिण नाही. म्हणून तिच्याकडे सतत रडत रडत सांगायचो मला एक बहिण हवी आहे. तेंव्हा त्यापुरत ती माझी समजूत काढायची . आणू ह ! आपण एखादी छानशी बहिण तुझ्यासाठी हॉस्पिटल मधून ... तेंव्हा मी कुठे शांत ह्वायचो .
आता ह्या सारया गोष्टी आठवतात ...........अन अलगद डोळे पाणवतात .
प्रेमाने राहायला तुने शिकवलं .
प्रेमाने वागायला तुने शिकवलं .
प्रेमानेच लहानच मोठ केलंस
प्रेमाशीच घट्ट नात तू जुळवून दिलंस.
माझी गोड प्रेमळ आई ....................... कधी तरी तू येशील परत .............हि माझ्या मनाची खात्री आहे .
संकेत पाटेकर
०५.१०.२०१३

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१३

जेंव्हा आपण काहीच नसतो ..


जेंव्हा आपण काहीच नसतो तेंव्हा आपल्याला कुणी विचारात घेत नाही .
जेंव्हा आपण काहीतरी असतो तेंव्हा लोक स्वताहून आपली विचारपूस करतात, जवळीक साधतात.
आयुष्य हे असं ... कुठल्यातरी एका वळणावरती , पाउल वाटेवरती आपल्याला समजून घेणार , आपलं ऐकणार कुणी एक नसतं. तेंव्हा त्या वळणावर त्या वाटेवर स्वतःला सावरतंच आपल्याला पुढे याव लागतं.
ज्या गोष्टींची ज्यावेळेस खरी गरज असते ती गोष्ट वेळेवर मिळतेच अस नाही . काही वेळा गरजेची ती खरी वेळ निघून जाते. आणि आपण मात्र अनुभवाने शहाणे होतो.
- संकेत
मनातले काही
०३.१०.२०१३