शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

काल्हेर रेती बंदर - आसपासची भटकंती | Kalher Reti Bunder


काल्हेर रेती बंदर - आसपासची भटकंती | Kalher Reti Bunder

आपण जिथे राहतो त्याच्या आसपासच अशी काही सुंदर ठिकाण असतात. जिथे गेलो की मन प्रसन्न होवून जातं. शरीर मनाभोवती असलेलं नको त्या विचारांची जळमटं त्या निसर्गमय जागी पोहचताच कुठेशी गुडूप होऊन जातात आणि तन मन कसं रिफ्रेश होतं.

हे ठिकाण ही असंच काहीसं .. समस्त काल्हेरकरांसाठी सकाळ संध्याकाळी निवांत फेरफटका मारण्यासाठीच एक उत्तम ठिकाण म्हणजे काल्हेरचं रेती बंदर हे ठीकाण होय. ह्यास विसर्जन घाट असेही म्हणतात. लहान मुलं, तरुण आणि जेष्ठ मंडळीचा सकाळ सायंकाळ येथे राबता असतो. कुटुंबियांसह अनेक मंडळी सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी म्हणून इथे येत असतात. येथेच बंदऱ्या मारुतीचे प्रशस्त मंदिर देखील आहे. मंदीराच्या आवारात निवांत बसण्यासाठी आसन व्यवस्था आहे. मंदिरातच विठ्ठल रखुमाईची मूर्ती, श्री गणेश मूर्ती, श्री साई बाबांची मूर्ती आणि शिवलिंग आहे. क्रिकेटसाठी प्रशस्त असं मोकळं क्रीडांगण आहे. छान बाग आहे. पण सध्या त्याचे काम चालू आहे. लोणावळ्यातील राजमाची परिसरात उगम पावणारी उल्हाद नदी हि पुणे रायगड ठाणे जिल्ह्यातून १२२ किलोमीटरचं अंतर पार करत ..कल्याण खाडीजवळून पुढे इथूनच समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे सांजवेळेचे इथले दृश्य फारच मोहक आणि सुंदर दिसते त्यातच सूर्योदय आणि सूर्यास्त हे माझे खास आवडीचे आणि जिव्हाळ्याचे विषय. त्यामुळे वेळ मिळताच क्षितिजाचे हे रंगरूप पाहण्याकरिता, उगवत्या आणि मावळत्या सूर्यनारायणाची हसरी मुद्रा आणि त्या छटा पाहण्याकरिता येथे आमचं येणं जाणं हे सुरुच असतं. नुकतीच इथे बोटिंग सेवा देखील सुरु झाली आहे. (संध्याकाळी ५ ते रात्री ८ ते ११ ) प्रति मानसी ५० रुपये तिकीट. अर्धा तासाभराची हि सैर सफर आपल्याला इथल्या इथे मनसोक्त आनंद देऊन जाते. हे मात्र नक्की - संकेत पाटेकर काल्हेर रेती बंदर - भिवंडी ---------------------------------------------------------------------------------------------------- कसे याल ? ठाणे सिडको येथून शेअर रिक्षा पकडायची ( ४० रुपये सीट ) आणि काल्हेर पाईप लाईनला उतरायचं. (२५-३० मिनिट) तेथून चालत अथवा रिक्षाने इथपर्यंत पोहचता येते. काल्हेर पाईप लाईन ते रेती बंदर साधारण १ किलिमीटर अंतर आहे. सिडको येथून बसेस हि उपलब्ध आहे. पूर्णा, काल्हेर