..याला प्रेम म्हणतात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
..याला प्रेम म्हणतात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ६ मार्च, २०१६

''आयुष्यात एकमेकांना उपलब्ध राहणे , याला प्रेम म्हणतात''

दिवसातून किती वेळा, तिचा फोटो असा बघत असतोस ? झूम इन झूम आउट करत ? 
तिने एकाकी सवाल केला.
तिच्या अश्या ह्या अनपेक्षित उठलेल्या प्रश्नाला, काहीतर उत्तर द्यावं 
म्हणून त्याने , तिच्यावर एकवार नजर रोखली. अन क्षणाचा विलंब न घेत, पुन्हा 
आपल्या मोबाईल मधला तिचा फोटो न्याहाळत , धुंद स्वरात म्हटलं . 
‘’ बऱ्याचदा....

तसा बऱ्याचदा...मनात येईल तेंव्हा तिचा 'चेहरा' स्तंभित झाल्यासारखा ,एकसारखा 
निरखत असतो. . 
वेळेचं भान उरत नाही कि माझं मला कळत नाही . पण तो चेहरा , त्या चेहऱ्यावरील ते स्निग्ध भाव ,...
मला अजूनही तिच्या प्रेमात फ़रफड ओढवून नेतात.’’ 

भिरभिरनाऱ्या भुंग्याला , आपल्या सुवासिक रसानं अन सुंदरश्या रंगानं , फुलानं 
जस आकर्षित करून, आपलसं करून घ्यावं ना तसंच काहीस ...
ऐकता ऐकता , तिने त्याकड एकवार पाहिलं. आठवणीच्या भावगर्दीत धुंद होवून.. 
मनातील तळ तो उघड करत होता.

प्रेम हि भावनाच , अगं ! सौंदर्यपूर्ण अशी आहे... मनाच्या डोहीतून अलवार 
तरळणारी , हळुवार उमळणारी , अन दोन हृदयी मनाला , एकाच जाणीवेच्या स्पंदनिय धाग्यानं घट्ट रोवून ठेवणारी. 
मध्यंतरीच कुठेसी माझ्या एक वाचनात आलेलं . संद्दीप खरेची एक ओळ होती. .
''आयुष्यात एकमेकांना उपलब्ध राहणे , याला प्रेम म्हणतात''. 
किती , साध्या अन सहज सोप्या शब्दात त्याने मांडलं आहे बघ ..

आयुष्याच्या प्रत्येक प्रवाही वाटेवर ..मग ती वाट कितीही खडतरं अन आडवळनाची 
असो , ‘एकमेकांना हव्या त्या वेळी , हवं तेंव्हा उपलब्ध होणं म्हणेचच प्रेम ’ 
अस जेंव्हा घडेल तेंव्हा , नाती खऱ्या अर्थानं प्रेमाच्या गर्द सावलीत सुखाने नांदतील. पण हा तिथे मनाचा सामंज्यसपणा हि हवा. एकेमकांना समजून घेण्याची मूळ वृत्ती हवी.
हम्म ..
चल आता चहाचा घोट घे ...बोलतच सुटला आहेस, वेड्या सारखा .. 
चहा हि थंड झाला बघ .. ( त्याच्या चेहऱ्यावरील प्रेम आवेशात गढलेले ते भाव अन बोल ऐकून , अजून त्याच्या मनास उगाच सल नको म्हणून तिने मधेच अडवून म्हटले ) 
असू दे रे चालेल . थंड चहा पिण्यात हि काही और मजा असते. त्याने हि शब्द ओढले.
संध्याकाळच्या शांत लहरीमध्ये ... नेहमीच्याच त्या कट्ट्यावर...एका खास मैत्रिणीसोबत , विषय रंगत चालला होता. 
विषय अर्थात , 'प्रेम'..नकळत जीवनात आलेलं , जाणलेल अन अनुभवलेलं.

शेवटी ‘मित्र’ हेही आधारच, आपल्या जीवनाचा टेकू , म्हणून मनं हि आपुसक 
त्यांच्यापुढे मोकळं होत जातं . तो हि मोकळा होत होता ...हलका होत होता.

प्रेम ह्या विषयाची व्याप्तीच , खरं तर फार मोठी आहे. ती मापता तोलता येत नाही . ती अनुभवता येते .त्याची प्रचीती घेता येते . 
चहाचा दोन एक घोट घेत त्याने पुन्हा आपल्या कथाकथनला सुरवात केली.
वाऱ्याने जसं कुठूनसं अलगद यावं अन आपलं अंग अंग रोमांचित करून जावं. तसंच हे प्रेम. ..आनंद देतं, हर्षवून नेतं.
स्वप्नांचे नवे क्षितीज घेऊन ती हि अशीच माझ्या आयुष्यात आली. अन सुंदर क्षणाचा अनमोल ठेवा माझ्याकडे अलगद सुपूर्द करत, स्वप्न पुरे केल्याविनाच एकाकी माघारी निघून गेली. 

मला न समजताच, न जाणून घेता ..त्याचंच मला वाईट वाटतं अन त्रास होतो.
चुकलं कोण अडलं कोण हा प्रश्न गौण आहे. प्रेमात त्याला थारा नाही. पण हव्या त्या वेळी , हवं तेंव्हा आम्ही आम्हालाच असे उपलब्ध झालो नाही. वेळेच गणित जुळवता आले नाही. त्यामुळे एकाच वाटेवर चालण्याचे 
आमचे मार्ग हि वेग वेगळे झाले . 
तसं तिने खूप काही दिलं मला...त्या तेवढ्या वेळेत. तेच माझ्यासाठी खूप आहे, अनमोल आहे. 
म्हणून हा तिचा फोटो , त्यातील ते निरामय भाव एक सारखा असा निरखत राहतो . अन आठवणीत एकाकी हरवतो .

तुला सांगू , ह्या प्रेमात खूप ताकद आहे . ते ओढवून घेतं आपल्याला . अन विविधरंगी भावनांच दर्शन घडवतं. 
एखाद्यावर हक्काने रागावण्यापासुन ,हसवण्यापर्यंत , लहानग्या सारखं एखाद 
हट्ट करून , समजून देण्यापर्यंत, वा समजून घेण्या पर्यंत .... विविध ढंगी अस दर्शन..
तशी ह्या प्रेमाची गोडीच निराळी असते बघ ..
एकदा आपल्या अंतरंगात ती भिनली कि आपण आपलेच राहत नाही .उधळून जातो . मिसळून 
जातो.

मी ह्या प्रेमात सफल झालो नाही. पण मी 'प्रेम भावना' जगलो ...तेच पुष्कळ आहे .
- असंच काही सुचलेलं ....शब्दात वेचलेलं . 
- संकेत पाटेकर
०५.०३ ..२०१५





सोमवार, ९ जून, २०१४

जगण्याला एक वेगळ रूपं देत ' प्रेमं.'

प्रेम हे शब्दात व्यक्त करू नये असं म्हणतात .. पण ज्यांना ते आपल्या सहवासातून कळत नाही . 
किंबहुना कळत असूनही त्याबद्दल हवीतशी प्रतिक्रिया त्यांसकडून मिळत नाही . 
तेंव्हा मात्र मनातल्या भावनेला ' शब्दात' च गुंफाव लागतं.
काही वेळा ओरडून सांगाव लागतं. अग वेडे ..प्रेम आहे तुझ्यावर ...जीवापाड ..ऐकतेसं ना ?
तर काही वेळा ओरडून हि हवा तो प्रतिसाद न मिळाल्यास निशब्द राहून ...
फक्त योग्य त्या क्षणाची वाट पहावी लागते.

प्रेम मिळेल न मिळेल हे कधीच सांगता येत नाही .
कारण  दुसऱ्या  मनाचा अचूक धागा कधीच पकडता येत नाही .
अपेक्षा तर नक्कीच असते आपली त्यांच्याकडून ते निर्मळपणानं मिळाव म्हणून ..
पण अपेक्षापूर्ती न होवूनही जिथे प्रेम केले जाते ते खरे प्रेमं ...
हव्या त्या व्यक्तीचं प्रेमं मिळालं तर हे जग स्वर्गाहून हि सुंदर भासतं. 
पण तेच जर नाही मिळालं तर खूप त्रास सहन करावा लागतो. सहन करण्याची तशी तयारी हि ठेवावी लागते.
पण एक मात्र नक्की ,ह्या सर्वांतून आपण हळूहळू का होईना प्रेमाचे धडे गिरवत जातो .
प्रेमा बद्दलची व्याख्या आपल्या मनी तयार होत जाते .
प्रेम मिळालं अन नाही मिळालं तरी..जगण्याला एक वेगळ रूपं देत प्रेमं.
खऱ्या अर्थानं नवी दिशा नवा ध्यास देत प्रेमं ..
मनातले काही ..
संकेत य पाटेकर
०९.०६.२०१४
खालील इमेज हि नेट वरून घेतलेली आहे .

शनिवार, १९ एप्रिल, २०१४

प्रेम म्हणजे नुसतंच काही बाह्य सौंदर्य नाही...

प्रेम म्हणजे नुसतंच काही बाह्य सौंदर्य नाही ,
पाहताच क्षणी एखाद्याच्या प्रेमात पडणे म्हणजे आपण त्या व्यक्तीच्या दिसण्यावर , त्याच्या सौंदर्या वर प्रथम लुब्ध होतो , ते आपल्याला आकर्षित करत . पण ते काही प्रेम न्हवे .
प्रेम म्हणजे म्हणजे मना मनातल्या गोष्टींच सहजरीत्या पण हळुवार तयार होणार ..
समजुद दारपणाच रसाळ मिश्रण. 

दोन व्यक्ती मध्ये जेंव्हा मना मनाचं समजुददारपणाच , आपुलकीच नातं जुळत तेंव्हा त्यात कुठे प्रेमाचा ओलावा निर्माण होतो. तेच ते प्रेम .
 मना मनातल्या गोष्टी समजायला समजून घ्यायला वेळ हा हवा असतोच , आणि तो द्यावाच.
 एखाद्या व्यक्तीच्या सुंदर दिसण्यावरून जर तुम्ही प्रेम प्रेम करत असाल.
तर ते प्रेम न्हवे . पण हल्ली असंच काहीस घडतंय , आणि त्यातून लग्नाच्या बेड्या बांधल्या जातायेत.
मना मनाला समजून घेण्या आधींच लग्नाच्या बेड्यात दोघे बंदिस्त होतात.
आणि नंतर सुरु होते ती हात घाईची लढाई . एकमेकांशी पटेनास होत. शुल्लक कारणावरून रोज वाद विवाद घडू लागतात.
त्यात इतर अडचणींची , इतर व्यक्ती समस्यांची भर पडते . मन त्यात खचल जातं.
 मानसिक सुखच हरवून जातं .  तन - मन सर्वच तणावा खाली वाहू लागतं. आणि त्यातच मग अविचारंच जाळ पसरल जातं आणि एकमेकांपासून दूर होण्याची दुर्बुद्धी सुचते.
त्यात बिचारी सच्चे मनाने बंधनात अडकलेली व्यक्ती हताश होवून जाते , आणि तिच्या सोबत तिचे नातेवाईक मंडळी हि...

लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ न्हवे कि खेळायचं अन सोडून द्यायचं वाट्टेल तेंव्हा ...आणि प्रेम म्हणजे हि काही नुसत बाह्य सौंदर्य न्हवे कि दिसलं अन जडलं. 
प्रेम म्हणजे नातं मना मनाच्या सौन्दर्याच . ते सौंदर्य कायम जपाव लागत. तरच ते प्रेम प्रेम ठरत .
मनातले काही ...
नातं तुझं माझं
- संकेत पाटेकर
१८-०६.२०१३

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१३

जीवनात हर एक स्वभावाची माणसे भेटतात...


'' प्रेमाचा एक चतकोर हि आनंदाचा अंकुर फुलण्यास पुरेसा असतो''.
जीवनात हर एक स्वभावाची माणसे भेटतात.
प्रत्येक पाउल वाटेवरती एक ना एक नाती जुळतात . प्रत्येकाचा स्वभाव तसा वेगळा , प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी. प्रत्येकाशी आपलं  मन जुळेलच अस होत नाही . तरीही प्रत्येकाला हृदयी सामावून घ्याव लागतं .
कुठेतरी तडजोड करावी लागते .मनास समजून घ्याव लागतं.
भावनांना हि कधी आवर घालावं लागत .कारण माणसं महत्वाची असतात . नाती महत्वाची असतात .हर एक क्षण महत्वाचा असतो .
जीवन अशा हर एक व्यक्तींनी , ज्या त्या नात्यांनी गुंफल आहे . ते शोभिवंत आपल्याला करावं लागत. वेळोवेळी त्याची काळजी घेऊन , ' तरच त्यातल नव तारुण्य कायम राहतं.
कोण गरीब कोण श्रीमंत, कोण छोटा कोण मोठा ह्याच्याशी काही देण घेण नसत .
प्रेमाचा एक चतकोर हि आनंदाचा अंकुर फुलण्यास पुरेसा असतो.
प्रत्येकाशी आपला स्वभाव आपले विचार जुळतीलच अस नाही . तरीही वेळोवेळी प्रत्येकाशी त्यांच्या स्वभावानुसार, त्यांच्या विचारसरणीनुसार आपल्याला त्यात समरस व्हाव लागत .
हे मानवी स्वभाव वेगवेगळे रंगच आहेत जणू .. प्रत्येक रंगाच अस एक खास वेगळेपण असत .
तरीही त्यातल्या त्यात सफेद रंगाच एक खास वैशिष्ट्य आहे .तो कोणत्याही रंगात मिसळता येतो .
आणि कोणत्याही रंगात मिसळताना तो त्याच मूळ रूप मिटवत नाही तर त्यात त्यात तो अगदी सामावून जातो त्यांना हव तस. ...!!
स्वभाव हा असा हवा ''सफेद'' रंगासारखा ..
सर्वात मिसळता येणारा , त्यात समरस होणारा .
संकेत य पाटेकर
मनातले काही ..
१३.११.२०१३

गुरुवार, १७ मे, २०१२

प्रेम..पाहायला गेल तर अवघे दोनच शब्द ..

प्रेम
पाहायला गेल तर अवघे दोनच शब्द आहेत हे 'प्रेम' पण त्या शब्दात किती भव्यता आणि विशालता दडलेय .
प्रत्येकजण आप आपल्या आयुष्यात 'प्रेम मिळाव' म्हणून किती धडपडत असतो , तळमळत असतो, रडकुंडीस देखील येतो !! कारण प्रेम हे जीवन आहे . जगण्याची एक शक्ती आहे , प्रेरणा आहे.
जीवनात प्रेम, सर्वांनाच मिळत नाही , सर्वांच्या भाग्यात नसत ते . , कुणी वंचित राहतो आईच्या प्रेमापासून , कुणी वंचित असतो बहिणीच्या मायेपासून तिच्या प्रेमळ सहवासापासून कुणी वंचित राहतो वडलांच्या कठोर पण तितक्याच प्रेमळ छायेपासून कुणी वंचित राहतो भावाच्या खेळकर , खोडकर आणि प्रेमळ सहवासापासून
प्रेम प्रेम प्रेम असत............. सर्वांनाच ते हव असत पण भाग्यात मात्र कुणाच्या असत तर कधी नसत. दु:ख त्याचच तर फार असत ..!!
मनातल काही !!
संकेत पाटेकर