शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

सांत्वन..

एखादी भावना अनावर झाली कि 'अश्रू' किंव्हा 'राग' किंव्हा दोन्हीही अगदी जुळ्या भावंडा सारखी एकत्रितपणे नांदू लागतात .
तेंव्हा ऐकणारा हि घायाळ होतो . विव्हळतो. आज हि तसंच काहीस झालं . 
जितक्या सहजतेने शब्द कागदावर उमलतात ना , तितक्याच सहजतेने तेच शब्द , एखाद्या मनाचं सात्वनं करू शकत नाही .
हि एक खंत अजूनही ह्या मनास कुठेशी टोचत राहते. सलत राहते .
आज पापण्या पुन्हा एकदा जडावल्या ..पुन्हा एकदा मन स्तब्ध झालं .
तिच्या एक एक करुण शब्दाने ... ज्यात फक्त वेदना होत्या , अन त्या  वेदनांचा न सोसणारा दाह..कालपटून टाकणारा...करपून टाकणारा ....
कसं असतं आयुष्यं एकेकाचं ..... ऐकताना मेणासारखं वितळायला होतं अगदी .
पण ते मेण हि प्रकाश वाटा देऊन मोकळ होत ओ ,आधार देतं , असलेला अंधार नाहीसा करून ..
इथे नुसतंच वितळायला होतंय ... प्रकाश धर्म काही..वाट्याला नाही . तीच ठेच लागतेय मनाला .
जीवन हे संघर्षमय आहे. लढा हा आहेच अन तो असणारच...जगण्यासाठी. 
पण त्यासाठी हि आधार हवा असतो . कुणाचा न कुणाचा तरी त्याशिवाय उभं राहता येत नाही.
विश्वास अन प्रेम ह्या दोन धाग्यांनी नातं घट्ट ओवलं जातं . मग ते कुठलही नातं असो.. 
त्याघट्टपणाच्या आधारावरच ते पुढे सरत जातं. पण तो आधारच कमकुवत झाला तर...
आपलीच माणसं जेंव्हा आपल्याशी तर्हेवाईकपणे वागतात तेंव्हा ...नकोस वाटत अगदी...
हे जगणंच नकोस वाटतं ..
पण जगायला हवा यार ..आशेचा एक दिवा रोज उगवतोच ना ..नवी पहाट घेऊन ...इतकं सहन केलं मग आता धीर का सोडवा.
क्षण बदलतात . आणि त्या क्षणानुसार हि नको असलेली परीस्थितीही... , विश्वास ठेव . आशा ठेव . सारं बदलेल . नक्कीच बदलेल .
दुख प्रत्येकाला आहे ...त्याचं स्वरूप मात्र वेगवेगळ आहे. 
आपण किती सहन करतो ..ते आपल्यालाच माहिती असतं. दुसऱ्याला कितीही सांगितल तरी त्यातली ती दाहकता आपल्या इतकी त्यापर्यंत पोहोचणार नाही. हे मान्य . 
खंर तर सात्वनासाठी शब्दच नसतात...
वपुंच्याच शब्दात म्हणावं तर सांत्वन म्हणजे दुःखाच मूल.
मूल आईपेक्षा मोठं कसं होईल?मूल मोठं व्हायला लागलं की आई आणखी मोठी व्हायला लागते.म्हणून,समजूत घालणारं कुणी भेटलं म्हणजे हुंदके वाढतात.
तुझे हुंदके नजरेने पहीले नसले तरी हृदयाने ते जाणलेत .. ऐकलेत मी..
येणारा प्रत्येक क्षण हा कसोटीचा आहे नि असतो. . त्यात तोलून मापून आपण बाहेर पडतो . पडत असतो. ती आशावादी जिद्द मात्र कायम ठेव. त्यातून बाहेर पडण्यासाठी ..
काहीच उरलं नाही अस बोलू नकोस ...उद्याचा दिवस नक्कीच काही तरी घेऊन येईल . 
आनंदी वलयासह ...बागडत...बागडत...
तुझाच ..
एक मित्र 
- संकेत
३०.१०.०१५


सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

माणूस आहे ...तो चुकणारच ...

माणूस आहे ...तो चुकणारच ...

प्रेमात सगळ 'क्षेम' असतं अस म्हणतात . पण त्यासाठी क्षमाशील वृत्ती मुळात असवी लागते. अन प्रेम आतून असावं लागतं. खरं खुर.. हृदयाच्या सुप्त वाणीतून प्रकट झालेलं. 
तेंव्हा कुठे झाल्या गेल्या क्षणांना किंव्हा दुखावलेल्या आपल्या मनाला पुन्हा शांत करून , पुन्हा सार आपलसं करून . सारं विसरून, नव्याने नातं झुलवता येतं. 
मुळात प्रेम हे 'हृदय' जोडणं शिकवतं ..तोडनं नाही. 
दोन मनं एकत्रित आली कि तडजोड हि आलीच . नातं म्हटलं कि वाद विवाद आलेच ...मग ते शुल्लक कारणावरून असतील ..वा कुठलेही .. 
पण त्या एका कारणासाठी, त्या मागची पार्श्वभूमी न पाहता उमगता ..
तुम्ही जर टोकाची भूमिका घेऊन, एकमेकांपासून दूर जात असाल तर त्याला काही एक अर्थ नाही . त्या नात्याला हि अर्थ उरत नाही .
एका कारणावरून एवढ्या घडामोडी होत असतील .तर पुढचं आयुष्यं एकत्रित काढण अथवा जगण कठीण आहे.
माणूस समजायला अन समजून घ्यायला आयुष्यही अपुरं पडतं. 
जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा अन त्या त्या वेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीचा वा वातारणाचा परिणाम एकंदरीत आपल्या मनावर होत असतो. 
अन त्यातून वेगवेगळ्या भावछटा ना ना रुपी ढंगान प्रकट होत असतात. अन त्यानुसार आपण व्यक्त होत जातो.
स्वभावाचे विविध पैलू ...अश्यावेळी आपलं दर्शन देतात. मग ते आपल्याला अपेक्षित नसलेले स्वभाव गुण असतील वा दोष .. त्यावेळेस समोरच्याने बावरून न जाता . त्या मागची कारणे लक्षात घ्यावी. 
सांभाळून घ्यावं एकमेकांना ...
एका क्षणात नांत तोडण्याची बतावणी कशाला ?
माणूस आहे ...तो चुकणारच ....., तो काही सर्व गुण संपन्न नाही. देव नाही.
आपली चूक मान्य करण्याची वा पुन्हा नात्यात बहर आणण्यची त्यात धमक असेल तर माफ करायला काही हरकत नाही. 
मुळात आपली बाजू समजून माघार घेण वा आपली चूक मान्य करणं हि क्षमाशील मनाची अन सदृढ नात्याची लक्षण आहेत. 
तो सावरतोय मग तुम्ही का नको सावरायला ?
चूक कोणाची हि असली तरी एकाने बाजू सावरायची असते. नात्याची फळी म्हणून तर मजबूत राहते. त्याला पोखरून काढणाऱ्या वाळवीची कीड लागत नाही . ज्याला प्रेम कळलं ..त्याला नातं सांभाळाव लागत नाही ते आपुसकच सांभाळलं जातं.
आपल्या अपेक्षानुसार त्याने वागायलाच हवं किंव्हा असंच वागणं तुझं अपेक्षित आहे हि आपली वृत्ती सोडायला हवी .
समोरच्याच्या अश्या अनपेक्षित वागण्याने हृदयास घाव बसतो हे मान्य ..ती जखम काही वेळा भरून हि येणारी नसते. पण तरीही समोरच्याने आपली चूक मान्य केली ..तर त्याला माफ करायला हवच. 
तेवढेच ते घाव हि विरून जातील. 
प्रेम आहे नं ...मग सांभाळायला हवंच एकमेकांना नाही का ?त्यासाठी नातं का तोडावं ? 
मन तुटलचं तर ते पुन्हा जोडता यायला हवं . 
माणूस आपल्या माणसाशिवाय अन त्याच्या प्रेमाशिवाय जगू शकत नाही. त्याला आपलीच माणसं जवळ लागतात. प्रसंगी त्याला समजून घेणारी प्रसंगी समजून देणारी ...!
इथे मंगेश पाडगावकरांच्या काही ओळी आठवतात . 
प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!
नातं तुझं माझं... 
संकेत य पाटेकर 
१२.१०.२०१५