शुक्रवार, २७ जुलै, २०१८

'जडण-घडण'


आपल्या सहज मोकळ्या 'स्वभाव शैलीनुसार' आणि 'कर्तृत्वानुसार'जो तो ज्याच्या त्याच्या मनावर आपल्या 'अस्तित्वाची' छाप उमटवत असतो रे, 
आणि मिळवत जातो 'आपलेपणाचा गोडवा'...
आणि आपल्या प्रति असलेला 'प्रेमाचा पाझर...'जुळविलेल्या नात्यांच्या त्या अगणित रसिक गोफणीतून..
कळतंय..ना ?
तू स्वतःला आधी घडवं, तयार कर... सिद्ध हो..
वपुंच त्ये एक वाक्य कायम लक्षात ठेवून..

"अधिकार मागायचे नसतात ते मिळवायचे असतात"  कळतंय?
ह्या वाक्यातील त्ये जे 'मिळविणं'आहे ना त्याला मी प्रेम असं संबोधतो. 
येतंय का काही ध्यानी..?

सोप्प आहे बघ..
एखाद्या हृदयी गर्भात आपल्या अस्तिवाची ज्योत फुलविणं आणि त्या ज्योतीसोबत ..
आपलेपणाचा प्रकाश गंध उजळवून ,ते अंतरंग आनंदून देणं हे म्हणजे प्रेम.
त्या प्रेमाशी ,त्या अंतरंगाशी तू एकरूप हो, आनंद हो आणि माणसं जोडत जा..

आणि हो ...एक लक्षात ठेव.
सुख मोजयच नसतं. ते जगायचं असतं.
ते जगणं हो...
सहज लिहता लिहता
संकेत पाटेकर
२६/०७/२०१८