माझ्याबद्दल थोडं काही

नमस्कार मित्रहो ,  

संकेत यशवंत पाटेकर उर्फ संकु ,
एक वाचक , एक श्रोता , एक भटक्या , आणि रोजच्या जीवनातून जे अनुभव गाठीशी येतील ते अलगद कागदाशी  उमटवणारा >>>>  मी तो एक...

सहज कुणात मिसळत नाही . पण मिसळून गेलो कि स्वतहा  मी उरत नाही असा>>> मी तो एक...
वाचनाची आवड आहे , त्यामुळे हळू हळू थोडाफार लिहायला लागलो . आणि अजून हि लिहत आहे ...
लिहत राहीन .

महाराष्ट्रात  जन्म झाला . त्यामुळे धन्य झालो .
आपुल्या शिवरायांचा पराक्रम , त्यांची महत्वपूर्ण कामगिरी , लहानपणापासून ऐकत आलो , वाचत आलो. त्याने उर अभिमानाने फुलून जाई .
पुढे सह्याद्रीतले आपुले हे ऐतिहसिक ठेवा जपणारे गड -किल्ले खुणावू लागले.
आणि सह्याद्रीतल्या माझा मार्ग मोकळा  झाला. त्यात गो. नि दांडेकर . प्र के घाणेकर , आप्पा परब   ह्यांची पुस्तक हाती आली . आणि  दुर्ग भ्रमंतीला ला खर्या अर्थाने सुरवात झाली .

आजवर जवळपास साठ  एक किल्ल्यानां  भेट देता आली. अन पुढे हि देत राहीन ...
कारण सह्याद्रीचं  एकदा का वेड लागलं कि पाऊलं  आपुसकच  त्याकडे धाव घेतात .
तिथेच कुठे आपली हि भेट गाठ होईल कधी ...चला तर मग भेटू...

ब्लॉग लिंक : 
माझे ट्रेक अनुभव (वेड सह्याद्रीचे ) 
sanketpatekar.blogspot.in

आपल्या प्रतिक्रिया ब्लॉग बद्दल नक्कीच कळवा .
E- mail Id : sanketpatekar2009@gmail.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .