बुधवार, ३० मे, २०१२

खर चुकतो तो इथे आपण ..............

मनं .............
समोरील व्यक्तीच्या मनात आपल्याविषयक, आणि आपल्या मनात समोरील व्यक्तीविषयक काय विचार आहेत...काय भावना आहेत , किती प्रेम आहे , किती काळजी आहे ......हे कधी कळतंच नाही कारण हे मनं कधी कळतंच नाही ...कुणाचं कुणाला .. :( कळलं तरी फार उशिराने ते कळतं ...
तेंव्हा आपण एक तर तिच्या नजरेतून फार उतरलेलो असतो .....किंवा आपल्या मनात तिच्याविषयक प्रेम कुठेतरी कमी झालेलं असतं.
मनाची हीच गोष्ट खूप खटकते ... आपल्या मनात तिच्याविषयक असलेल प्रेमळ भावना ...तिला कळतच....नाही आणि बहुदा तिच्या मनातली आपल्याविषयक असलेली ' प्रेमळ भावना' आपल्यालाही कळत नाही ....
मनं हे अस..................मनं हे असं..
miss u a lot...!! संकेत य पाटेकर
२१.०५.२०१२
सोमवार

आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती सोडून का जाते रे ?

आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती सोडून का जाते रे ?
काल सायंकाळी ऑफिस मधून घरी परतत असताना ... एक मेसेज आला मोबाईल वर जवळच्याच एका व्यक्तीचा .. त्यात तिने प्रश्न केला होता ...
आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती सोडून का जाते रे ?
काही क्षण त्या प्रश्नाकडे नजर माझी स्थिरावली गेली. अन क्षणात वाऱ्या गतीने मनात विचारांचे चक्र गरगर फिरू लागले . भूतकाळाच्या आठवणीत मनं कस गढून गेल.
का दुरावते ती व्यक्ती जिच्यावर आपण मनापासून प्रेम कराव ? का होत अस ? काय चुकतं आपलं ?
पहिली गोष्ट : आपण त्या व्यक्तीशी कसं बोलतो कस वागतो कस आचरण करतो ? त्यावरून तिच्या मनात आपल्या विषयीक प्रेम भावना व आदर निर्माण होत असतो.
व त्याप्रमाणेच तिचं आपल्याशी बोलणं वगैरे होत असतं.
दुसरी गोष्ट : काही वेळा ...वेळे अभावी ...व परिस्थितीच्या कचाट्यात सापडल्यामुळे त्या व्यक्तीला आपणास वेळ देता येत नाही .
भेटता येत नाही ..नि बोलता हि येत नाही . हे खर असत पण ते आपणास खोट वाटू लागत .. ती व्यक्ती जाणून बुजून आपल्याशी अस वागत आहे ह्याच तंद्रीत आपण राहतो . त्यामुळे कधी कधी अस वाटून जात . कि ती व्यक्ती आपणा पासून दुरावत चालली आहे .
तिसरी गोष्ट : आपल इतक प्रेम असत त्या व्यक्तीवर .. कि सतत आपण त्या व्यक्तीचाच रात्रंदिवस विचार करत राहतो तिच्याविना आपणास दुसर काही दिसत नाही किंवा काही सुचतच नाही . अशा वेळी समोरील व्यक्ती जीवन काय आहे , आपल ध्येय काय आहे . .. प्रेमा पलीकडे सुद्धा एक जग आहे . हे दाखवून देण्यासाठी आपणापासून काही अवधीसाठी स्वताहाच्या मनावर दबाव टाकून दूर राहते . आपल्या हितासाठी आपल्या भल्यासाठीच ..!!
बघा माझं म्हणणं पटत का ते तुम्हाला ...
संकेत य पाटेकर २४.०५.२०१२
गुरुवार

गुरुवार, १७ मे, २०१२

प्रेम..पाहायला गेल तर अवघे दोनच शब्द ..

प्रेम
पाहायला गेल तर अवघे दोनच शब्द आहेत हे 'प्रेम' पण त्या शब्दात किती भव्यता आणि विशालता दडलेय .
प्रत्येकजण आप आपल्या आयुष्यात 'प्रेम मिळाव' म्हणून किती धडपडत असतो , तळमळत असतो, रडकुंडीस देखील येतो !! कारण प्रेम हे जीवन आहे . जगण्याची एक शक्ती आहे , प्रेरणा आहे.
जीवनात प्रेम, सर्वांनाच मिळत नाही , सर्वांच्या भाग्यात नसत ते . , कुणी वंचित राहतो आईच्या प्रेमापासून , कुणी वंचित असतो बहिणीच्या मायेपासून तिच्या प्रेमळ सहवासापासून कुणी वंचित राहतो वडलांच्या कठोर पण तितक्याच प्रेमळ छायेपासून कुणी वंचित राहतो भावाच्या खेळकर , खोडकर आणि प्रेमळ सहवासापासून
प्रेम प्रेम प्रेम असत............. सर्वांनाच ते हव असत पण भाग्यात मात्र कुणाच्या असत तर कधी नसत. दु:ख त्याचच तर फार असत ..!!
मनातल काही !!
संकेत पाटेकर

आनंद आनंद आनंद हे आनंद म्हणजे तरी नक्की काय हो ?

आनंद आनंद आनंद हे आनंद म्हणजे तरी नक्की काय हो ?
१) मनाच्या कप्प्यात कुठेतरी कुणासाठी तरी एक जागा असणं..प्रेम असन तसेच समोरच्या व्यक्तीमध्ये सुद्धा तसंच काहीस मिळत जुळत असन अस दिसन आणि ते एकमेकांना समजण म्हणजे आनंद .
२) अचानक अनेक वर्षांनी महिन्यांनी दिवसांनी आपल्या प्रिय व्यक्तीचा किंवा मित्र मैत्रिणीचा फोन आला ...तेंव्हाचा तो क्षण म्हणजे आनंद
३) एखाद्या जिवलग मित्राची- मैत्रिणीची आपल्या नात्यातील व्यक्तीची वर्षानुवर्षा नंतर जी अचानक योगायोगाने म्हणा जी भेट घडते ..तेंव्हाचा तो क्षण म्हणजे आनंद
३) वणवण भटकून अथक परिश्रमाने मिळवलेला तो अन्नाचा एक दाणा म्हणजे आनंद
४) यशाच्या उंच शिखरावर आपण उभे असताना आपल्या आई वडलांच्या डोळ्यातून वाहणारे ते आनंदअश्रू पाहणे म्हणजे आनंद
५)आईच्या मांडीवर आपण कितीही मोठ झालो तरी शांत डोक ठेवून निजण तेंव्हाचा तो आनंद
६) पावसाच्या पहिल्या सरीत आंघोळ करणं तो म्हणजे आनंद
७)२-३ तासाच्या अवघड चढणी नंतर पहिला पाउल जेंव्हा पाहिलं पाउल गडाच्या माथ्यावर पडत तो क्षण म्हणजे आनंद
८) अथक परिश्रमानंतर एखाद्या वस्तूचे पक्षी प्राण्याचे आपल्याला हवा जसा फोटो मिळून जातो त्या समाधानात मिळणारा तो आनंद
अशा आनंदाच्या अनेक व्याख्या देता येतील ...मला इतक्या देता आल्या ....आपणास बघा जमतंय का ..!!
संकेत य पाटेकर
१०.०५.२०१२
मित्रहो
जवळ जवळ १०० पैकी ९० टक्के लोक (त्यात अडाणी आणि सुशिक्षित आणि नेते मंडळी हि) हे घरातून बाहेर पडल्यावर आपल्या जवळ असणारे कागद - बॉटल्स- कचरा रस्त्यावर कुठेही सैरा -वैरा टाकून देतात. आणि तेथील परिसर अस्वच्छ - घाण करून टाकतात. तर मित्रहो कृपया अस करू नका...
!! आपला परिसर स्वच्छ तर आपल आरोग्यही निरोगी !!
एखाद सुंदर स्वच्छ परिसर पाहिल्यावर आपल मन कस टवटवीत आणि प्रफुल्लीत होवून जात.
तर मित्रहो माझी तुम्हाला अशी विनंती आहे कि कृपया इतरत्र अस कचरा कुठेही टाकू नका तो जिथे कचरा पेटी दिसेल तिथेच टाका. आणि आपला परिसर सुंदर - स्वच्छ ठेवा.
मित्रहो तुम्ही म्हणत असाल कि तू आम्हाला सांगतोय तर तू तरी ते करतोस का ?
अमलात आणतोस का ? तर मी हो म्हणेन..
मित्रांनो मी कुठेही जाताना ..तर ते पिकनिक असू देत.
ट्रेकिंग असू देत .. किंवा रस्त्या वर फेर फटका मारताना असू देत ..
मी कुठेही अस कचरा मग तो छोटासा कागद हि असू देत.
कुल्फीची काडी हि असू दे किंवा इतर काही असू दे ..
ते कचरा पेटीतच किंवा घरातल्या कचरा पेटीतच टाकतो .
आणि मित्रांनाही आवर्जून ओरडून - समजावून सांगतो. कि कचरा हा कचरा पेटीतच टाका इतरत्र नाही.
माझे मित्र तर आता कुठे पिकनिकला वगैरे गेल्यावर मला कचऱ्याचा डबा च म्हणतात (मस्करीने हा ) ते मी आनंदाने स्वीकारतो . कारण मला माहित आहे माझ्यामुळे त्यांच्या सवयी मध्ये काहीतरी परिवर्तन होतंय . आणी झालाय सुद्धा ..!
मित्रहो शिस्त हि आपोआप नाही लागत.
ती लावावी लागते. समजावून ..प्रेमाने ..आणि कधी कधी दमदाटिनी सुद्धा ..!
 तर चला मग तुम्ही सुद्धा तयार आहात ना...आपला परिसर स्वच्छ - सुंदर ठेवण्याकरिता..!
आणि हो तुमच्या मित्रांनाही आवर्जून सांगा आणि त्यांच्या मध्येहि हि सवय रुजवा..!
मित्रहो माझ्या वाचनात आलेली एक सुंदर गोष्ट तुम्हाला मी सांगतो...
शिकण्यासारख आहे त्या गोष्टीतून ... एकदा एका आश्रमात गुरु आपल्या शिष्याला बोलावतात.
 अन त्याला एक काम सांगतात.. कि असाच पळत जा पलीकडच्या गावातील लोकांना संध्याकाळच्या भोजनासाठी आपल्या येथे बोलावून आण..
तो मुलगा तसाच पळत सुटतो. आश्रम आणि गावाच्या मध्ये आंब्याच्या अनेक बागा असतात.
वाटेत ते त्याला दिसतात. त्याला ते आंबे खाण्याचा मोह होतो..आजूबाजूलाही कोणीही नसत.
थोडा वेळ थांबतो ..अन स्वतःशीच म्हणतो,'परत येताना बघू' .पहिलं आपल्या गुरुंच काम करू...
त्या गावातील लोकांना तो गुरूंनी सांगितल्या प्रमाणे भोजनच आमंत्रण देतो.. आणि पुन्हा परतीच्या वाटेला लागतो..
वाटेत त्याला पुन्हा त्या आंब्याच्या बागा दिसतात.. तो आजूबाजूला बघतो. कोणी नसत...कसला तरी तो विचार करतो ... आणि सरळ आश्रमाच्या दिशेने निघतो.
गुरु त्याला विचारतात ...अरे काही आंबे वगैरे खाल्ले कि नाही..भरपूर बागा आहेत तिथे..
तो त्यांना सांगतो ...गुरुजी "मला आंबे खायचा मोह तर झालेलाच...
आजूबाजूलाही कोणीही न्हवत.
 कोणीही नसताना परवानगीशिवाय ते काढण म्हणजेच ती चोरी ठरली असती मला कोणी पाहत नसलं तरी मी स्वतःला पाहत होतो .."आपण दुसर्यांना फसवू शकतो. पण आपण स्वतःलाच कधीच नाही फसवू शकत."
त्याचे ते बोल एकूण गुरु त्याला म्हणतात ..."आता तू माझा खरा शिष्य वाटतोय"
मित्रांनो .कोणतेही काम करताना ते मन ..लावून ..नीट ..छान कराव ..
मी एका ठिकाणी माझा घड्याळ .नवीन सेल टाकण्याकरिता दिला होता.
 त्याने तो घड्याळाच पूर्ण ..त्याची coil कट करून .जुना कुठला तरी सेल टाकून ...मला दिला . ..
तो घरी जायाच्या अगोदरच .बंद पडला .. दुसर्या दिवशी त्याच्याकडे गेलो .तर त्याने सर्वीसिंग करायला लागेल .असे सांगिलते.
काल एका दुसर्या घड्याळवाल्याकडे गेलो होतो.
त्याने मला सांगितले. कि घड्याळातील coil कट केली आहे. अन सेल हि पुरा डाउन झालेला टाकलेला आहे.
मित्रहो,
 कोणतेही काम असू द्या ते चांगलच करा... ग्राहकांना उत्त्तामात्तम सेवा द्या ...
तरच तुमच्या कामाची प्रशांशा होईल...अन तुमचा Business देखील वाढीस लागेल... 
नाहीतर...तुमच्या कडे कोणी फिरकणार देखील नाही. 
! चांगल काम करणाऱ्या कडे कामाची काहीच कमी नसते. !
मित्रहो आपल्यात जितके गुण असतात ..तितके दोषही असतात.
आपण जे काही बोलतो ..जसे वर्तन करतो ...त्यानुसार आपल्यातील गुण दोष इतरांना दिसत असतात. प्रत्तेक सामान्य माणसामध्ये असामान्यत्वपणा कुठेतरी दडलेला असतो.

फक्त आपल्याला ते आपल्यातील असामान्यत्वपण ओळखता..शोधता आला पाहिजे.
 आपल्यातील दोष चुका ...जसे इतरांना न सांगता कळतात.
तसे आपल्यातील गुण देखील कुणाला न सांगता ते आपल्या मेहनतीने ..आपल्यातील कौशल्याने त्यांना कळले पाहिजे. इतरांनी ते अनुभवले पाहिजे स्वताहून स्वताहाच गुण ...महत्व इतरांना सांगणे ह्याला काहीच अर्थ नाही .
संकेत य पाटेकर
मित्रहो,
मागील वर्षी म्हणजेच डिसेंबर २०१० रोजी ठाण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलन भरविण्यात आल होत. ते ३ दिवस सतत होत. आणि ते ३ दिवस मी तेथे उपस्थित होतो.
ते तीन दिवस मी कधीच विसरू शकणार नाही . त्या तीन दिवसात मला अनेक मान्यवर लेखकांना , नेत्यांना प्रत्यक्ष अगदी जवळून पाहता आल. त्यांचे विचार ऐकता आले.

त्यात प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर ...विश्वास राव पाटील ...प्रवीण दवणे व अशोक बागवे याचं कवी संम्मेलन...तसेच अनेक मान्यवरांच भाषण प्रत्यक्ष ऐकता आले.
त्यातील न विसरणार म्हणजे जगदीश खेबुडकर यांची पानिपत लेखक विश्वासराव पाटील यांनी घेतलेली त्यांची ती मुलाखत काय दाद दिली होती प्रेक्षकांनी त्याच्या त्या मुलाखतीला १ तासाच वेळ होता मुलाखतीचा पण २ अडीच तास झाले तरी ...कोणीही प्रेक्षक आसनावरून उठण्यास तयार होईनात ...
त्यांचा एक एक शब्द कानात गुंजत होता ..त्याच्या एक एक शब्द लोक जीव लावून मनाच्या एकाग्रतेने ऐकत होते...मी सुद्धा
त्याचं एक वाक्य सांगतो ...जे मुलाखतीच्या शेवटी त्यांनी सांगितल.

कोणतेही काम करा ..पण ते निष्ठेने ..प्रामाणिकपणे फलाची कसलीही अपेक्षा न ठेवता.
प्रसिद्धीसाठी काम करू नये. 
आज ते नाही आहेत परंतु त्यांच्या सुंदर गीतांचा साठा आपल्यासोबत आहे. 
मी खूप भाग्यवान आहे अशा महान व्यक्तीची मुलाखत मला प्रत्यक्ष ऐकता आली पाहता आली...

मित्रहो ,
जीवनात प्रत्त्येकाच्या वाटा, मार्ग हे वेगवेगळे असतात
जो तो आपआपल्या वाटेने मार्गीक्रमण करत असतो .चालत असतो .
पुढे जिथे काही वाटा एकत्र मिळतात...त्या वाटेवर आपणास बरेच प्रेमळ मित्र....लोक भेटतात..त्यांच्या सहवासात आपण राहतो..रमतो..बागडतो...प्रेममई होवून जातो. प्रेम देतो प्रेम घेतो...
अन पुन्हा आपल्या त्या खडसर वाटेने पुढे पुढे एकट चालत राहतो..
सोबत मग पुढे कोणीच नसत...फक्त आपल्या प्रिय जणांचा आशीर्वाद, शुभेच्या, प्रेम..आपल्या सोबत असत.
अन तेच आपल्याला पुढे उपयोगी पडत. आपल्या वाटेत आलेल्या अडचणींवर मात करत.

तेंव्हा मित्रहो, प्रेम करा, आपल्या प्रिय जणांचा आशीर्वाद घ्या. शक्यतो कुणाच मन दुखवू नका
अन स्वतःच सुद्धा मन दुखी करून घेवू नका.
- संकेत य. पाटेकर

मित्रहो आज रक्षाबंधन! 
भावा बहिणीच्या प्रेमळ अतूट अस नात सांगणार हा सण....!

रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याच्या दृष्टीत बदल. रक्षाबंधन म्हणे केवळ आपल्याच बहिणीच्या नव्हे, तर समाजातील सर्व स्त्रियांच्या रक्षणाची जबाबदारी. रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या उदात्त, पवित्र प्रेमाचा अखंड वाहणारा झरा ही भावना लक्षात ठेवली पाहिजे. 

मित्रहो रस्त्याने जाता येता आपण पाहताच असणार ..काही वाईट प्रवृत्तीची माणस...एखादी मुलगी ...जात असल्यास मुद्दाम तिची छेडछाड काढतात ...मुद्दाम धक्का देतात...! 

घरात आई - बहिण असून सुद्धा असे वागतात हे लोक....!
एखादी मुलगी रस्त्याने जात असेल तर ती कुणाची तरी बहिण आहे. 
हे लक्षात असू देत. जस आपल्या बहिणीची आपण काळजी घेतो...तसं इतरांच्या बाबतीत हि घ्या ..!!

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात त्या वेळी अस कुणी छेड छाड करताना आढळ्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जात ....हाथ पाय तोडले जात. ..!!

आता मात्र आपल्या राज्यात .......अस कडक शासन नाही . त्यामुळे प्रत्त्येक स्त्रीने स्वतःचीच काळजी घ्यावी. जो कोणी असा माणूस आढळा तर त्याला दो-चार थोबाडीत द्यावेत. 
अन पोलिसांच्या हवाली करावे.

!! रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या...!!

आज आपण सारे भ्रष्टाचारा विर्रुद्ध लढत आहोत.
देशातला हा भ्रस्टाचार मुळापासून नष्ट झालाच पाहिजे..अन ...तो होईलच
कारण ह्या देशातला प्रत्त्येक तरुण भ्रस्टाचार विर्रुद्ध आज पुढे आले आहेत..

मित्रहो, माझ एक सांगण आहे तुम्हाला ? ऐकाल ना..जरूर ऐकाल ....खात्री आहे

मित्रहो,
घरात - हॉटेल मध्ये कुठेही जेवत असताना........!!
तांटातल अन्न तसाच टाकून देऊ नका. हव तेवढाच घ्या पाहिजे तितकाच घ्या. पण अन्नाची अशी नासाडी करून नका. ..
अन्नाच्या त्या एक एक कणासाठी काही गरीब लोक तडफडत असतात. हे लक्षात असू द्यात.

पाण्याचहि तसाच आहे.
उपयोग नसताना ..काहीजण नळ तसाच चालू ठेवतात.
पाण्याच ते भांड वाहून जात वाहून जात . तरी त्याकडे कोणी लक्ष देत नाहीत.
हा मात्र ज्यावेळेस पाणी कपात असते ....दोन-दोन दिवस पाणी घरात येत नाही.
त्यावेळेस मात्र सर्वांना पाण्याची किंम्मत कळते. मित्रहो अस होता कामा नये.

विजेचेही तसेच आहे मित्रहो,
आपल्याला हव असेल तेंव्हाच आणि तितकाच विजेचा वापर करा.

मित्रहो आपल्याजवळील गोष्टींचा आवकशक्तेनुसार व्यवस्थित उपयोग करावयास शिकलं पाहिजे.
आपण जीवन जगत असतना इतरांचांही विचार करावयास शिकलं पाहिजे.
हि सुद्धा एक देश सेवाच आहे .!!
!! धन्यवाद !!
 ·  ·  · 17 August 2011 at 16:37

मित्रहो,
जीवनात यश मिळवायचं असेल तर प्रथम स्वताहाला शिस्तबद्ध होता आल पाहिजे.
स्वतःच स्वताहाला नियम बद्ध केले पाहिजे.
नियमाचे साखळदंड आपल्याभोवती गुंडाळता आले पाहिजे
तरच ते यश आपल्याला गाठता येईल. नाहीतर आहेच त्या जागेवर फिरत राहायला लागेल.
 ·  ·  · 16 August 2011 at 14:38
जीवनात आपणास अशा काही व्यक्ती भेटतात ..कि त्यांचा असण्यामुळे त्यांच्या हसण्यामुळेत्यांच्या बोलक्या स्वभावामुळे ....अशा अनेक व्यक्तिमत्व पैलू मुले ....इतर हि प्रभावित होत असतात....जीवन जगत असतात आनंदित हस्त खेळत राहत असतात. फक्त त्यां व्यक्ती मुळे.........!!
पण त्या व्यक्तीच्या आयुष्यात खरच हसण आहे का ? ती व्यक्ती सुखी आहे का?
तिला काही दुख असेल का ? ह्या प्रश्नांचा आपल्या मनात कदापि विचारही येत नाही.....
का? कारण त्याचं ते दिलखुलास हसण...मनात कितीहि दुख असू देत ... चेहर्यावरच हाव भाव हसरेपणा ते कधीच कमी होऊ देत नाही....केवळ इतरांसाठी ...फक्त दुसर्यांसाठी

अशा व्यक्ती कडून आपणास खर तर शिकायला हव....
मला सुद्धा अशा व्यक्तींचा सहवास लाभला आहे....मी सुद्धा त्यांच्या कडून काहीतरी घेण्याचा ..शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
संकेत य पाटेकर
 ·  ·  · 25 August 2011 at 12:09
काल बरेच दिवसाने एक माझ्या सर्वात जवळची व्यक्ती मला भेटली ...भरपूर बोलली ती.
नेहमी हसरा बोलका असणारा चेहरा तिचा भरपूर काही जीवनाविषयक बोलून गेला.

जीवनाविषयक एक धडा मला खरतर शिकवून गेला.. !.
किती छान बोलत होती ती , तिचे ते बोल तासान तास ऐकत राहुसे वाटत होते.!
मित्रांनो
जीवन हे एक खरच संघर्ष आहे. प्रत्त्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईल अस होत नाही.
काही गोष्टी असतात. ज्या मनातच ठेवाव्या लागतात. दुसर्यांच्या सुखासाठी ...स्वताहा हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.आपण कितीही दुखी का असोत ...अनेक अडचणी का असोत ..चेहरा हसरा असायला हवा
आपल्या तो हसरा चेहरा पाहून इतर हि असतात आनंदित राहणारे.

जाता जाता ती मला एक सांगून गेली. तुझ ते दुबळ मन strong कर .जीवनात बर्याच अशा गोष्टी असतात.
अडचणी असतात त्यांना आपल्याला सामोर जायाच असत.
त्यसाठी दुबळ मन असून चालणार नाही. मन strong असायला हव. प्रत्त्येक अडचणींना समस्यांना तोंड देता आल पाहिजे. दुबळ्या मनाचा लोक बराच फायदा घेतात....

किती छान बोलून गेली ती आज ...जीवनाविषयक एक धडा सांगून गेली ती आज ..
तिच्या जीवनातला आत्तापर्यंतचा अनुभव ती सांगून गेली आज.

खरच भाग्यवान आहे मी अशा व्यक्तींचा सहवास त्याचं प्रेम मला लाभल आहे !
 ·  ·  · 12 August 2011 at 14:14
मित्रहो,
रोज रस्त्याने कुठे हि जाता येता ... ..स्वच्छ ..स्पष्ट घाणेरड्या अशा शिव्या ऐकुस येतात.
नकोस वाटत ते ऐकण..कान बंद करुसे वाटतात. पण बंद केले तरी ऐकू येतातच त्या शिव्या.
संस्कार हेच काय ते संस्कार आई - वडील आपल्या मुलांन देतात. ?
पूर्वी शिव्या देन म्हणजे पाप समजल जायचं. आता शिव्याच एक भाषा झाली आहे.

एक एक वाक्यात मुलांच्या ४-५ शिव्या हमखास असतातच. लहान चिंटू पिंटू मुलेही फाडफाड शिव्या देतात....शिव्यान शिवाय बोलन त्यांना जमतच नाही. इतक ते त्यांच्या अंगी भिनलंय.

मुलांवर संस्कार करताना ...आई-वडलांनी असे संस्कार करावेत कि त्या मुलांना समजल पाहिजे चांगल्या गोष्टी कोणत्या अन वाईट गोष्टी कोणत्या? कोणत्या गोष्टी समाजातून घेतल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी नाही ...!!

माणूस हा परिस्थिती नुसार घडत असतो. आजूबाजूच्या समाजाच्या वाईट चांगल्या गोष्टींचा त्याच्या मनावर परिणाम होत असतोच. पण
आई वडलांनी जर चांगले संस्कार दिले असतील. तर तो समाजातील चांगल्याच गोष्टी हिरावून घेईल.

मित्रहो,
आपल्या बोलण्यावरून वरून आपल्या स्वभावाची..आपली ओळख इतरांना होत असते.
आपल्या बोलण्यावरून इतर लोक आपल्याला ओळखत असतात.

शब्द हे आपले एखाद्या सुगंधित फुलासारखे असले पाहिजे.
वातावरण प्रफ्फुलीत चैतन्यमय करणार.
संकेत य .पाटेकर
२६.०८.२०११

Unlike ·  · Unfollow post · 26 August 2011 at 10:39
आपल्या मनाची ओढ ताण ...आपल्या जीवनाच्या गाडीला एकाच जागी स्तब्ध उभ करत ..
हे करू का नको..?...तिथे जाऊ कि नको ? हे चांगल कि वाईट ? मला हे जमेल कि नाही जमणार ? ..
अशा विचारातच आपला तो अमुल्य वेळ निघून जातो ...आणि
आपली यशाची आणि ध्येयाची गाडी जागच्या जागीच उभी राहते...
मनाला असंख्य अशा विचारांच्या वादळात अडकवून...
अनुभवावरून - संकेत य. पाटेकर
 ·  ·  · 5 September 2011 at 12:06
दहशदवाद-
निष्पाप लोकांच बळी घेतो हा दहशदवाद..
अनेकांच्या डोळ्यातून आसवे काढतो हा दहशदवाद
भीतीच सावट निर्माण करतो हा दहशदवाद

दहशदवाद कारणे ??

१. भ्रष्टाचार + पैसा
पैसा हा सर्वबाबतीत मूळ कारण आहे.
२. येथील गरिबी
३. येथील सुरक्षा व्यवस्था (पोलिसांचे अधिक कामाचे तास + कमी पगार ) + दहशदवादी हल्ले झाल्यानंतर सर्वत्र कडक बंदोबस्त करणे
( अगोदर काही नाही )

- संकेत
 ·  ·  · 9 September 2011 at 14:16
काश इतरांच दुख, वेदना - विवंचना ...आपल्याकडे मागून घेता आल्या असत्या तर .........
आपल्या प्रिय व्यक्तींचं दुख: आपण स्वताहाकडे घेतल असतं .......तर .तिला आपण नेहमीच आनंदित - हसत -खेळत पाहिलं असत.... मग ते दुख कितीही तीव्र हि का असेनात आपण आनदाने सहन केल असत.
- संकेत

महिन्याभराचा पगार ...

आपल्या सामान्य जणांच सर्वात मोठ दुख कोणतं असेल ...तर ते "महिन्याचा पगार" हाताथ मिळण्या अगोदरच इतरांच्या देण्या घेण्यात तो खर्च झालेला असतो.
महिना भर केलेल्या कष्टांच ..मेहनती ने मिळवलेला तो पगार असा एका दिवसात संपतो ..
.हेच फार मोठ दुख आहे .
- संकेत

Aapan Samorachyaashi kas vaagto..kas bolto..aaple vichaar, aaple haawbhaavaanusaaar samoril vyakti aaplyashi bolat aste..vaagat aste...!
mhanun samorachi vyakti konihi asu det...aapl vartan nit asaaylaaa haw...naahitar tyaa vyaktiche aapnaapaasun dur jaanyaachi jaast sanbhavaniy shakyataa aste.
sanket y.patekar
 ·  ·  · 16 September 2011 at 09:11 via Mobile

तुझ्याकडे वेळेच नाही माझ्यासाठी ..

आपल ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम असत. काळजी असते, ती व्यक्ती कधी कधी ' वेळेत' इतकी अडकली असते कि ... आपल्यासाठी..असो ,तिच्या स्वताहासाठी, तिच्याकडे वेळच नसतो.
आणि आपण मात्र तिला न समजताच तिला त्रास देण्यास सुरवात करतो ..''
तुझ्याकडे वेळेच नाही माझ्यासाठी , माझी काळजीच नाही तुला '' मुद्दाम अस करतेस / करतोस '' अशा शब्दांनी तिला आपण उगाचच दुखावतो.
खरतर तिला आपली खूप काळजी असते , खूप प्रेम असत तिचंही आपल्यावर, पण काय करणार वेळ असते तशी...पण वेळ मिळताच ती आपल्याशी बोलत असते. आपल्या सोबत असते, हे आपण लक्षात घेतल पाहिजे.
संकेत य. पाटेकर
आपण एखाद्यावर अगदी मनापासून प्रेम करतो. आणि तसं प्रेम त्याच्याकडून हि मिळाव हि अपेक्षा हि करतो. आणि समजा ते नाही मिळाल तर चिडतो, रागावतो, नको नको ते बोलून जातो. अस होण हे स्वाभाविकच आहे. प्रेमाशिवाय माणूस जगू शकत नाही. भलेही समोरची व्यक्ती आपल्यावर आपण जितक प्रेम करतो तितक करत नसो. आपण त्या व्यक्तीला भरभरून प्रेम द्यावं. द्यायला हव.
संकेत य पाटेकर

योग्य, अयोग्य काय?

योग्य, अयोग्य काय आहे ? ते आपण जाणत असलो तरी, समोरच्याला ते कस पटवून द्यायचं.? कस त्याला ते समजावून सांगायचं. ?
हे कधी कधी आपल्यालाच कळेनास होत. आणि मग आहे ती स्तिथी स्विकारण आपल्यास भाग पडत.
- संकेत

व्याख्यान म्हणजे प्रोत्साहन ..

व्याख्यान म्हणजे प्रोत्साहन !
व्याख्यान म्हणजे त्या व्यक्तीच्या अनोख्या व्यक्तिमत्वाची ओळख !
व्याख्यान म्हणजे भरपूर असा माहितीचा साठा ! व्याख्यान म्हणजे परिवर्तन !

मित्रहो ,
शनिवारी संध्याकाळी एका कार्यक्रमात" प्रसिद्ध पक्षीतज्ञ ' किरण पुरंदरे " ह्याचं व्याख्यान ऐकल आणि भारावून गेलो.
"सखा नागझिरा" आणि अशी १० दुसरी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत" नागझिरा जंगलात ते तब्बल ४०० दिवस एकटे राहले आहेत.
नुसते राहिले नाहीत तर विविध पक्षांचा त्यांनी अभ्यास केला आहे. मचाण, hide वगैरे बांधून त्यांनी विविध अशा पक्षांची प्राण्यांची फोटो काढलेत आहेत.
विविध पक्षांची माहिती देत असताना, त्यांच्या नावा आणि फोटो सोबत ते त्या पक्षाचा आवाज हि काढून दाखवत होते.
त्यांना जवळ जवळ ४० पक्षांची आवाज काढता येतात.
जंगलात फिरताना असताना त्यांना आलेले अनेक बरे वाइट अनुभव त्यांनी आमच्या सोबत share केले.
hide मध्ये बसून अवघ्या १२ फुटावर वाघासोबत त्यांनी २२ तास काढली आहेत. असे अनेक अनुभव त्यांनी आमच्यासोबत share केले.
निसर्गात फिरताना निसर्गाशी एकरूप व्हा. निसर्ग नियमानुसार चाला. निसर्गाची काळजी घ्या .

शनिवारचा तो दिवस खरच खूप खास बनला माझ्यासाठी. भरपूर माहिती मिळाली.
पक्षांविषयी, प्राण्यांविषयी, जंगलाविषयी , ते देखील प्रसिद्ध पक्षीतज्ञ ' किरण पुरंदरे "
ह्यांच्या सोबत.
- संकेत

kshan aanadaache, kshan haasyaache,kshan ekatrti mastti maouj majaaa karnyaane,
kas ast naa.............
saare mitr,itar konihi..naatyaatl, gotyaatal, aapan..kadhitari ekatrit
yeto, ekmekaanshi bolto,vichaaraanchi dewaan ghewaan karto, aannek gat
aathwaninaa ujaalaaa hi deto, mastti majaa karto, aanand adhik dwigunit karto, aani punnhaaaa.....aap aaplyaaa ghari...rojachyaach tyaa jivanaashi punhaa mislun jaato,.........!

khar tar manaat...ase vichaar yetaat tyaawles, ki ..kaaa he aanandi kshan ase lagech nighunn jataat, barech divsani aapn ekatrit aalelo asto, mag te kshan lagechach kaa nighun jaataat.....

kaal ashaach prashnaani gheral malaa.....

trek laa gelo hoto, tung aani tikonaa( lonavala) mazyaa group sobat , 'kalavardhini pratisthaan' kharegaon..naavaapramaanech anek kalaaa, aani vividh maahitine bharlel as aamach dnyaanmandir,

nisargaaat ramalo,itihaasaat ghuslo,...khupp moujj majaa keli, vichaaranchi dewaan ghewaan zaali, navinach aamachyaa sobat
aalelyaa mitraanchi olkh dekhil
zzaali...trek mastttt
zalaaaa..ekaach weli 2 kille sar kele
.

aani suru zaalaa mag paratichaaa prawaas............jo kharach nakosa watato, kenvaatari aapan ekatrit as bhetato..aani itak aapan
ekmekaant mislun jaato, ki kharach te kshan ti welll tashich rahaawi...as manaat yeun jaat,

kaal asach partichyaa wles ..ghari yeus watat nhawat...bus madhun utarusach watat nhawat, pan kaay karnaaar..........''kshan he kaahi kshanaachech sobati astaat'',
tyaa sundar aathwani fakt aapan ghari gheun yeto......kadhihi n visru shaknnaaryaaa.....

sakettttttt.......
 ·  ·  · 17 October 2011 at 09:29 via Mobile

शब्दात खूप ताकद असते ..

शब्दात किती ताकद असते, शब्द माणसाला जीवन जगण शिकवितात. आपल्या मनावर नकळत ते कोरले जातात.
परवाचीच गोष्ट ...माझ आणि माझ्या बहिणीच फोन वर संभाषण चालू होत , सहज गमती जमतीत...गप्पा गोष्टी करत करत असताना , तिचा एक वाक्य मनावर माझ्या आपली छाप उठवून गेला.
ती मला म्हणाली "' अरे रे माझा भाऊ आळशी आहे "
काही वेळाने मी फोने ठेवला ...पण .तीच ते वाक्य मनात गरगर फिरतच होत. त्या एका वाक्याने मला भूतकाळाच्या दरवाजातून आत ढकलल......आत्तापर्यंत आपण काय केल ? आपण अजून किती मागे आहोत ? आपला आळशी पणा मध्ये आला म्हणून मी खूप मागे अजून ...जगाच्या पाठीवर , अशा अनेक विचारांनी थैमान घातल.
खरच अजून मी खूप मागे आहे..........प्रगती पथाकडे जाण्यासाठी उत्तुंग यश मिळविण्यासाठी माझ्या कडून हवी तशी मेहनत होत नाही आहे. हा आळसपणा मध्ये येतोय . "' अरे रे माझा भाऊ आळशी आहे " हे तिचे शब्द आता कानात गुंजतात ....ज्या ज्या वेळेस मी आळसपणा करतो. आणि त्या शब्दांनी ... तो आळसपणा झटकून ...पुन्हा उत्साहाने माझ ते काम करण्यास सुरवात करतो.
सांगण्याच तात्पर्य : शब्दात खूप ताकद असते , ते जीवन आपल बदलवू शकतात, अपयाशाकडून यशाकडे घेऊन जाऊ शकतात, कुणास ठाऊक कुणाचे शब्द कुणाला कसे आणि कधी ...काय काय चमत्कार घडवू शकतात. संकेत य. पाटेकर
०२.११.२०११
वेळ सायंकाळ ५.४५

जीवन एक कादंबरी आहे...

कालची संध्याकाल खूप काही शिकवून गेली. जवळील प्रिय व्यक्ती भेटली. अन आपल्या जीवनाचा कटू - गोड आठवणी सांगून गेली. आपल मन हलक करून गेली, फार फार बर वाटल तिला.. आपल्या हक्काच्या व्यक्तीकडे आपल मन मोकळ करताना.
त्या कटू आठवणीनि तिचे डोळे देखील भरून येत होते ...पण वेळीच तिने स्वताहाला सावरल. तिच्या डोळ्यातले ते तरल भाव, सच्चेपणा .एक वेगळ्या भाव विश्वात बुडवून नेत होते.
माणूस ज्यावेळेस आपल्या मनातील भावना शब्दातून प्रकट करतो, बोलतो.. त्यावेळेस त्याचे डोळे देखील बोलत असतात. माणसाच जीवनच कस एक कादंबरी आहे.
सुख: दुख, वेदना, चिंता, रहस्य्ता, हास्य, आनंद यांनी भरलेलं .
पुस्तकीय कादंबरी, कथा ,वाचायची काहीच गरज नाही , फक्त माणसाच्या अंतर्मनात डोकावून पाहावं , त्याची सुख दुख ,वेदना,चिंता समजून घ्याव्यात. तेंव्हा आपणास कळेल....प्रत्त्येकाच जीवन एक कादंबरी आहे.
त्यात रहस्य्ता आहे , प्रेम आहे, समजूददार पणा, खेळकरपणा आहे, दुख, वेदना,चिंता, आनंद सार सार आहे.
कालची संध्याकाळ बराच काही शिकवून गेली मला.. त्या माझ्या प्रिय व्यक्तीस ...उदंड आयुष्य लाभो ,तीच जीवन सुखमय होवो ,हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
संकेत

प्रेमातला वाद ..

काल संध्याकाळी आणिखी एक प्रकरण डोळ्यान देखत घडलं  , मन सुन्न झालं, 
का करतात हे लोक प्रेम ? 
का करायचं प्रेम ? हौस म्हणून करायचं का ? आपल्या स्वार्था साठी प्रेम करायचं का ?
ज्या प्रेमात विश्वासच नसेल तर ते प्रेम कसलं ? 

काल संध्याकाळी स्टेशन परिसरातून लायब्ररीत जाताना...समोरच एक प्रियकर आपल्या प्रेयसीवर हात उगारताना दिसला..त्याने तिला ढकललं , मारलं ...
तिनेही प्रयत्न केलां त्याच्यावर हात उगारायचा ..
पण तो धिप्पाड असल्याने,  ती फार काही करू शकली नाही . ती तिथून रडतच निघून गेली. .....
काय करणार बिचारी.....

काय झालं  होतं  त्यांच्या दोघात कुणास ठाऊक,  पण जे काही इतक्या सारया लोकांदेखत घडत होतं ...
ते चुकीच होतं .
मुळात एकमेकांवर हात उगारण हेच चुकीच होतं. 
प्रेम करता ना तुम्ही .....मग त्यात भांडण रुसवा खोड्या हे ते येणारच ना ....

प्रेमात समजुददारपणा लागतो , एकमेकांचा विश्वास खूप  गरजेचा ..
भांडण हे होतातच .....पण ते अस एकमेकांवर हात उगारून...कस चालेल ?

एकमेकाना समजून घ्या ........एकमेकांचा विश्वास ठेवा .

प्रेमा मध्ये जास्त करून मुलीच बळी पडतात ....आणि मग पच्छाताप करून घेतात. 
त्याच्याकडे गाडी आहे , पैसा आहे , तो श्रीमंत आहे , दिसायला सुंदर आहे. 
म्हणून प्रेम करायचं नसतं.. (सगळ्याच मुली अश्या नसतात ) 
स्वभाव पहावा , मन पाहावं , मनाने श्रीमंत असावा, असायला हवा, सामंज्यास पणा त्याच्यात असावा, मना पासून आपल्यावर प्रेम करणारा असावा ...
त्याला पूर्णतः समजून ओळखून ...मग काय ते ठरवावं ...पुढे काय कराययचं ते ...

एकमेकांवर हात उचलण  हे कितपत योग्य आहे? बघा विचार करा जरा...
?
प्रेम हे एकमेकांच्या विश्वासाच्या जोरावर चालतं , टिकतं अन फुलतं ...
कृपया एकमेकांवर अस हात उचलू नका...

संकेत य पाटेकर

' मनं ' खरच खूप वेडं असतं

' मनं ' खरच खूप वेडं असतं . किती भावूक होत ते लगेच ...
आपली प्रिय व्यक्ती आपल्या पासून दूर जात आहे....हे त्याला सहनच होत नाही. सहन तरी कस होणार ?नित्य नेमाच बोलनं , रुसनं , मस्करी करणं , भेटनं हे चालूच असतं. प्रेम असत ते ..., मनापासूनचं . नातं असतं ते एक अनमोल अस.....हृदयाशी गुंफलेल .
पण एक दिवस अचानक तीच दूर जाणं .........जीवाला लागतं , वेदना होतात फार मनाला .. आता सार सार काही बंद होणार , ते बोलनं , ते भेटनं ,ते हास्य , ते शब्द , ती प्रेमळ हाक ' तो प्रेमळ स्पर्श, सार सार दुरावणार ...हि भावना मनाला खूप छळते.
प्रेम.. हसवतं रडवतं प्रेमच आपणास जवळ आणतं आणि तेच प्रेम पुन्हा दुरावतं आपणास त्या व्यक्ती पासून
विश्व दडलंय ह्या प्रेमात ..... प्रेम प्रेम प्रेम .........
संकेत य. पाटेकर
१६.११.२०११

" समजुद दारपणा हा प्रत्येकात असावाचं ''

'वाद - भांडण - राग ' हे सारे ''एक सुंदर नाते'' तोडायला टपकलेलेच असतात . आणि आपण त्यांना दुजोरा देतो.
अनमोल नात्यात , अनमोल मैत्रीत , कधीच वादाला, रागाला स्थान देऊ नये . किती हि काही होवो. एकमेकांना समजून घेऊनच हे नात फुलवावं अजून अतूट करावं.
''समजुद दारपणा हा प्रत्येकात असावाचं ''
संकेत य पाटेकर

'माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर'

'माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर' वाक्य काही दिवसापासून माझ्या मनाच्या अवकाशात सतत घिरट्या मारतंय.
खरच माझ प्रेम आहे का त्या व्यक्तीवर ...जिच्याशी मला नेहमी मनापासून बोलावेस वाटतं . भेटावास वाटतं . प्रेम हे असं बोलून व्यक्त करता येत का ?नाही ...अजिबात नाही.
प्रेम हे बोलून नाही व्यक्त करू शकत ...ते कळत ते सहवासातून, आपण घेतलेल्या काळजीतून , आपल्या विश्वासातून .. आपण तीच ' मनं ' किती समजून घेतोय त्यावरून.. आपण त्या व्यक्तीच दु:ख किती हलकं करतोय त्यावरून .. तिला किती सुख देतोय त्यावरून...
प्रेम हे एकमेकांच्या सहवासात घडतं , एकमेकांच्या सहवासात फुलत आणि मग कळत. प्रेम किती आहे ते बोलून सांगण्या ऐवजी सहवासातून कळल पाहिजे. आणि ते निस्वार्थ प्रेम असल पाहिजे.
संकेत य पाटेकर
२० .०१.२०१२
शुक्रवार

एक आवडलेलं वाक्य ..

कधी कधी आपल्या जवळ अगदी हाकेच्या अंतरावर जे असते त्याची किंमत नसते त्याचे मोल कळते, जेव्हा ते आपल्या पासून खूप दूर जाते. आणि असे हि असते, जे खूप वेळा बोलून सुद्धा कळत नाही ते कधी कधी मौनातून सुद्धा उमगते.
- मुग्धा भिडे पुणे

'आयुष्य'' हि सर्वात मोठी आणि सर्वात अवघड अशी परीक्षा ..

'आयुष्य'' म्हणजे सर्वात मोठी आणि सर्वात अवघड अशी परीक्षा आहे .
इथे वार्षिक किंवा सामाहिक परीक्षा होत नाही . इथे क्षणा क्षणाला परीक्षा द्यावी लागते. इथे कोणतेही क्लासेस नसतात.
वेळ आणि परिस्थिती ती आपल्याला घडवत असते . शिकवत असते . आपल्या मनाला आकार देत असते. इथे कसलीच टक्केवारी नसते . कोण पहिला कोण दुसरा नसतो .
पडलो - धडपडलो तरी स्वतःला आपण इथे सावरायचं असत. आलेल्या समस्याना - संकटांना तोंड देण्याची मनाची तयारी ठेवावी लागते .
आयुष्य हे सु:ख - दु:खाने भरलेलं आहे. पण सु:ख सहजा सहजी मिळत नाही . मिळालं तरी ते क्षणभर. पण तरी सुद्धा ते मनाला किती ताज तवानं करून जातं .
- संकेत य पाटेकर

व्हेलेनटाईन डे...प्रेमाचा दिवस ..

मित्रहो ,
आज व्हेलेनटाईन डे...प्रेमाचा दिवस
प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस ......मनातल्या भावना बोलून दाखवायचा हा दिवस !!
खर तर हा दिवस फक्त प्रियकर आणि प्रेयसी साठीच मर्यादित नाही आहे. आपण आपल्या आई- बाबांना , बहिण - भाऊ , आजी-आजोबा ह्यांना देखील आपल्या मनात त्यांच्या विषयी किती प्रेम आहे ते दाखवून देऊ शकता ...मग ते एखादा गिफ्ट वगैरे देऊन असेल ...किंवा अन्य कोणत्याही प्रकारे असेल .
प्रेम हे जीवन आहे. जीवनातला एक अतिमहत्वाचा भाग. ते कोणाला मिळत तर कोणाला नाही. ज्याना प्रेम मिळत ...ते खरच भाग्याशील ...!!
जे प्रेमावाचून वंचित राहतात ..........
जीवनात कितीही आपण उंच भरारी घेतली तरी ...माणूस प्रेमावाचून सुखी नाही राहू शकत . जीवन जगण्यासाठी प्रेम हे हव ....मग ते बहिण - भावाच असो , आई- वडलांच असो , आजी - आजोबांच असो , मित्र - मैत्रिणीच असो , कोणतेही असो .....
मित्रहो , प्रेमाने रहा , प्रेमाने जगा , प्रेम द्या, प्रेम घ्या ........
''खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे'' ........अस आपल्या साने गुरुजींनी म्हटलेलेच आहे.
संकेत य पाटेकर

आयुष्य म्हणजे जणू एक मळलेली ' पायवाट'

आयुष्य म्हणजे जणू एक मळलेली ' पायवाट'
त्या वेड्या वाकड्या पायवाटेने पुढे जाताना मधेच ती तीच अस्तित्वच संपवते आणि पुढे आपल्यालाच आपल्या मुक्कामाचा मार्ग धुंडाळत पुढे जावे लागते .
आयुष्य हि असंच आहे...
- संकेत य पाटेकर

लहानपणच देगा देवा !!

खरच '' लहानपणच देगा देवा !! खरच लहानपणच दे...
खरच लहानपणच छान असत ....आपले हट्ट पुरीवणारे, मायेचा हाथ पाठीशी फिरवणारे , प्रेमाने आपल्या कवेत घेणारे , लाडीगोडीत बोलणारे, सतत आपल्या काळजीत असणारे , आपली काळजी घेणारे कोणीतरी असत. पण ..............

जगण्याचं आणि जीवनाच उद्दिष्ट ..

आपल्याला जी व्यक्ती आवडते प्रिय असते. त्या व्यक्तीला आपण आवडत असूच अस नाही.
आपल्या मनाची तगमग , आपल्या मनालाच कळते. अपेक्षांचं उगाचंच मग ओझ होत.आणि जीवन जगण असह्य होऊ लागत.
प्रत्त्येकाची आवड हि निराळी असते ...प्रत्त्येकाचे विचार वेगळे असतात .
आपआपल्या पद्धतीने आपल जीवन जगायचं.
जगण्याचं आणि जीवनाच उद्दिष्ट मात्र पूर्ण करायचं .
- संकेत