सोमवार, २ जुलै, २०१२

आतल्या मनाचा आवाज..

हे मनं, कधी म्हणतं  तिच्याशी खूप भांडाव , रागवावं,
पण रागाच्या भरात नको ते शब्द भराभरा निघतात अन  समोरील व्यक्तीच्या मनावर आघात करतात.
नंतर आपणासही पच्छांताप होऊ लागतो त्या गोष्टीचा.

समोरील व्यक्तीचं  वागणं कधी कधी अचानक बदलतं ...
ते कां बदलतं, ह्याची कारणं  अनेक  असतील पण ते  आपणास  मिळत नाही अन जोपर्यंत ती व्यक्ती स्व:ताहा ते सांगत नाही , खरं  काय आहे कळत नाही  . तोपर्यंत  आपण वेगळ्याच गैरसमजुतीतून  जात असतो.
मनात येतं  कि हि जाणूनं  बुजून करते आहे , भेटणं  बोलणं टाळते आहे.
पण खरी परिस्थिती वेगळी असते , असू शकते हि ...
आपण मात्र .....त्याच लयात राहतो, मनाचा ताण अधिक वाढवत जातं
- संकेत 

स्वभाव


प्रत्येकाचा स्वभाव तसा वेगळाच असतो. कुणी हसरा ...आपल्या चेहऱ्यावरच्या गोड हास्याने सर्वाना हसवत आणि खेळवत ठेवणारा , कुणी बोलका...आपल्या गोड अन प्रेमळ बोलण्याने जनमनात रुजणारा .. कुणी रागीस्ट ..त्वरित रागावणारा ....
कुणी प्रेमळ ..कुणालाही लगेच आपलास करणारा , कुणी शांत .........कोणतीही गोष्ट , समस्या शांत पणे विचार करून करणारा ...! कुणी माणसाच्या गर्दीतून दुरावेला ...सदा एकटा एकटाच राहणारा ...माणसात सहसा न मिसळणारा.
प्रत्येकाचा स्वभाव आणि त्याच इतरांशी बोलणं चालनं वागणं हे वेगवेगळ असतं.
अन म्हणून ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार आपल्यालाही त्याप्रमाणे समोरच्याशी वागावं लागतं ..बोलणं -चालनं ठेवावं लागत . नाहीतर आपण ह्या सर्वांशी एकाच पद्धतीने म्हणजे आपल्या स्वतःच्या वागण्या बोलण्या नुसार त्याच्याशी ' चर्चा किंवा संवाद' साधू लागलो तर काही गोष्टी खटकतात समोरच्याला ...
उदाहरण द्यायचाच झाल तर .... एखाद्याशी आपण आपल्याच गतीवान वेगात गमती जमतीत बरेच काही बोलून जातो ...ते समोरच्याला रुचत नाही ...त्याला राग येतो त्या गोष्टींचा .. कारण स्वभावाच त्यांचा तसा असतो ....काही ठराविक मर्यादेपर्यंत त्याच्याशी आपण मस्करी ..किंवा गंमती जमती करतो ...पण त्यापुढे नाही .
दुसर उदाहरण द्यायचं झाल तर ... एखाद्याला कितीही काही बोला ...गमतीत ते तो शब्द मनावर घेत नाही कारण त्याला ठाऊक असत समोरचा आपली मस्करी करतोय .............. तरीसुद्धा ह्यातून हेही एक निष्पन्न होत कि स्वभावाला सुद्धा काही ठराविक मर्यादा असतात.

संकेत य पाटेकर ०४.०६.२०१२

जीवनाचं खर सूत्र काय आहे ..?


कुणीतरी आपलंस आहे ..आपल म्हणणार आहे , आपल्याशी सु:ख दु:ख वाटून घेणार आहे ...ह्यातच किती धन्यता वाटते ....!!

काल रात्री एक मेसेज आला मोबईल वर ...हाय संकु ..ओळखीचाच होता ...जवळच्याच व्यक्तीचा बरेच दिवसाने आलेला हा मेसेज पाहून मी त्या मेसेज ला प्रतीउत्तर दिल. आणि मग पुढे पुढे प्रश्न - उत्तरांची साखळीच निर्माण झाली.
तिचे प्रश्न फार निराळे होते ..नैराश्याचे ...हताश झालेलं , जीवनाबद्दल कटुता निर्माण ह्वावे तसे . काहीतरी विपरीत घडलेलं काय घडल ते मलाही न्हवत ठाऊक .. पण आम्ही बोलत होतो ..एकमेकांशी मेसेज द्वारे ............
प्रत्येकच दुःख कस निराळ असतं. आनंदित सुरळीत सार काही चालू असताना नियती अचानक काही वेगळाच खेळ खेळते .काय असत तिच्या मनात काही कळत नाही .... आपल मन मात्र त्यात फार पोखरल जात , अन त्यातून बाहेर पडण कठीण होवून जात.
जीवनाचं सूत्र च नक्की कळत नाही . पावला पावलांवर अनेक असह्य धक्के खात जावे लागते . जो त्या धक्यातुनच सावरून सांभाळून पुढे येतो . तोच जीवनाचं खर सूत्र काय आहे ते समजू शकतो .

संकेत य पाटेकर ०७.०६.२०१२

आयुष्य ...



७५ टक्के आयुष्य हे दुखाने व्यापलं आहे जणू आणि २५ टक्के फक्त सुख आणि आनंद .... सुखाचे क्षण तरी किती ते हाताच्या बोटावर मोजता येईल तितके ...दुख हे अथांग महासागरासारख विस्तीर्ण ....
कधी कधी वाटत कि दुखी अश्रुनेच हां अथांग महासागर निर्माण झाला असावा . प्रत्येकाचे दुख किती वेदानात्मक असतात ...काळजावर ते अनेक घाव घालतात . पाहवत नाही ...बघवत नाही.
अस वाटतं कि गांधीजीनी ज्या प्रकारे इथल्या गोर गरिबांसाठी त्यांच्यासाठी , जोपर्यंत त्यांना अंगावर घालण्यासाठी व्यवस्थित कपडालत्ता मिळत नाही तोपर्यंत ...स्वतःसाच्या अंगावर फक्त पंचा नि धोतराच परिधान करून राहिले ..... तसं मीही माझ्या प्रिय जनासाठी जोपर्यंत त्याचं दुख दूर होत नाही ...तोपर्यंत आपण कसलीही मौज मजा न करता ह्या दुखाला कवटाळून राहावं ......अस मनात येतं :)

- संकेत

''साद - प्रतिसाद'' ............



नाते संबंधात अधिक जवळीकता आणणारे हे दोन शब्द...!!
नात्यातला गोडवा जशाचा तसा ठेवणारे हे दोन शब्द .... खूप मोल आहे ह्या दोन शब्दांना .........
आपल्या सादेला जोपर्यंत समोरच्याचा प्रतिसाद मिळत राहतो ...तोपर्यंत सर्व काही ठीक असत , पण समोरून प्रतिसाद मिळनचं बंद झाल तर साद देण्याचा उपयोग तरी काय ?
मन निराशेच्या छायेखाली अशा वेळी वाहत ..वाहत राहतं ...अन मग नात्यातली ती अतूट गाठ हळू हळू सैल होऊ लागते.
एखाद्या इको पोईन्ट असेल ...तर तिथे आपण गळा काढून एखादी हाक मारतो , जोरात ओरडतो ....कुणाच्या तरी नावाने किंवा कसेही ...पण ओरडतो, का ?तर, आपलाच ध्वनी ..प्रतीध्वनिच्या स्वरूपात ..आपल्यास पुन्हा येऊन मिळतो . तेंव्हा आनंदाला सीमा उरत नाही आपण अधिक उत्साहाने , आनंदाने पुन्हा पुन्हा साद घालतो ....
नात्यात सुद्धा असंच आहे. जोपर्यंत तुम्ही नात्यातील कोणत्याही व्यक्तीला ..तिला, तिच्या सादेला प्रतिसाद दिला नाही तर त्या व्यक्तीचा तुम्हावरील विश्वास हळू हळू कमी होत जाईल . आणि नात्यात एक दूरत्व निर्माण होईल .
नात्यात ..साद - प्रतिसाद , विश्वासाला खूप मोठी किंमत आहे ...!!
त्यानेच नातंबहरतं ..नव्या उमेदीत , नव्या उत्साहात , सुख दुखाच्या खळखळत्या प्रवाहात..एकरूपाने , एकजुटीने !

- संकेत

सह्याद्री ...


सह्याद्री ....................सह्याद्री ................सह्याद्री !!!

सह्याद्री म्हटले कि आले त्याचे रौद्र तितकेच मनाला भुलवून टाकणारे मनमोहक रूप , उंचच उंच आभाळाला भिडणारे त्याचे काळेभिन्न कातळ कडे .....तिथला सतत घुंगवत राहणारा...आपल्यासोबत वृक्ष वेलींनाहि , पक्षी पाखरांना डोलवनारा मनमुराद वारा , ते धुक्याचे दाट पांढरे ढग त्याची विस्तीर्ण पसरलेली ती रूपरेषा ...तो तिथला अलंकारित निसर्ग .... सह्याद्री म्हटले कि आले गड -कोट किल्ले , आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज... स्वराज्य व स्वराज्याची राजधानी राजगड, रायगड , राजगडावरून स्वराज्यासाठी आखलेल्या अनेकानेक मोहिमा .... रायगडावरील तो सुवर्ण क्षण ..राज्यभिषेक सोहळा ती आठवण ...., स्वराज्यातील बळकट, भक्कम, आणि अचंबित करणारे हे किल्ले तेथील वास्तू ... त्यांचा तो रक्तरंजित इतिहास ... सह्याद्री म्हटल कि आला कोकण कडा ...ट्रेकर्स मंडळींना आपल्या अजस्त्र पण मनमोहक रूपाने नेहमीच आकर्षित करणारा कोकण कडा ....हरिचंद्र राजाची महती सांगणारा तो हरिश्चंद्र गड सह्याद्रीत वसलेले हे गड-कोट किल्ले ...त्यांचा इतिहास ..तो निसर्ग ......डोंगर दऱ्या ...नदी ..ओढे , पक्षी पाखरे ..विविध रंगी .फुले ...झाडे वेली...ती माती ...तो तिथला दरवळीत सुगंध ..तो आनंद मनाला पार भुलवून टाकतो .... असा हा ''सह्याद्री'' आणि मनाला भुलवणारा ,अद्भुत हवा हवासा वाटणारा ''निसर्ग'' मला नेहमीच वेड लावत . संकेत य पाटेकर ३० जून २०१२