जीवन एक प्रवास आहे ...सुख दु:खाचा, गोड कटू आठवणींचा , प्रेमाचा अन संघर्षाचा.. अन अशा ह्या प्रवासात कितीतरी बरे - वाईट अनुभव आपणास येतात. ह्या अनुभवानेच आपण शिकतो. घडतो. अन आपल्या पुढील जीवनाची वाटचाल सुरु ठेवतो. माझ्या आयुष्यातले असेच काही क्षण मी तुमच्यापुढे मांडत आहे. जे मी अनुभवलेत, माझ्या शब्दात ..माझे जीवनानुभव ..! - संकेत पाटेकर
सोमवार, २७ जुलै, २०२०
बुधवार, ८ जुलै, २०२०
If you Don’t mind…
काल ऑफिसमध्ये नव्याने एक मुलगी जॉईन झाली. ते हि आमच्याच Design Department मध्ये ,
पहिलाच दिवस असल्याने..काम काज समजून घेण्याकरिता ती बाजूला येऊन बसली. बाजूच्या सीटवर आणि
थोडं इकडचं तिकडचं समजून घेतल्यावर, काही बोलणं झाल्यावर लागलिचं तिने एक सवाल टाकला.
अगदी स्पष्टपणे..,
If you Don’t mind…
तुमची सॅलरी किती आहे ?
मी काही क्षण स्तब्ध पुतळ्यासारखा झालो.
क्षणभराचा तो क्षणिक झटका..म्हणा हवा तर..
म्हटलं काय धाडसी मुलगी आहे हि, किती हे धाडस..
पहिलाच दिवस..तो हि आता कुठे सुरु झालाय आणि असा प्रश्न.. !
खरं तर मुलगा असता तर सांगायला काही प्रश्न न्हवता.. पण प्रश्न आता प्रतिष्ठेचा आणि असलेल्या त्या पोस्ट चा होता..
नव्याने आलेल्या मुलीला, पहिल्याच दिवशी आपली सॅलरी सांगायची म्हणजे ? प्रश्नांची उभी मांदियाळीचं सुरु झाली.
मला माझ्या आधीच्या कंपनीचे बॉस आठवले. ते म्हणायचे,
मुलींनी मुलांची ‘सॅलरी’ कधी विचारू नये आणि मुलांनी मुलींचं वय.
मी स्मित हास्य तेवढं केलं तिच्यापुढे आणि निमूट गप्प राहिलो. क्षणभर..
पण तीचं त्यात काही समाधान झालेलं दिसलं नाही.
मग शेवटी सरळ सरळ सांगूनचं टाकलं.
म्हटलं काय होणार आहे सांगून…सांगून..
हा हि एवढी ..अमुक तमुक..आहे.
तिला बरं वाटलं असावं ते ऐकून..
मी मात्र त्या शब्दाला एकनिष्ठ राहिलो.
तिचं वय विचारलं नाही.
सहज जमलेल्या_गमती जमती
– संकेत
visit : www.sanketpatekar.com
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
सर्वच नाती काही रक्ताची नसतात . काही नाती मनानं जुळली जातात . आयुष्याच्या पायवाटेवर निवांतपणे कधी धावत पळत असता... त्यात बहिण भावाच्या ...
-
खूप काही लिहूस वाटतंय आज ? कारण हे मनं , फारच अस्वस्थ झालंय . हळवं झालंय ते , 'कारण 'संवाद' हरवला आहे'. बंध नात्यातला ...
-
वसंत पुरुषोत्तम काळे वपु ..हे माझे सर्वात आवडते लेखक .. आज ते हयात असते तर खरच नक्कीच भेट घेतली असती त्यांची. त्यांच्यामुळे मला माणसातल...