प्रशस्त जागा, मनाला प्रसन्न बहाल करणारं भक्तीमय आणि शांतप्रिय वातावरण, मन एकाग्र करण्यासाठी असलेलं ध्यानमंदिर आणि एकूणच परिसर..
श्री स्वामी समर्थ मठ - ( नांदिवली ) डोंबिवली पूर्वजीवन एक प्रवास आहे ...सुख दु:खाचा, गोड कटू आठवणींचा , प्रेमाचा अन संघर्षाचा.. अन अशा ह्या प्रवासात कितीतरी बरे - वाईट अनुभव आपणास येतात. ह्या अनुभवानेच आपण शिकतो. घडतो. अन आपल्या पुढील जीवनाची वाटचाल सुरु ठेवतो. माझ्या आयुष्यातले असेच काही क्षण मी तुमच्यापुढे मांडत आहे. जे मी अनुभवलेत, माझ्या शब्दात ..माझे जीवनानुभव ..! - संकेत पाटेकर
शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२
अंबरनाथ शिवमंदिर (Ambernath Shiv Mandir) महाराष्ट्रातील प्राचीन भूमिज मंदिर
मुंबई ठाणे पासून अंबरनाथ रेल्वे स्थानक अगदी तासाभरावर आहे.
येथून सुमारे दोन अडीच किलोमीटर अंतरावर अंबरनाथचं प्राचीन शिवालय उभं आहे. रिक्षा करून ह्या मंदिरापर्यंत आपल्याला पोचता येतं. साधारण पाच दहा मिनिटातच शिवमंदिर येथे पोहोचता येतं. मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार हे प्रवेशद्वार पश्चिम दिशेला असून, ह्या प्रवेशद्वाराव्यक्तिरिक्त आणखी दोन प्रवेशद्वार इथे आपल्याला पाहायला मिळतात. युनेस्कोने जाहीर केलेल्या २१८ कलासंपन्न वास्तूत अंबरनाथच्या ह्या प्राचीन मंदिराचा देखील समावेश आहे. हि नक्कीच अभिमानस्पद गोष्ट आहे. मुख्य प्रवेशद्वाराशीच शिवाचे वाहन असलेले दोन नंदी आहेत. त्यांचं दर्शन घेत मुख्य प्रवेशद्वारातून आपण सभामंडपात प्रवेश करतो. आणि तिथून गर्भगृहात .. मंदिराच्या गाभाऱ्यात स्वयंभू असे शिवलिंग आहे. त्यास अंबरेश्वर म्हणून हि संबोधलं जातं. वालधुनी नदीच्या काठी वसलेलं हे अंबरनाथचे शिवमंदिर आपला ऐतिहासिक वारसा जपून आहे. उत्तर कोकणातील शिलाहार राजवटीतील राजा छित्तराज यांच्या काळात या मंदिराची बांधणी सुरू झाली आणि राजा मुम्मुणीराज यांच्या कारकिर्दीत शक संवत ९८२ म्हणजे इसवीसन १० जुलै १०६० रोजी ह्या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असा उल्लेख मंदिरवर असलेल्या शिलालेखातून मिळतो. अंबरनाथच हे प्राचीन शिवमंदिर भूमिज मंदिर म्हणून ओळखलं जात. .हे शिवालय अद्भुत शिल्पकलेचा आणि स्थापत्याचा उत्रकृष्ट नमुना आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं ह्या आपल्या अंबरनाथ शहराचं खरं तर हे भूषण ... त्यामुळे एकदा वेळ काढून आणि आवर्जून एकदा भेट द्यायला तर हवीच. - संकेत य. पाटेकर
अंबरनाथ शिवमंदिर (Ambernath Shiv Mandir) महाराष्ट्रातील प्राचीन भूमिज मंदिर
-
खूप काही लिहूस वाटतंय आज ? कारण हे मनं , फारच अस्वस्थ झालंय . हळवं झालंय ते , 'कारण 'संवाद' हरवला आहे'. बंध नात्यातला ...
-
सर्वच नाती काही रक्ताची नसतात . काही नाती मनानं जुळली जातात . आयुष्याच्या पायवाटेवर निवांतपणे कधी धावत पळत असता... त्यात बहिण भावाच्या ...
-
तुझ्यावरच्या चारोळ्या ..... आयुष्यात एकदा तरी आपण प्रेमात पडतो. अन आपले भान सर्वस्वी त्या व्यक्तीपुढे हरपून बसतो... नवी ओळख असते नवं न...