गुरुवार, १७ मे, २०१२

व्याख्यान म्हणजे प्रोत्साहन ..

व्याख्यान म्हणजे प्रोत्साहन !
व्याख्यान म्हणजे त्या व्यक्तीच्या अनोख्या व्यक्तिमत्वाची ओळख !
व्याख्यान म्हणजे भरपूर असा माहितीचा साठा ! व्याख्यान म्हणजे परिवर्तन !

मित्रहो ,
शनिवारी संध्याकाळी एका कार्यक्रमात" प्रसिद्ध पक्षीतज्ञ ' किरण पुरंदरे " ह्याचं व्याख्यान ऐकल आणि भारावून गेलो.
"सखा नागझिरा" आणि अशी १० दुसरी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत" नागझिरा जंगलात ते तब्बल ४०० दिवस एकटे राहले आहेत.
नुसते राहिले नाहीत तर विविध पक्षांचा त्यांनी अभ्यास केला आहे. मचाण, hide वगैरे बांधून त्यांनी विविध अशा पक्षांची प्राण्यांची फोटो काढलेत आहेत.
विविध पक्षांची माहिती देत असताना, त्यांच्या नावा आणि फोटो सोबत ते त्या पक्षाचा आवाज हि काढून दाखवत होते.
त्यांना जवळ जवळ ४० पक्षांची आवाज काढता येतात.
जंगलात फिरताना असताना त्यांना आलेले अनेक बरे वाइट अनुभव त्यांनी आमच्या सोबत share केले.
hide मध्ये बसून अवघ्या १२ फुटावर वाघासोबत त्यांनी २२ तास काढली आहेत. असे अनेक अनुभव त्यांनी आमच्यासोबत share केले.
निसर्गात फिरताना निसर्गाशी एकरूप व्हा. निसर्ग नियमानुसार चाला. निसर्गाची काळजी घ्या .

शनिवारचा तो दिवस खरच खूप खास बनला माझ्यासाठी. भरपूर माहिती मिळाली.
पक्षांविषयी, प्राण्यांविषयी, जंगलाविषयी , ते देखील प्रसिद्ध पक्षीतज्ञ ' किरण पुरंदरे "
ह्यांच्या सोबत.
- संकेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .