क्षणभर मी अडखळंलो ? स्तब्धच झालो.
तोंडातून एक ब्र हि फुटेना ? काय प्रत्युतर द्यावे तिला ? मगासपासून इतकं भरभर मी बोलत होतो तिच्याशी ,
शब्द न शब्द कसे ' एखाद्या सुगंधित फुलांचा सडा जमिनीवर पसरावा, अन त्यात आपण स्वतःला मनोमन झोकून द्यावं , तासनं तास त्या दरवळीत सुगंधात हरपून जावं .....असे !
कुणा मुलीनं स्वताहून प्रपोज करावं हे पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात घडलं होतं .
सहसा मुलेच मागणी घालतात मुलींना . ज्यावेळेस ते एखाद्या मुलीच्या प्रेमात पडतात .
कारण मुलींचा स्वभाव मूळतः तसा लाजाळू . (सर्वच मुलींना हे लागू होत नाही . हे आताच नमूद करतो . नाहीतर एक एक शब्द फेकून मारलं ..हाहाहा )त्या स्वतःहून कधी प्रपोज करत नाही. पण त्यांच्या नजरेतील भाव कळून जातात . ज्यावेळेस त्या नजरेसमोर असतात .
ते त्या क्षणाची वाटच पाहत असतात . कधी हा आपल्याजवळ आपलं प्रेम व्यक्त करतोय . कधी हा आपल्या मनातील भाव बोलून दाखवतोय . कधी हा आपल्याला मागणी घालतोय. सहसा असंच होतं प्रेमामध्ये .
पण आज मात्र ह्या उलट झालं होतं , तिनेच चक्क मागणी घातली होती. आपल्या मधुर मधाळ अशा शब्दात..
will you marry me ?
मी काही क्षण निशब्द झालो. हो बोलू कि नाही ? कळण्यास मार्ग न्हवता.
पहिल्यांदा कुणा मुलीनं मला अशी मागणी घातली होती. म्हणून '' मला थडा वेळ दे ' अस म्हणत मी फोन ठेवला . अन विचारांच्या गर्दीत स्वतःला पुन्हा झोकून दिले .
अजून आमची भेट हि घडली न्हवती .
ओळख मात्र फार जुनी.. तीन एक वर्षा पूर्वीची ..! ओर्कुट सारख्या माध्यमातून झालेली.
बोलणं होत होतं एकमेकांच , पण ते फोन वरूनच ...
तिच्या बोलण्यात मात्र एक वेगळेपण होतं , अन तेच खूप आवडायचं.
वेडा .......वेडू...........झंप्या ...
असे कितीतरी शब्द ती अगदी प्रेमाने म्हणायची .
तिच्या बोलण्यात जो लाडिकपणा खट्याळपणा , हसरेपणा होता तो खूप स्पर्शून जायचा मनाला ....
अशीच असावी आपली एखादी जीवनसाथी.
हसऱ्या मधाळ शब्दाची , असं मनं मनोमन बोलून जाई स्वतःशीच ... अन रंगून जाई स्वप्नात.
पण आज ते स्वप्न सत्यात उतरू पाहत होतं . संधी स्वताहून चालून आली होती.
फक्त माझ्या होकारार्थी शब्द हवा होता .
मात्र आमची भेट हि कधी घडली न्हवती . ती कशी दिसते ?काय ? ते काहीच ठाऊक न्हवत.
फक्त तिच्या बोलण्यावरून तिच्या स्वभावाची रूपरेखा मी मनात आखली होती.
अन ती मनोमन आवडली होती बस्स..
तसा तिने पूर्ण एक दिवस दिला होता विचार करण्यास ...अन तो दिवस आता जवळ जवळ पूर्ण झाला होता . दुसऱ्या दिवशी सकाळच माझा फोन खणाणला .
मनाची रिंगटोन वाजत ..
ट्रिंग ट्रिंग..
तिचाच CALL ...
काय रे, काय ठरवलेस मग ?
मी पुन्हा निशब्द झालो. क्षणभर काय बोलावं ते कळेनाच.
पण काही बोलणार इतक्यात तिनेच पुन्हा सुरवात केली.
अरे काल १ एप्रिल होता.
एप्रिल फुल ..............फसलास नां ?
खर वाटलं असेल न्हाई तुला.......वेडू... ?
हाहाहाहा ....
नेहमीच्या हास्य शैलीत तिने खो खो हसून घेतले.
अन मी मात्र तिचं हसणं ....मनात साठवून घेतले.
कुणीतरी पहिल्यांदा प्रपोज केले होते .....पण ते एप्रिल फुल ह्या दिवशी ....
असंच लिहिता लिहिता ...
- संकेत य पाटेकर ०३.०१.२०१३
फोटो सौजन्य - नेट द्वारे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .