शनिवार, १२ एप्रिल, २०१४

प्रवास ...

प्रवास कुठलाही असो , कुठे हि असो , कधी हि असो...दिवसा असो वा रात्री असो . 
स्वप्नातल्या लखलखत्या चंदेरी दुनियेतला असो , पायी असो वा चार पायी असो, मुंबईतल्या धावत्या रेल्वे गाडीतला असो .रस्त्यावरल्या गजबजल्या रह्दारीतला असो, एकटक एकांतातला असो , भोवतालच्या निसर्गरम्य परिसरातला असो कि दूर दुरल्या खेड्या पाड्यातल्या , शेंता बांधातला असो . तलावकाठी फुललेल्या सांजवेळीतला असो वा गावागावातल्या गल्लीबोलीतला असो..सह्याद्रीतल्या बळकट दुर्ग राशींवर असो वा सर्वोच्च उंच शिखरावर असो . पुस्तकी दुनियेतला असो , वा काव्यातून नटलेला असो...
प्रवास आनंद देतो . प्रवास नवी उर्जा देतो , नवी प्रेरणा देतो , जगण्याची नवी आशा देतो . 
लढण्याची नवी शक्ती देतो. नवं आत्मज्ञान देतो . हास्य देतो . मायेच स्पर्श हि देतो त्याबरोबर वेदनेचे चटके हि देऊन जातो.
तो घडवतो .शिकवतो , एक विशिष्ट्य आकार देतो आपल्या विचारांना ... नव्या उद्दिष्टांसह , नव्या ध्येया सह..

असा हा आनंद - दुख मिश्रित 'जीवन प्रवास ' हा प्रवासच म्हणजे जीवन नाही का ?
आईच्या पोटी ९ महिने काढल्या नंतर ह्या नव्या जगाशी आपला थेट संबंध जुळतो .
इथूनच आपला मार्ग सुरु होतो . आत्मसात करण्याची अन शिकण्याची मानवी वृत्ती आपल्याला हळूहळू घडवत जाते .
कधी हास्यात कधी दुख वेद्नानाच्या आसवात.......आपण घडतो.
धडपडतो , उठतो , शिकतो ..अन चालत राहतो. आपल्या जीवन वाटेवर...

हाच तो प्रवास असतो ..आपल्या ध्येयाशी जुळलेला .
तर ह्या अश्या प्रवसात काही गमती जमती नक्कीच घडतात ..तर काही गोष्टी मनाला भेदून जातात .
 त्याच इथे मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे .
लवकरच ................
संकेत य पाटेकर
०९.०४.२०१४

______________________________________________________
कालचीच घटना ..
मामाच्या मुलाचं लग्न सोहळा आटपून गावाकडून सायंकाळी पाच च्या सुमारास बाहेर पडलो...परतीच्या प्रवासाठी . पुन्हा त्या कोन्क्रीटी करणाच्या धावत्या शहरात ... जिथे वेळेला हि घाम फुटतो ....कारण ती हि सतत धावत असते . कुणाची पर्वा न करता .. 

खर तर गावातल्या मोकळ्या वातावरणातून पुन्हा त्या प्रदूषणयुक्त धावपळीच्या वातावरणात प्रवेश करन नकोस वाटत होतं .
पण काय करणार ...जिथून आलो आहे तिथे परतावं तर लागतंच ना .
मग ते आपलं घर असो . वा यमदूताच घर ..घर हे घर ...ह्या भूतलावरच अन नंतर मृत्युला कवटाळन्या नंतर...यमाच ...जिथून आलोय तिथे पुन्हा जावंच लागतं .
 तर असो ..
आनंद हा तसा क्षणाचा सोबती असतो. पण तो का एकदा अंगात भिनभिनला कि सदा साथ देतो .
अन अशी आनंदाने भिनभिनलेली हसरी माणसं आपल्याला , 
आपल्या सभोवताली कुठे ना कुठे भेटतच असतात .
असो...
लग्न हा तसा सुख दुखाचा आनंदमय सोहळा . दोन जीवांना एकत्रित करणारा ...
एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची वचनं घेऊन अग्नी भोवती सात फेरे घेण्याचा हा सोहळा..
आसवांचा पाट नकळत ओसंडून वाहणारा हां सोहळा..
आनंदात मौज मस्तीत मुक्त न्हाउन घेण्याचा हा सोहळा ..
साखरपुड्य़ाला सुपारी फोडेपासुन हळद अन लग्ना पर्यंतचा विविध विधींचा हा सोहळा .
तर असा सोहळ्याला साक्षी राहून ..मी निघालो दुसर्या दिवशी घरातून पुन्हा घराकडे ...
गावाकडून शहराकडे ...परळी ते खोपोली. ३ चाकी टमटममधून...
सायंकाळचे ६:१५ झाले होते. परळी तून खोपली फाट्याजवळ उतरलो .
खोपली तून ६ ला सुटणारी मुंबई लोकल आता भेटणारी न्हवती .
त्यामुळे फाट्याजवळच उतरून हात दाखवून पनवेल करिता अथवा ठाण्याकरिता एखादी एस टी किंव्हा दुसरी कुठली चार चाकी मिळते का ते पाहत होतो.  तेवढ्यात एक काळ्या रंगाची करकरीत फोर्ड गाडी रस्त्याच्या कडेला येउन थांबली.
माझ्या बाजूला उभ्या असलेल्या २ स्त्रिया अन एक वयस्कर काका त्या गाडीत जावून बसले .
मी त्यांच्याकडे टकमक पाहत राहिलो. अन विचार करू लागलो. असतील ओळखीचेच कुणीतरी..
म्हणून बसले असतील गाडीत.. आपलं नशीब कुठल थोरं...
आपल्याला दुसर कुठल वाहन मिळत का ते पाहत उभं राहावं लागेल . ..म्हणून आहे तिथेच उभा राहिलो. तेवढ्यात पनवेल का ? अशी गोड हाक कानी ऐकू आली .
नजर त्या स्वराचा मागोवा घेत त्या काळ्या रंगाच्या फोर्ड गाडीकडे वळली.
 आत बसलेली ती जेमतेम ४० च्या आसपासची स्त्री . मला विचारात होती .
पनवेल का ? मी म्हटल हो . अन बसा म्हणून मला त्यांनी जागा दिली .
 पुण्यावरून आलेली ती गाडी आम्हा अनोळख्यांना घेऊन अशी पनवेल च्या दिशेने धावू लागली.
 सुरवातीला वाटलं ती माणसं वाहन चालकाच्या ओळखीचे असावेत . पण तसं काही न्हवतं.
कुणीच कुणाच ओळखीच न्हवतं . पण माणुसकीच्या नात्याने आम्ही काही वेळासाठी हि का असो एकत्रित आलो होतो. अन त्यातून विचारांची देवाण घेवाण ला सुरवात झाली होती . एखादी हसरी अन बोलक्या व्यक्तीमत्वाची माणसं भेटली कि गप्पांना अन वेगवेगळ्या विषयानां उकळी फुटते . मग ऐकणारा शब्द ना शब्द ऐकत जातो . बोलणारा बोलत राहतो. . विचारांची अशी देवान घेवाण होत राहते . त्यातून कधी काही प्रेरणादायी वाक्य बाहेर पडतात. अन ते वाक्य आपल्या जीवनाला काहींदा कलाटणी हि देऊन जातात . 

 पनवेल ला उतरायचं म्हणून गाडीत बसलो खरा ..पण उतरलो ते थेट शीळफाट्याजवळ . ..
ते हि एक पैसा न घेता आणि महत्वाच म्हणजे येता येता आलो ते प्रेरणादायी वाक्य कानी ऐकतच .
 गाडीचे चालक मालक ' मुकुंद कुलकर्णी '' ह्यांच्या जीवनातले अनुभवी बोल.
गरीबलाच गरीबाची अन आपल्या सभोवताली घडणार्या बारीक सारीक गोष्टींची जान असते. 
 जीवनामध्ये चढ उतार असतातच . त्याना सामोरे जा . पडा धडपडा ..पण पुन्हा उभे रहा . प्रामाणिक रहा . जे काम करत आहात ते मनापासून करा ...शिका ..शिकत रहा . 
मला हे जमणार नाही जमत नाही . अस कधी करू नका . स्वतःवर विश्वास ठेवा .  जिथे प्रेरणादायी वातावरण असेल त्या वातावरणातच प्रवेश करा . 

अन त्यातून प्रेरणा घ्या त्यांनी एक उदाहरण दिल . 

कोल्हापूर वरून आलेला एक बारावी झालेला व्यक्ती , शिपाई म्हणून नोकरीला लागतोय काय अन पाच करोडचा BUSINESS करतो काय काय ....अचंबा करणारी गोष्ट आहे .
अफाट मेहनत अन बुद्धीची जोरावर अन शिकत शिकत तो इथवर पोहचला .  अशी काही उदाहरणे देत त्यांनी ते प्रवासाचे काही क्षण अगदी भारावून टाकले .
जाता जाता मलाच THANKU म्हणतं...
म्हणून प्रवास मला आवडतो . तो घडवतो शिकवतो , प्रेरणा देतो . नवी ओळख देतो .
 स्वताची .अन जगाची हि ..
कोण कुठे कसा कधी भेटेल अन आपल्याला MOTIVATE करेल यशस्वी जीवनाकरिता ते सांगता येत नाही . पण ती भेट अविस्मरणीय असते .
- संकेत य पाटेकर
५.०५.२०१४




जीवन एक... प्रवास आहे .
कालचा पुढचा मागचा आत्ताचा , येणार्या उद्याचा , संघर्षाचा , आनंदाचा ..लढून ताठ मानेने अभिमाने जगण्याचा. माझ्या जीवन प्रवासातील अशाच रंजक अन हृदयास भिडणार्या काही आठवणी काही क्षण मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्यातलीच हि एक कालची घटना हृदयास भिडलेली .
' लढा जीवनाशी ...जगण्यासाठी '
सायंकाळी सहाचा न ऐकू येणारा पण डोळ्यांना उभ्या रेषेत दिसणारा घड्याळी टोला वाजला.
 तेंव्हा ऑफिस मधून निघालो. घाई घाईत पायी पायी नेहमीप्रमाणे , डांबरी अन कोन्क्रिट करणाच्या पायवाटेने , कडेकडेने २०-२५ एक मिनिटात थेट अंधेरी स्टेशन गाठले. पुढे चर्चगेट साठी ट्रेन पकडून घामाच्या धारांच्या संगतीने भर गर्दीतून दादर ला पाय उतार झालो.
अन पश्चिमेकडून कडून पूर्वे कडे धावत पळत ७:०१ ची कल्याण लोकल ट्रेन साठी platform क्रमांक ५ वर र एका ठिकाणी रेंगाळत उभा राहिलो.
तोच अन तेवढ्यात नजर एका बाप लेकाच्या जोडी कडे वळली. (खर तर बाप , हा शब्द मी कधी उच्चारात नाही . पण इथे ते देन गरजेच वाटलं म्हणून लिहितोय ) तर माझ्या शेजारीच अगदी platform वर त्या दोघांनी बैठक मारली.
 साधरण सात एक वर्षाचा तो मुलगा अन त्याचे चाळीशीच्या पुढे झुकलेले पप्पा .
 आपल्या लेकाकडे किती आत्मीयतेने पाहत होते. अन बाप लेकाच ते करुणामय चित्र मी अगदी स्तब्ध नजरेने न्हाहाळत होतो. लोकांच्या प्रश्नार्थी नजरा हि त्यांच्याकडे अधून मधून पडत होत्या .
पण त्या दुरूनच .
प्रश्न पडायला कारण हि तसच होत. त्या लहानग्याच्या तोंडावर मास्क लावलेला .
डोक्यावरचे त्याचे केस फारच विरळ झालेले त्यामुळे डोक्यावरची त्वचा अन त्वचा दुरूनही नजरेस दिसून येत होती. अन त्यातच त्या मुलाच्या पप्पा कडे असलेला बगेतील औषधी गोळ्याचा साठा काहीतरी गंभीर आजार असल्याचा दाखला देत होता . 
मी हि ट्रेन ची वाट पाहत त्यांच्या बाजूलाच उभा होतो. त्यांच्याकडे पाहत होतो.
 मनात एकप्रकारे प्रश्नाचं काहूर हि माजलेल. तो औषधी साठा अन त्या लहानग्याला पाहून , नक्की काय आजार असावा ? कॅन्सर सारखा गंभीर आजार तर नसावा ना ?
पण इतक्या लहान मुलाला कॅन्सर कसा होईल . छे, छे ..अजिबात नाही .
 मनात अशा रीतीने माझ्या द्वंद्व सार चालू होतं.
तेवढ्यात त्या मुलाच्या पप्पाने बगेतील औषधाची बिलं काढून अन एकदा स्वताहा चालून माझ्याकडे सुपूर्द केली. , प्रश्नार्थी नजरेने उत्तराच्या अपेक्षातच .
नक्की खर्च झालेला आकडा किती ? ह्या विवंचेत.
हे किती आहे ? त्यांनी माझ्याकडे दिलेल्या बिल कडे बोट दर्शवून मला विचारले ?
हे दीड हजार आहेत अन हे साडे चार हजार , म्हणजे एकूण सहा हजार .
आहे ती आकडे बेरीज करून मी त्यांना सांगितली.
 त्यांनी पुन्हा दुसरं अन तिसरं असं एक एक बिल माझ्याकडे सुपूर्द केलं. त्याचा आकडा हि मी त्यांना सांगितला .  अन त्या सगळ्याची बेरीज करून साडे सात हजार हा आकडा समोर आला . ते समजताच त्यांनी हसतच त्यांच्या डोक्यावर हात ठेवला .
 अन माझ्याकडे पाहून म्हटल .  एका दिवसाचा खर्च ..साडेसात हजार.
मी त्यावर काही बोललो नाही . बस्स स्मित हास्य केलं .
अन प्रश्नार्थी नजरेने पुन्हा त्यांचाकडे अन त्या मुलाकडे पाहू लागलो नक्की काय झालं असेल ?
कसला आजार झाला असेल ? कुठून आले ते ?
असे एक एक प्रश्न मनात एखाद्या वादळीचक्रा प्रमाणे फिरत होते.
म्हणून एकदाच त्यांना विचारल ? काय झाले आहे त्याला ?
 त्यांनी एकवार माझ्याकडे पाहिलं . अन म्हटलं

'' कॅन्सर '' 

ते ऐकून क्षणभर धक्काच बसला .
इतक्या लहान मुलाला कॅन्सर ? कस शक्य आहे ? देवा काय हे ? अजून कळी उमलली नाही तर असा गंभीर आजार...काय केलाय त्याने गुन्हा ?
 पण ते होतं. इवलास वय अन ............ क्षणभर त्यांच्याशी काय बोलावं ते कळत न्हवतं .
त्यांचा मुलगा आपल्या पप्पांच्या मोबाईल वरून आपल्या आईशी संवाद साधत होता . अगदी मोकळेपणाने आपल्या लाडल्या आईशी तो गप्पांत गुंग झाला होता .
' ये आये , आम्ही बारा पर्यंत पोचू बर घरी '
त्याचे त्याचे ते गोड बोबडे बोल अन निरागस हास्य मुकुट माझ्या मनाला मात्र घाव देत होते.
 काय आयुष्य आहे . अजून सुरु हि नाही झालं . तर ....... त्या मुलाला तरी काय कल्पना ...
आपल्याला नक्की काय झालाय .
हुशार आहे हो तो, पण काय ......
त्यांनी एकवार माझ्याकडे पाहिलं ..पण त्यांना पुढे बोलवेना .
तरीही ..'' बरा झालाय तो'' अस म्हणत ते , प्रेमळ आसवांनी आपल्यामुलाकडे पाहताच राहिले.
नाशिक चे ते स्थायिक . गेले तीन महिन्यापासून परेल च्या टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये आपल्या मुलावर उपचार घेत आहेत.
आपल्याला झेपेल तसं ते करतायेत आपल्या मुलासाठी. . कसं जीवन असत एकेकाच .

जो तो लढतोय जीवनाशी . संघर्ष करतोय . कुणी आपल्या जन्मापासून तर कुणी जीवनाच्या अर्ध्या वाटेवर पोहोचल्यावर तर कुणी कधी ... पण संघर्ष आहेच . जीवनाचा जगण्यासठी ....
प्रवास ..... घटना ३
संकेत य पाटेकर
०९.०५.२०१४

























No one has ever become poor by giving ...
वार रविवार आपल्या हक्काचा सुट्टीचा दिवस . दिवस भर आराम करून संध्याकाळच्या वेळेस सहज फेरफटका मारावा म्हणून घराबाहेर पडलो .
दुर्तफा झाडींनी अन फुलांनी बहरलेल्या त्या डांबरी रस्त्यातून ..कडे कडेने ..मनात बहरलेले विचार घेऊन ...भविष्याचा वेध घेत . पाउला पाउलानिशि पुढे जात होतो .
तेवढ्यात कुठेशी नजरा नजर झाली.
 रस्त्या पलीकडल्या त्या ' बाई' भुकेच्या व्याकुळतेने केविलवाण्या चेहऱ्याने माझ्या जवळ आल्या .
अन १०- २० रुपये मिळतील का ? भूख लागले ? अस म्हणत माझ्याकडे हात पसरू लागल्या .
जेमतेम ४०-४५ च्या आसपासच्या नववारी साडी नेसलेल्या त्या बाई पेह्रावरून अन दिसण्यावरून तरी धडधाकट दिसत होत्या .
हल्ली भिख मागण हा देखील धंदा झालाय.
त्यामुळे पैसे काढून द्यावे कि नको ह्या विचारात मी होतो. तसे दहा - वीस रुपये द्याला काही मोठे न्हवते . पण म्हटल त्याआधी तीला विचारुया कुठून आलात ? इथे कश्या ?
आणि भिख का म्हणून मागत आहात ?
तेवढ्याच २ गोष्टी समजतील त्यांच्या जीवनातल्या . म्हणून विचारायला लागलो.
तेंव्हां ती बोलू लागली.
अकोल्या वरून आले . बहिणीसोबत इथेच राहते ..मिस्तर आहेत पण ते साईट वर आहेत त्यांचा फोन लागत नाही.अस तसं..
 माझ्या मनाला मात्र जे तिने सांगितल ते कुणास ठाऊक पटल नाही.
मी मनाशी काहीस ठरवून पैसे न देता..त्यांना sorry म्हणत पुढे निघालो . 
पण मनातली हि विचारांची धारा काही स्थिर राहत न्हवती. रस्त्याने चालत होतो पण मन स्वस्थ बसत न्हवतं .
' मन' च मनास प्रश्न करत होतं .
 काही क्षणाच्या भेटीवर अन कोणत्या विश्वासावर ती तुला तिच्या जीवनातले सर्व गोष्टी सांगत बसेल ?
१०-२ रुपये दिले असते तर काही बिघडल असतं का ? अरे कालच एक वाक्य वाचलंस ना रे ...
No one has ever become poor by giving ...मग का ?
का दिले नाहीस पैसे ? दहा वीस रुपयाने तुझ काही कमी होणार आहे का ?
 इतकं हि तुझं जीवन फाटकं नाही ? चल मागे फिर ..जा पुन्हा त्या बाई कडे ?
दुसर्याच्या आनंदातच आपला आनंद असे मानतोस?
 मग एखाद्याने जर आपल्याकडे काही मागितल अन ते देण्यास आपण सक्षम असू ?
मग ते का देऊ नये ? अरे पण ? कोणालाही अस द्याव ?
उगाच, काही एक कष्ट न घेता आयात अस मिळतंय म्हणून, भिख मागावी का ?
पण दुसर मन हे मानण्यास तयार होईना ... एकच वाक्य ..सतत उमटे मनाच्या अंतरीतून
No one has ever become poor by giving .....
रस्त्याच्या एका वळणावर पाउल थबकली . मी मागे फिरलो . पुन्हा त्याच दिशेने .... नजर इकडे तिकडे वळविली . पण वेळ निघून गेली होती. पुन्हा न परतण्यासाठी...
 एव्हाना त्या बाई दूर निघून गेल्या होत्या ...त्यांच्या वाटेने .. मी मात्र शोधार्ती नजरेने मनाशी एकच वाक्य पुटपुटत होतो.
No one has ever become poor by giving .....
प्रेम असो वा प्रेमळ शब्द वा मायेचा हलका स्पर्श वा इतर गोष्टी मग पैसा असो वा आपली मदत . 
आपल्याने जर एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलत असेल तर ते जरूर करावे .
-संकेत य पाटेकर
१९.०५.२०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .