मी लहान होतो . अगदीच लहान नाही , बहुदा चौथी पाचवीत किन्ह्वा सहावीत असेन .
नुकतीच शाळेला सुट्टी पडली होती. म्हणून आत्याकडे राहण्यास आलो होतो काही दिवस .
माझ्या आत्याच घर तस प्रशस्त .
घरासमोरच मोठं मोकळ मैदान . आणि ते हि चहुबाजूंनी , सदाफुली , जास्वंद , पेरू , बदाम , चिंच , बोर , वड, पिंपळ , रुई , अडुळसा, कोरफड , तुळस ह्याच्या सारख्या ना ना विविध वनस्पतींनी फुलझाडे अन फळझाडांनी नटलेल . त्यामुळे हवा नेहमी खेळती अन शुद्ध असायची .
तसे खेळाचे मौज मजेचे ते दिवस. शिकण्या सावरण्याचे दिवस ..
माझ्या आत्याचा कुटुंब कबिला तसा मोठा. २ मुले आणि २ मुली दोघा बहिणींची लग्न झालेली . एकीला तीन तर दुसरीला २ मुले , ते हि तिथे सुट्टीत असायचे .
ते हि माझ्याच वयाचे .
आमचा नित्य नेहमीचा क्रम ठरलेला असे.
सकाळी लवकर उठून चहा पोळी खाऊन समोरच असलेल्या मोकळ्या मैदनात सकाळच्या कोवळ्या उन्हात क्रिकेट खेळायचं अन पुन्हा दुपारच्या भोजन कार्यक्रम वेळीसच घरात पाउल टाकयच .
त्या दिवशीही असच बाहेर पडलो . खेळून वगैरे झालं.
आणि असंच भटकत भटकत एका झाडाखाली मी आलो , मला वाटत तो भेंडीचा झाड असावा .
त्याच्या उंच शेंड्यावर कावळो बाने आपल घरट बांधलं होतं .
आणि त्यात तो बहुदा एकटा राहत असे .
'' समज'' हि तशी हळू हळू येत असते . जसे वयोमाना नुसार एक एक घडा मोडी घडत जातात .
लहानपणी काही गोष्टी समजत नसतात . पण त्यातनं मिळणारा आंनद मात्र आपण उपभोगत असतो .
त्या खेळीत आपण मग्न असतो.
असंच झाडाच्या उंच शेंड्यावर आपल घरट बांधून वास्त्यवास असलेल्या त्या कावळो बास त्याच्याच घरट्यातून हिसकावून देण्याच्या प्रयत्नात मी होतो .
माझ्यासठी तेंव्हा तो एक प्रकारे खेळ होता .
जमिनीवर निपचित पडलेले बारीक सारीक दगड धोंडे उचलत त्यावर मारा करत होतो . पहिला नेम चुकला , दुसरा हि चुकला ..आणि तिसरा बरोबर जावून बसला तो त्याच्या घरट्यातच .
ते पाहून कावळो बानी तेंव्हा स्वतःला कसे बसे सावरत पंख फडफडवत इतर ठिकाण उड्डाण केले . पण त्याच्या मनाची माझ्या बद्दल निर्माण झालेली द्वेषाची ठिणगी काही मिटली नाही .मिटणार तरी कशी ? त्याचा प्रत्यय मला पुढे आलाच कावळोबानी पलायन केले हे पाहून मी माघारी म्हणजेच घरच्या दिशेला निघू लागलो.
आणि तेवढ्यात कुठून कसा ....तो कावळोबा सूड म्हणून, नेमका माझ्या मागून येउन बरोबर मानेलाच चोच मारून पसार झाला पुन्हा त्याच्या घरट्याजवळ . अशा तर्हेने मला तिथे एक शिकवण मिळाली .
पक्षी प्राणी हि आपला सूड घेतात .
- संकेत य पाटेकर
१६.१०.२०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .