बुधवार, १७ सप्टेंबर, २०१४

भावनिक खेळ ..

खरंच किती गंमत आहे ...ह्या भावनिक खेळामध्ये ...
कुणी भरभरूनं कौतुक करतं. आपण केलेल्या एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल किंव्हा करत असलेल्या एखाद कुठल्या गोष्टीबद्दल ...तर कुणी चतकोर शब्द हि काढत नाही.
 उलट नाक मुरडून घेतात अन दुरूनच आपल्यावर नजर ठेऊन राहतात.
तर कुणी बोल लावून ' आपलंच (स्वतःच ) ते योग्य अस म्हणतं आपल्या मनावर आघात करत राहतात.

पण ह्या सर्वांतून ' आपलं मन' मात्र योग्य ते वळण घेत राहतं. पुढे जातं राहतं .

आयुष्यात खूप काही शिकण्यासारखं आहे .
पण मला वाटत सर्वप्रथम आपण शिकतो ते आपल्याच माणसांकडून ....ह्या समाजाकडून ....
ज्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळते मग ती शब्दिक असो वा हळुवार पाठीवरल्या मायेच्या स्पर्शाची.. त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळत राहतं . पुढे जाण्यासाठी.....नाही कि त्यात हुरळून जाण्यासाठी .

लोकं आकार देण्याचं काम करतात . अन  त्यातून आपण स्व:तहा घडत जातो. 
आपल्याला हवं तसं. 

असंच लिहिता लिहिता ..
- संकेत पाटेकर
१६.०९.२०१४

२ टिप्पण्या:

  1. Sanket,
    Mi aaj pahilyandach tuzya ya blog var pochlo. Chhan, masta lihitos tu. Really very good. Magche 3/4 tas mi ya blogvarcha likhan vachto ahe.
    Keep it up.
    Dipawalichya Hardik Shubheccha!
    -Vivek Vatve
    vrvatve@rediffmail.com

    उत्तर द्याहटवा
  2. आपणासही दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ...
    वेळ काढून आपण माझ्या ब्लॉग ला भेट दिलीत अन त्याबद्दल प्रतिक्रिया दिलीत त्याब्ब्द्दल आपले मनापसून धन्यवाद ..!

    उत्तर द्याहटवा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .