जीवन एक प्रवास आहे ...सुख दु:खाचा, गोड कटू आठवणींचा , प्रेमाचा अन संघर्षाचा.. अन अशा ह्या प्रवासात कितीतरी बरे - वाईट अनुभव आपणास येतात. ह्या अनुभवानेच आपण शिकतो. घडतो. अन आपल्या पुढील जीवनाची वाटचाल सुरु ठेवतो. माझ्या आयुष्यातले असेच काही क्षण मी तुमच्यापुढे मांडत आहे. जे मी अनुभवलेत, माझ्या शब्दात ..माझे जीवनानुभव ..! - संकेत पाटेकर
मंगळवार, ३० डिसेंबर, २०१४
आत्ताच हाती आलेल्या सुचनेनुसार ..,
कधी कधी ह्या आपल्या नित्य नेहमी जीवन वाहिनीतून , रेल्वेतून प्रवास करतेवेळी, काळीज पिळवनारे प्रसंग जसे नजरेसमोर येतात तसेच हास्य कल्लोळलाने भरगच्च असे कित्येक क्षण देखील आपल्या चेहऱ्यावरील स्मित हास्य रेषा एखाद कळी सारखे हळूच उमलू देतात.
आजचीच घटना ,
सकाळी ८ वाजून ५० मिनिटाची ठाण्याकडून सीएसटी करिता, फलाट क्रमांक एक उभी असलेली लोकल ९ वाजून गेले तरी जागीची हलेना , वेळेत पोहोचण्यासाठी नेहमीच घाईत असलेले मुबई ठाण्याचे लोक अश्यावेळी वैतागतात ह्यात काही नवल नाही .सांगायची गरज नाही . काही जण मग मुकाट्याने दुसरी एक ट्रेन पकडतात. अन पुढे निघून जातात . तर काही जण तिथेच बसून आपल्या ट्रेन सुटण्याची वाट पाहत राहतात.
मी हि अश्यातलाच ...ट्रेन सुटण्याची वाट पाहत उभाच होतो . तेवढ्यात
दाराशी उभ्या असलेल्या एकाने हळूच म्हटले, ' बाबा हि ट्रेन आता रद्द होणार आहे बहुतेक .
मोटार मनच गाडी खाली गेला आहे ?
गाडी खाली म्हणजे ? मला क्षणभर कळेनाच ?
तेंव्हा त्याने त्याबद्दल खुलासा केला , ट्रेन सुरु होत नाही आहे, काही तरी बिघाड आहे ते पाहण्यासाठी , ट्रेन खाली काय तर करतोय तो ...
तेंव्हा मी हि डोकावून पाहिलं तर खरच काहीतरी काम चालू होत.
सकाळची वेळ अन अशातच इतका वेळ गाडी उभी , कामावर जाईची लोकांची घाई , लोक ताटकळत ट्रेन सुटण्याची वाट पाहतायेत .
तेवढ्यात भोंग्यातून Announcement ऐकू येते . Paltform no. एक वर उभी असलेली लोकल काही कारणास्तव रद्द करण्यात येत आहे.
हे ऐकू येताच भरगच्च खचून भरलेली ती ट्रेन क्षणात रिकामी झाली .....
पाउलं पटा पटा एक एक करून बाहेर पडू लागली. पुढच्या फलाटा दिशेने ....पुढच्या ट्रेन साठी .
मनातल्या मनात शिव्या हासडत ... इतका वेळ वाया गेला उगाच, अस गुणगुणत .
ते गुणगुणत असताच वाऱ्या वेगात पुन्हा एक Announcement ऐकू येते .
Paltform No. एक वर उभी असलेली ट्रेन सीएसटी करता आता रवाना होत आहे.
हे ऐकताच पुढे जाणार्या लोकाची पाउलं जागीच थांबली , पुन्हा रिवर्स घेत मागे वळली .
पुन्हा पळापळ...धावपळ ..सीट मिळविण्यासाठी.
कुणाच्या तोंडी हसू तर कुणाच्या तोंडी शिव्या .. काय नुसतं इकडून तिकडून पळापळ ....
जीवन वाहिनीतिले असे विविध रंग आपल्या प्रवासा दरम्यान अनुभवता येतात.
नाही का ?
संकेत य पाटेकर
३०.१२.२०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
सर्वच नाती काही रक्ताची नसतात . काही नाती मनानं जुळली जातात . आयुष्याच्या पायवाटेवर निवांतपणे कधी धावत पळत असता... त्यात बहिण भावाच्या ...
-
तुझ्यावरच्या चारोळ्या ..... आयुष्यात एकदा तरी आपण प्रेमात पडतो. अन आपले भान सर्वस्वी त्या व्यक्तीपुढे हरपून बसतो... नवी ओळख असते नवं न...
-
खूप काही लिहूस वाटतंय आज ? कारण हे मनं , फारच अस्वस्थ झालंय . हळवं झालंय ते , 'कारण 'संवाद' हरवला आहे'. बंध नात्यातला ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .