बहिण- भावाच्या प्रेमावर आधारित एक छोटीशी कहाणी ...लिहिण्याचा प्रयत्न
बघू कितपत जमतंय ...सुरवात तर झालेय ...
नाती कधी ठरवून जुळवता येत नाही , अन म्हणूनच मनाच्या अंतरंगी उसळणाऱ्या उत्कट भावनांना हि कधी थोपवून ठेवता येत नाही . अशावेळी मनाचं हे वेडेपण शब्दांतून कथित होत जातं.
पुढच्या जन्मी , मी ' तुझा भाऊ ' म्हणून जन्म घेईन.
किंव्हा तू ' माझी बहिण' म्हणून जन्म घे ? कसही असो.
पण हे नातं आपलं जन्मापासून हवंय मला ... बस्स ? आपल्या दोघांच ...बहीण - भावाचं
मी आधीच माझ्या देवाकडे साकडं घातलंय , तू हि साकडं घालं.
पण त्या आधी ,तुझ्या अंतकरणातून उमटलेले शब्द मला कळू देतं, ऐकू देतं. मनभरून ..!
मिळेल ना हे नातं ..बहीण - भावाचं ..सक्खेपणाचं , बोल ना ..
बहिणीच्या नजरेला नजर देतं पाणावलेल्या डोळ्यांनी अन जड अंतकरणानी तो बोलत होता. पुढ्यात असलेला चहा हि एव्हाना थंड झाला होता .
कित्येक दिवसाच्या भेटी नंतर हा असा दुर्मिळ योग पुन्हा जुळून आला होता . त्यामुळे दोघं हि बोलण्यात अगदी गुंग झाले होते. . गत आठवणीच्या क्षणांना सुगंधित अत्तराची फोडणी देतं.
तसं आयुष्यात नाती हि अनमोल असतात. सुवर्ण मुद्रित मुखुटासारखी ,अभिमानाने लखलखनारी.., हेवा वाटून घ्यावी अशी.. कायम हृदय समीप हवी असलेली ... ती नाती मग रक्ताची असो वा मनाची , मनाने जुळलेली , हृदयाची धडधड थांबेपर्यंत ती आपली असतात. आपल्यात असतात.
जन्म मरण हा तर प्रकृतीचा नियम . जन्मापासून ते मरणापर्यंत सगळ काही ठरवून दिलेलं . अन त्या त्या प्रमाणे, त्या नुसार घडणारं . पण तरीही भविष्याचा वेध घेत जगत असणारे आपण जीवनातला हर एक क्षण एकमेकांच्या ओढीने, एकमेकां सहाय्याने , ओथंबून निथळनाऱ्या मायेने, शब्द गोडव्याने , गोंजारणार्या भावगंध स्पर्शाने , प्रेमाने, कायम घट्ट विणून राहावं म्हणून प्रयत्नशील असतो.
असाच हा एक प्रयत्न आयुष्याच्या एका वळणावर जुळलेल्या त्या नात्याची वीण कायम घट्ट राहावी म्हणून धडपडनाऱ्या त्या एका मुलाचा ... त्या प्रेम वेड्या भावाचा...
क्रमश :-
संकेत य पाटेकर
०७.०१.२०१५
खालील इमेज हि नेट वरून घेतली आहे .
Nice Blog…..
उत्तर द्याहटवाPlease Add your Blog in our Indian Blog Directory for more readers.
http://www.blogdhamal.com
भाऊ आणि बहिणीचे नाते खूप अनमोल आणि घट्ट असतं.......म्हणून तर ते मानलं जातं......फुलो का तारो का सबका केहना हे...एक हजारो में मेरी बेह्न हे....सारी उमर हमे संग रेहना हे ....पण खरे तर सारी उमर नाही तर नाही...कारण प्रत्येक घरातील लेकीला एक न एक दिवस माहेर सोडून सासरी नांदावे लागतेच.........असो.आयुष्य हे असेच असते.....
उत्तर द्याहटवा