बुधवार, २६ ऑगस्ट, २०१५

तुझं प्रेम...

हरलो अगं ! सरते शेवटी हरलोच..
नात्यातील ती रसिकता , तो आपलेपणा , ती शब्दांची मोहकता , त्यातला प्रांजळपणा प्रयत्न करूनही मला पुन्हा मिळविता आला नाही . हरलो मी ....
तुझ्या अविश्वासालाच पात्र , हो ना ?
कितीसा धडपडलो , रडलो , सावरलो , प्रयत्नाची शर्थ केली. पण नाही .
म्हणतात ना , एकदा का कुणाच्या मनातून आपण उतरलो , अविश्वासाच्या पात्र ठरलो ,कि मग पुन्हा जैसे थे स्थिती होणे .कठीणच....
माझा हि असंच झालं आहे बघ . पण मी प्रयत्न केले हा …
मनापासून अगदी ..नाही अस नाही .

मुळात मी कुठे चुकलो ? 
हेच मला अद्याप कळलेलं नाही. अन तू सांगितले हि नाहीस . फक्त इतकं तू म्हणालीस ..
''परिस्थिती माणसाला बदलते रे , मी हि बदलले , तू कुठे चुकला नाहीस'' .
बस्स एवढंच ते वाक्य ...अजूनही मनाची खापरं तोडतंय.

मी कुठेच चुकलो नाही . मग तरीही तू , मला तुझ्यापासून दूर ढकलतेस ? का रे ? कश्यासाठी ? मला हे कळून येत नाही आहे, अग ! सांग ना ..
प्रत्येक भेटीत , किती विश्वासानं तुझ्या कडे पाहतो . कान टवकारतो .
क्षणभरल्या तुझ्या त्या सहवासात.. तुझं प्रेमभरलं एक एक शब्द वेचण्यासाठी ..
पण खर सांगू ..त्या शब्द वलयात 'आपलेपणा' असा गवसलाच नाही कधी, .
ह्या मागील दोन तीन वर्षात ...
तुच लाडीकतेने देऊ केलेलं माझं नावं घे ना ..सारं जग त्या नावाने हाक मारतं आता , पण तू ....नाही . कुठेशी टोचतं हे मनाला , तुला कसं कळणारं ? 
खंर सांग ना , कुठे चुकतोय मी ?
कितीस ओरडून सांगितल तुला , हक्काचं नातं म्हणून भांडलो हि कित्येकदा,
अन रुठावलो हि ....ठाऊक आहे .
एकदा तर रागानेच लालबुंद होवून दिवसभर मोबाईल बंद ठेवून ..वेड्यासारखा भटकत राहिलो होतो.
सकाळी निघालेलो कुणास न विचारता,  ते थेट रात्री घरी परतलेलो .
किती रागावले होते सगळे . . माझी तर हजेरीच घेतली होती साऱ्यांनी .
पण आता क्षणभराच्या माझ्या रागाला मी हळूच थोपवतो अन म्हणतो , 'अरे वेड्या अस रागावून कस चालेल ,आपली आहे ना ती , जिव्हाळ्याची जिवलग   ..बस्स , जरा शांत हो ,
कित्येकदा अशी स्वतःची समजूत घातली .
आज ना उद्या तो एक दिवस उजाडेलच ह्या आशेवरच चालत राहिलो .
दिवस ढकलत राहिलो . कधीतरी तू आपलेपणाने बोलशील ..आपलेपणाने जवळ घेशील . पण नाही ग ..हरलो मी ..
सहजा सहजी कुणाला आपलंस करता येत नाही ..हेच खरं ..
तू तर आपलीच आहे . तरीही मी असा बघ ..,
तो विश्वास मी हरवून बसलोय ..अन आपल्या नात्यातली ती रसिकता हि ..
हरलो मी..........हरलो अगं !
पण अजूनही एक आशेची हलकीशी दीप मनाच्या अंधाऱ्या खोलीत निर्विकारपणे तेवत आहे.
ऐकतेस ना गं !
तुझाच ,
असंच काहीसं डोक्यात घुनघूनलेलं, 
सहज उमटलेलं ...
संकेत पाटेकर 
२५.०८.२०१५


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .