ऐक ना, त्या नदीच्या
प्रवाहाकडे बघ ? किती संथपणे अलगद वाहत आहे ती, वळणा -वळणाचा एक एक
घाट अगदी सहजतेने ओलांडत ? बघतो आहेस ?
हो ?
असं वाटतंय, मी
जगावेगळ्या स्वप्नं नगरीतच वावरतेयं रे, किती भन्नाट जग आहे हे
,
मी असं कधी अनुभवलं
नाही ह्यापूर्वी........
हि अशी ध्यानस्त मनाला
गुंगवणारी रात्र , हा नदीचा संथ नितळ प्रवाह ..तो चंद्रमा , त्याची शुभ्र
हळवी शीतलता , झाड फांद्यांची हि स्थिरता- अस्थिरता, तना मनाला भाव
रंगात ढकलून देणारा हा मंद झुळकार वारा ...आणि आपण दोघे, एकटे
अन सोबत हि निःशब्दता ..., प्रेम रंगला अधिक गडद करणारी .....
काय वाटतं रे
तुला ?
ह्या अश्या ऐकून
वातारणाकडे पाहून ...
तुझ्या शब्दात वीण ना
काही ?
मला ऐकायचं
आहे.........., तुझ्यातल्या लेखक अन कवी मनाकडून ...
इतका एकांत आजपूर्वी
कधी मिळालाच न्हवता अन अन अशी नामी संधी हि ...
सांग बरं आता ?
चेहऱ्यावरती मंद
हास्य उजळून त्याने हळूच तिच्याकडे पाहिलं . तिच्या चेहऱ्यावरची निरागसता अन
कुतुहूल वाढीस लागलेलं. प्रेम रंगाच्या धुंदीत ते रसिक सुवासिक फुल
हळुवार डवरलं जात होतं.
त्याने अधिक वेळ न घेता
शब्द मोहायला सुरवात केली .
इतकं छान वर्णन केले
आहेस तू ? मी आणिक काय बरं सांगणार ?
तू जे पाहिलेस वा पाहते
आहेस नं , तेच मी हि पाहतो आहे . पण माझा रोख त्या नदीतल्या संथ प्रवाहाकडे
आणि त्यात स्थिरावलेल्या त्या चंद्रमाकडे अधिक लागून आहे.
का बरं ?
हि संथ वळण घेत वाहणारी
नदी आणि तो वर मैलो दूर असलेला चंद्र .....पाहतेस ना ?
हो ,
काय बरं नातं असावं
दोघात ?
मैत्रीतलं प्रेम
कि प्रेमातली मैत्री ?
सूर्य मावळतीला लागल्यावर , हि नदी हि
कशी, बघ... संथ रूप धारण करते. दिवसभरातला तो खळखळाट , आलेला शिणवठा आदी , त्या
निरव शांततेत ढवळून जातो . ती संथ होते. एकपात्री होते.
स्वतःला मोकळं करुण घेत .
तारुण्यसुलभ एखाद स्त्रीने आपला केशसंभार मोकळा
करावं ना तसंच . ..ती हि मोकळी होते.
आणि तेंव्हाच दिवसा लपंडाव खेळणारा हा
'चंद्रमा' तिच्या 'हृदयी 'मोकळा असा श्वास घेत स्वतःला हळूच सामावून
घेतो. तिच्या गर्द मिठीत , तिला घट्ट बिलगून, श्वासाचं जाळं विस्तारत.
ती प्रेमवेडी हि ह्याच क्षणांची आतुरतेने
वाट पाहत असते . रोज.. अशी कित्येक रात्र.....
बापरे....इतका विचार ,
माझ्याकडनं हि झाला नंसता रे ?
कसं सुचत तुला ?
त्याने तिच्याकडे सहज
पाहिलं .
तिच्या 'स्वरात'
आपलेपणाचा गहिरा भाव त्याला दिसून येत होता.
सहज रे , दृष्टी अन सृष्टीचे हे खेळ आहेत.
त्याला बस्स आपल्या मनातले भावरंग हळूच जोडायचे इतकंच...
अच्छा ...
हं ..
मग काय आहे त्या दोघांत
, मैत्रीतलं प्रेम कि प्रेमातली मैत्री ?
दोन्ही हि.......
कसं ?
मैत्री शिवाय प्रेम नाही. अन प्रेमाशिवाय हि
मैत्री .
दोघांत हि बघ , मैलोच अंतर आहे . पण तरीही
..ते दोघे एकमेकांशी हे प्रेमाचं नातं टिकून आहे .
आजही.. अद्यापही, शेकडो वर्ष ...
मनातलं हे (एकमेकांचं ) 'प्रतिबिंब' जपता आलं
पाहिजे रे ...आयुष्यभर .
तिने त्याकडे एकवार
पाहिलं. कुठल्याश्या गर्द विचारी प्रवाहात तो हरवून गेला होता.
तिने हि त्याच्या
बाहुपाशात स्वःताला विसावून घेतलं होतं .
- संकेत य पाटेकर
१२.०१.२०१७
Email :- sanketpatekar2009@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .