बुधवार, २५ जानेवारी, २०१७

‘तो आणि ती ...’


काय अशी पाहतेस ? एकटक अश्या नजरेनी ..
त्याने हळुवार सवाल केला .
'प्रेम'  तिने लगभगिने उत्तर दिलं.
प्रेम ?
हो ...
अच्छा , मग सांग बरं ….
किती प्रेम दिसलं तुला,   माझ्या डोळ्याआड  साठलेलं ? त्याने पुन्हा तिला प्रश्नांनी छेडलं .
तेच तर पहातेयं   ना ..
म्हणजे अजून तुला  कळलं  नाहीतर ? 
तसं नाही रे..
मग कसं?
तुझ्या डोळ्यातील जादू निरखतेय  , फार बोलके आहेत ते ,  जसं तुझं हे मन...  
अच्छा ..( भुवया उंचावून ..)
हं ,
तुझं  प्रेम आहे.  ते निशंक आहेच.
पण तूच म्हणतोस ना , कि प्रेमाला मापता तोलता येत नाही  ? मग,  मी तरी का  सांगू,  हा ?
त्याच्याच विचारांचं संदर्भ  देत , तिने त्याच्याच प्रश्नावर उत्तरीय झेप घेतली .
शोभतेस  हा तू  , माझी बायको म्हणून ...
हो का ? तिने नकट्या लाडीनं ,  त्यास चिमटा घेतला .
अजून आपलं लग्न तरी कुठे झालं आहे ? इतक्यात बायकोचा शेरा देत आहेस ते  ?
म्हणून काय झालं ,  लग्न नाही , तरी एक पत्नी म्हणून,  मी तुला केंव्हाच स्वीकारलं आहे .
हो,  हो,..माहित आहे मला... , ‘ तिने हलकं स्मित हास्य करत म्हटलं.’
पण समज , मी तुझ्याशी लग्नच केलं नाही तर ,   एक दीर्घ  श्वास घेतं... तिने उसासा टाकला . आपलं मन मोकळं केलं .
तिच्या ह्या आकस्मिक प्रश्नाने मात्र , त्याची हसरी मुद्रा क्षणात प्रश्नांकित झाली . 

लाटेवरती लाट कोसळत जावी तशी विचारांची धडकी मनात  घेर करू लागली. 
सैरभैर वादळासारखी अवस्थेने,  उचल खाल्लीच  होती . पण तोच ,
मावळत्या क्षितिजाशी , उमटलेल्या असंख्य भावपूर्ण रंगछटाईंनी त्याची नजर व्यापली गेली.   अन काहीसा धीरगंभीर अवस्थेतून शांत प्रवाहासारखा तो  एकांतात  गढून गेला.  


काय रे , इतका शांत  ? 
निवांत पहुडलेल्या एखाद्या डोहाशी , फिरकी वाऱ्यानं अलगद  झेप घ्यावी अन  नवं तरंग उमटावेत,  तसा तो तिच्या आवाजानं, पुन्हा त्याच विषयाशी प्रवाहित झाला .
काही नाही....
म असा प्रश्न विचारल्यावर , एकाकी  हरवलास तो ? ती चेहऱ्यावरचा भाव निरखत म्हणाली.
प्रश्न होताच तसा तुझा, अपेक्षेपलीकडचा...., विचारांच्या प्रवाहात  त्याने उत्तर दिल .
आयुष्यात बऱ्याच गोष्टी , ज्या घडतात त्या अनपेक्षितच असतात रे, अपेक्षा ठेवून सगळंच मिळत असं कुठे आहे ?
मान्य आहे. (थोडं थांबून...) .पण प्रयत्न अन सातत्य राखून , आपण  बदल हि घडवून आणू शकतो ना ?
त्याला दैवी जोड हवी रे . नुसते प्रयत्न हि निष्फळ . तिने एक सुस्कारा सोडला.
तू अशी झुकत्या विचारांकडे का वळतेस नेहमी...
जे शक्य नाही . तिथे असेच विचार येणार...
आपल्या लग्नाचं मला वाटत नाही . ते होईल म्हणून ....

क्रमश :-
क्रमश  :- 
संकेत पाटेकर 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .