सोमवार, २० फेब्रुवारी, २०१७

प्रार्थना शब्दांसाठी..

प्रार्थना ।। 
शब्दांसाठी। ।।

हे भगवंता ! 
मनातून उमळणाऱ्या ह्या शब्दांना इतकी माया, प्रेम दे, कि त्याने कधी कुणाचं मन दुखावलं जाऊ नये. 

आपलेपणाचा त्यांस इतका सुंगंधित सुवास दे, कि त्याने दुरावलेली नाती गॊती पुन्हा एकत्रित जुळू देतं.

शौर्याइतकचं प्रेरणादायी आग हि त्यात तळपू देत. जेणेकरून, ढासळलेल्या बुरज मनाला पुन्हा आभाळाकडं निर्भीड पण पाहता येईल.
आयुष्याची लढाई सहज अशी जिंकता येईल.

सौन्दर्याची हि इतकी अमाप रूपरेखाटनं जोडून दे, कि कोमजलेल्या कुठल्याही मनाला त्या शब्दसौन्दर्याची भुरळ पडून , तो आनंदाने दौडू लागेल.
नवं चैतन्याची अतरंगी शाल लपेटत.

वज्रासारखी प्रचंड अशी ताकद हि दे, जेणेकरून सर्व वाईट प्रवृत्तीच्या, हृदयी पाषाणा लाही , 
शब्दसख्यांचे, वज्रघाव बसून त्यातून मानवी
प्रेमाचा उमाळा ओघळू लागेल. 

आणि 
हे भगवंता !! 
सर्वात महत्वाचं, ह्या माझ्या मनाला हि अहंकारी परिघापासून, वलयापासून दूर ठेव.
इतकंच...
 
संकेत य पाटेकर
२१.०१.२०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .