काळ्या
पाषाणाला दुधाळ अभिषेक ....!
ह्या
निसर्गाची हि ना ना कलात्मक अंगे , ना ना विविध अशी रचना, रंगरूपे
, किती विस्मयकारक असतात न्हाई...! म्हणजे...कधी.. कुठे..कश्यात तो कोणता रंग भरेल
आणि मनाशी कोणता भावरंग चढवेल ह्याचा काही नेम नाही. आणि नसतोच मुळी.
मनाची
सुंदरता नजरेत जर उतरत असेल तर ते अनुभवंन हि
फार कठीण नाही. सहजासहजी ते नजरेत उतरेल
वा भरेल . मनभर आनंदी मळा फुलवूंन
..
कोर्लई
कडे ..एक एक पाऊलं सरत असताना...लहरी लाटांशी,
नजरेचा लपंडाव सुरु असताना , धडाडणाऱ्या
गाजेचा प्रतिध्वनी उमटत असताना ,
त्या
वळणावर क्षणभर थांबलो मी .. काळ्या पाषाणावर
होणाऱ्या त्या दुधाळ अभिषेकाने ....
मनभर
विचारांचाही हि अभिषेक सुरु झाला होता .
'दूर
आणिक जवळीकता'' ह्यात क्षणिक अंतर केवळ
.....आपण किती लांबवून ठेवतो न्हाई ?
घरंगळत
येणाऱ्या , त्या शुभ फेसाळ लाटेसारखं, आपलेपणाची ओढ अशी.. क्षणा क्षणाला उमटत असेल तर ...तर ह्या
काळ्या पाषाणासारखं दुधाळ अभिषेक होतंच
राहील....अविरत !! आपल्या मनावरही ...
तो दुधाळ
लाटांचा अभिषेक मला , एकटेपणात गढलेल्या आणि मनातून तुटलेल्या ..मनावरचा आपलेपणचा वर्षाव
वाटला. आईच्या पदराखालीची मायेची उब तेंव्हा
कुठूनशी मनाला अलगद स्पर्शून गेली. कष्टाने
सुरकुतलेले ते प्रेमळ हात ...केसावरुन अलगद
फिरल्यासारखे झाले.
हलकेपणाचा
शिडकावा त्यानं मनभर पसरला गेला.
मनाच्या डोहातून नजरेच्या खळीत आसवांचा
जमाव सुरु होण्याआधीच...थांबलेली वाट मी पुन्हा चालू लागलो....
- संकेत
पाटेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .