दाटून
आलेल्या कृष्णमेघासारखी त्याची अवस्था झाली होती . बैचेनी लगभगिनं वाढली होती,
क्षणभरातच....म्ह्णूनच बरसायचं होतं त्याला ..सगळं मनातलं वाहून देत .
बोलायचं
होतं तिच्याशी , व्हायचं होतं मोकळं आणि मनानं हलकं हलकं , पण धीर होतं नव्हतं .
म्हणायला
बोलणं सुरुच होतं मगासपासुन दोघात हि , झाले असतील आता काही एक मिनिटं त्यालाही ,
पण हवं ते मनातलं ओठाशी येत न्हवतं. घेर घेतलेल्या भावनांना योग्य तो न्याय मिळत
न्हवता .हवे ते शब्द फुटत न्हवते . कसं बोलू रे , कसं बोलावं ? तेच उमगत
न्हवतं .
''गप्पा
बसा रे तुम्ही '' .नाही बोलता येणार मला आज, सांगितलं ना एकदा , पुन्हा तेच ..तेच
काय आहे ?मनाचं मनाशीच थोपटनं आणि दटावनं सुरु झालं.
तसा
खूप जीव आहे तिच्यावर ,तिच्या हसऱ्या प्रेमळ स्वभावावर , तिच्या कलागुणांवर ,
म्हणूनच वाटतं राहत, तिच्या सहवासातच राहावं कायम, पण नाही.
नाही
तसं होऊ शकत . नियतीचे तसे संकेतच आहेत म्हणा,
आणि
नियतीने आखलेल्या रेषेपुढे मला पुढे व्हायचं नाही. मला माझ्या मर्यादा ठाऊक आहेत.
त्या पुढे मी होणार नाही.
पण
तरीही , मनातलं सांगायला कुठं काय आड आलंय. बोलू शकतो ना आपण, मोकळं होऊ शकतो ना
आपण? आणि बोलतोच आहोत तिच्याशी , नित्य नेहमीप्रमाणे आजही , बघ ना ? हि मैत्रीचं
तेवढी घट्ट आहे. हे नातंच तेवढं अनमोल आहे. पण एवढं असूनही अधोरेखित केलेले भाव आज
ओठाशी काही येत नाही येत . . त्यानेच अस्वस्थता वाढलेय . हुरहूर वाढलेय .
शेवटी
कसेबसे स्वतःला सांभाळून आणि उतू जणाऱ्या भावनांना आत दडवून , त्याने तिला
व्हाट्सअप केलं .
चल
उशीर झालाय . झोपायची वेळ झाली. आपण उद्या बोलू .
ओके
, ठीकाय...
हं..
गुड
नाईट ..
गुड
नाईट ...
आय
लव्ह यू....
क्षण
सेकंदभर त्याचे डोळे पाणावले गेले. श्वास खुलला गेला .
अवघ्या
काही क्षणातच तिच्या आलेल्या ह्या शब्दसागराने त्याच मन लाटांगात झालं . नेमकं
मनातलं बोलून ती मोकळी झाली . हेच तर हवं होतं. त्यानेच तर हुरहुरलो होतो . तेच तर
बोलायचं होतं. पण तीच बोलून मोकळी झाली.
आय
लव्ह यु टू डिअर ... आय लव्ह यु टू...
कधी
कधी न बोलताच समोरच्याला आपल्या मनातलं कळून जातं. मनालाच मनाचे संकेत मिळून
जातात. आणि मन आभाळ होवूं जातं . तेंव्हा मिळणार आनंद हा कैक पटीनं वेगळा असतो ,
भारलेला उत्साहलेला असतो आणि त्यातून मिळणारा समाधान हि ....वेगळाच असा , है ना
?
-
सहजच भाव पंक्तीतून उमटलेलं
संकेत
पाटेकर
२८.०५.२०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .