रविवार, २१ जुलै, २०२४

गुरू ब्रह्मा गुरू विष्णु गुरु देवो महेश्वरा

 

गुरू ब्रह्मा गुरू विष्णु,

गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म,

तस्मै श्री गुरुवे नम: |

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!



शुक्रवार, १२ जुलै, २०२४

Prachin Konkan Ganpatipule | प्राचीन कोकण संग्रहालय गणपतीपुळे | रत्नागिरी

 रत्नागिरीतल्या, गणपतीपुळे पासून एखाद किलोमीटर वर मॅजिक गार्डन आहे. त्याच्या पुढे, अवघ्या काही पावलांवर "प्राचीन कोकण" हे संग्रहालय आहे .तिथे एक काळाची गुहा आहे, जी आपल्याला थेट 500 वर्षा पूर्वीच्या, कोकणी जीवनशैलीचं दर्शन घडवून आणते.

निसर्गाच्या सानिध्यात , तिथल्या गाईड सोबत असलेली, तासाभराची ही फेरी, तेंव्हाची ग्रामसंस्कृती ,खाद्य संस्कृती आणि तेंव्हा अस्तित्वात असलेली बारा बलुतेदारं पद्धत, ह्याची माहिती उलगडून देते. याचबरोबर आपल्या जन्म नक्षत्रानुसार असलेली, आराध्य वृक्षाची नक्षत्र बाग इथे पाहावायस मिळते. तिकीट : ५० रुपये - प्रति व्यक्ती फोटो व्हिडिओग्राफी - ५० रुपये Instagram | @patekar.sanlet




शुक्रवार, ५ जुलै, २०२४

सफर कोकणातली, किल्ले पूर्णगडाची | निसर्गसंप्पन कोकण आणि पूर्णगड | Purngad Fort

 सफर कोकणातली, किल्ले पूर्णगडाची | निसर्गसंप्पन कोकण आणि पूर्णगड | Purngad Fort

निसर्गाचं वरदहस्त लाभलेली भूमी म्हणजे कोकण..

एखाद्या जाणत्या चित्रकारणे त्याच्या अचाट कल्पक दृष्टीने सृष्टीची नाना विविध, अलंकारीत रूपं, कागदाच्या पटलांवार अलगद  उतरवांवी आणि त्यात स्वतः हरखून निघावं  , तशी ही स्वर्गीय अनुभूती देणारीं भूमी म्हणजे कोकण..


आंबे काजू, केळी आणि सुपारिंच्या बागांनी बहरलेला हा कोकण...

भगवान परशुरामांची भूमी, देवभूमी कोकण..


चला तर मग आज सैर करूयात,निसर्गसंपन्न कोकणाची , कोकणातल्या एका बेलाग किल्ल्याची...पूर्णगडाची..