जीवन एक प्रवास आहे ...सुख दु:खाचा, गोड कटू आठवणींचा , प्रेमाचा अन संघर्षाचा.. अन अशा ह्या प्रवासात कितीतरी बरे - वाईट अनुभव आपणास येतात. ह्या अनुभवानेच आपण शिकतो. घडतो. अन आपल्या पुढील जीवनाची वाटचाल सुरु ठेवतो. माझ्या आयुष्यातले असेच काही क्षण मी तुमच्यापुढे मांडत आहे. जे मी अनुभवलेत, माझ्या शब्दात ..माझे जीवनानुभव ..! - संकेत पाटेकर
गुरुवार, १७ मे, २०१२
व्हेलेनटाईन डे...प्रेमाचा दिवस ..
मित्रहो ,
आज व्हेलेनटाईन डे...प्रेमाचा दिवस
प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस ......मनातल्या भावना बोलून दाखवायचा हा दिवस !!
खर तर हा दिवस फक्त प्रियकर आणि प्रेयसी साठीच मर्यादित नाही आहे.
आपण आपल्या आई- बाबांना , बहिण - भाऊ , आजी-आजोबा ह्यांना देखील आपल्या मनात त्यांच्या विषयी किती प्रेम आहे ते दाखवून देऊ शकता ...मग ते एखादा गिफ्ट वगैरे देऊन असेल ...किंवा अन्य कोणत्याही प्रकारे असेल .
प्रेम हे जीवन आहे. जीवनातला एक अतिमहत्वाचा भाग.
ते कोणाला मिळत तर कोणाला नाही. ज्याना प्रेम मिळत ...ते खरच भाग्याशील ...!!
जे प्रेमावाचून वंचित राहतात ..........
जीवनात कितीही आपण उंच भरारी घेतली तरी ...माणूस प्रेमावाचून सुखी नाही राहू शकत .
जीवन जगण्यासाठी प्रेम हे हव ....मग ते बहिण - भावाच असो , आई- वडलांच असो , आजी - आजोबांच असो , मित्र - मैत्रिणीच असो , कोणतेही असो .....
मित्रहो ,
प्रेमाने रहा , प्रेमाने जगा , प्रेम द्या, प्रेम घ्या ........
''खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे'' ........अस आपल्या साने गुरुजींनी म्हटलेलेच आहे.
संकेत य पाटेकर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
सर्वच नाती काही रक्ताची नसतात . काही नाती मनानं जुळली जातात . आयुष्याच्या पायवाटेवर निवांतपणे कधी धावत पळत असता... त्यात बहिण भावाच्या ...
-
तुझ्यावरच्या चारोळ्या ..... आयुष्यात एकदा तरी आपण प्रेमात पडतो. अन आपले भान सर्वस्वी त्या व्यक्तीपुढे हरपून बसतो... नवी ओळख असते नवं न...
-
खूप काही लिहूस वाटतंय आज ? कारण हे मनं , फारच अस्वस्थ झालंय . हळवं झालंय ते , 'कारण 'संवाद' हरवला आहे'. बंध नात्यातला ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .