गुरुवार, १७ मे, २०१२

'आयुष्य'' हि सर्वात मोठी आणि सर्वात अवघड अशी परीक्षा ..

'आयुष्य'' म्हणजे सर्वात मोठी आणि सर्वात अवघड अशी परीक्षा आहे .
इथे वार्षिक किंवा सामाहिक परीक्षा होत नाही . इथे क्षणा क्षणाला परीक्षा द्यावी लागते. इथे कोणतेही क्लासेस नसतात.
वेळ आणि परिस्थिती ती आपल्याला घडवत असते . शिकवत असते . आपल्या मनाला आकार देत असते. इथे कसलीच टक्केवारी नसते . कोण पहिला कोण दुसरा नसतो .
पडलो - धडपडलो तरी स्वतःला आपण इथे सावरायचं असत. आलेल्या समस्याना - संकटांना तोंड देण्याची मनाची तयारी ठेवावी लागते .
आयुष्य हे सु:ख - दु:खाने भरलेलं आहे. पण सु:ख सहजा सहजी मिळत नाही . मिळालं तरी ते क्षणभर. पण तरी सुद्धा ते मनाला किती ताज तवानं करून जातं .
- संकेत य पाटेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .