गुरुवार, १७ मे, २०१२

शब्दात खूप ताकद असते ..

शब्दात किती ताकद असते, शब्द माणसाला जीवन जगण शिकवितात. आपल्या मनावर नकळत ते कोरले जातात.
परवाचीच गोष्ट ...माझ आणि माझ्या बहिणीच फोन वर संभाषण चालू होत , सहज गमती जमतीत...गप्पा गोष्टी करत करत असताना , तिचा एक वाक्य मनावर माझ्या आपली छाप उठवून गेला.
ती मला म्हणाली "' अरे रे माझा भाऊ आळशी आहे "
काही वेळाने मी फोने ठेवला ...पण .तीच ते वाक्य मनात गरगर फिरतच होत. त्या एका वाक्याने मला भूतकाळाच्या दरवाजातून आत ढकलल......आत्तापर्यंत आपण काय केल ? आपण अजून किती मागे आहोत ? आपला आळशी पणा मध्ये आला म्हणून मी खूप मागे अजून ...जगाच्या पाठीवर , अशा अनेक विचारांनी थैमान घातल.
खरच अजून मी खूप मागे आहे..........प्रगती पथाकडे जाण्यासाठी उत्तुंग यश मिळविण्यासाठी माझ्या कडून हवी तशी मेहनत होत नाही आहे. हा आळसपणा मध्ये येतोय . "' अरे रे माझा भाऊ आळशी आहे " हे तिचे शब्द आता कानात गुंजतात ....ज्या ज्या वेळेस मी आळसपणा करतो. आणि त्या शब्दांनी ... तो आळसपणा झटकून ...पुन्हा उत्साहाने माझ ते काम करण्यास सुरवात करतो.
सांगण्याच तात्पर्य : शब्दात खूप ताकद असते , ते जीवन आपल बदलवू शकतात, अपयाशाकडून यशाकडे घेऊन जाऊ शकतात, कुणास ठाऊक कुणाचे शब्द कुणाला कसे आणि कधी ...काय काय चमत्कार घडवू शकतात. संकेत य. पाटेकर
०२.११.२०११
वेळ सायंकाळ ५.४५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .