गुरुवार, १७ मे, २०१२

जीवन एक कादंबरी आहे...

कालची संध्याकाल खूप काही शिकवून गेली. जवळील प्रिय व्यक्ती भेटली. अन आपल्या जीवनाचा कटू - गोड आठवणी सांगून गेली. आपल मन हलक करून गेली, फार फार बर वाटल तिला.. आपल्या हक्काच्या व्यक्तीकडे आपल मन मोकळ करताना.
त्या कटू आठवणीनि तिचे डोळे देखील भरून येत होते ...पण वेळीच तिने स्वताहाला सावरल. तिच्या डोळ्यातले ते तरल भाव, सच्चेपणा .एक वेगळ्या भाव विश्वात बुडवून नेत होते.
माणूस ज्यावेळेस आपल्या मनातील भावना शब्दातून प्रकट करतो, बोलतो.. त्यावेळेस त्याचे डोळे देखील बोलत असतात. माणसाच जीवनच कस एक कादंबरी आहे.
सुख: दुख, वेदना, चिंता, रहस्य्ता, हास्य, आनंद यांनी भरलेलं .
पुस्तकीय कादंबरी, कथा ,वाचायची काहीच गरज नाही , फक्त माणसाच्या अंतर्मनात डोकावून पाहावं , त्याची सुख दुख ,वेदना,चिंता समजून घ्याव्यात. तेंव्हा आपणास कळेल....प्रत्त्येकाच जीवन एक कादंबरी आहे.
त्यात रहस्य्ता आहे , प्रेम आहे, समजूददार पणा, खेळकरपणा आहे, दुख, वेदना,चिंता, आनंद सार सार आहे.
कालची संध्याकाळ बराच काही शिकवून गेली मला.. त्या माझ्या प्रिय व्यक्तीस ...उदंड आयुष्य लाभो ,तीच जीवन सुखमय होवो ,हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
संकेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .