गुरुवार, १७ मे, २०१२

काल बरेच दिवसाने एक माझ्या सर्वात जवळची व्यक्ती मला भेटली ...भरपूर बोलली ती.
नेहमी हसरा बोलका असणारा चेहरा तिचा भरपूर काही जीवनाविषयक बोलून गेला.

जीवनाविषयक एक धडा मला खरतर शिकवून गेला.. !.
किती छान बोलत होती ती , तिचे ते बोल तासान तास ऐकत राहुसे वाटत होते.!
मित्रांनो
जीवन हे एक खरच संघर्ष आहे. प्रत्त्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईल अस होत नाही.
काही गोष्टी असतात. ज्या मनातच ठेवाव्या लागतात. दुसर्यांच्या सुखासाठी ...स्वताहा हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.आपण कितीही दुखी का असोत ...अनेक अडचणी का असोत ..चेहरा हसरा असायला हवा
आपल्या तो हसरा चेहरा पाहून इतर हि असतात आनंदित राहणारे.

जाता जाता ती मला एक सांगून गेली. तुझ ते दुबळ मन strong कर .जीवनात बर्याच अशा गोष्टी असतात.
अडचणी असतात त्यांना आपल्याला सामोर जायाच असत.
त्यसाठी दुबळ मन असून चालणार नाही. मन strong असायला हव. प्रत्त्येक अडचणींना समस्यांना तोंड देता आल पाहिजे. दुबळ्या मनाचा लोक बराच फायदा घेतात....

किती छान बोलून गेली ती आज ...जीवनाविषयक एक धडा सांगून गेली ती आज ..
तिच्या जीवनातला आत्तापर्यंतचा अनुभव ती सांगून गेली आज.

खरच भाग्यवान आहे मी अशा व्यक्तींचा सहवास त्याचं प्रेम मला लाभल आहे !
 ·  ·  · 12 August 2011 at 14:14

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .