गुरुवार, १७ मे, २०१२

मित्रहो,
रोज रस्त्याने कुठे हि जाता येता ... ..स्वच्छ ..स्पष्ट घाणेरड्या अशा शिव्या ऐकुस येतात.
नकोस वाटत ते ऐकण..कान बंद करुसे वाटतात. पण बंद केले तरी ऐकू येतातच त्या शिव्या.
संस्कार हेच काय ते संस्कार आई - वडील आपल्या मुलांन देतात. ?
पूर्वी शिव्या देन म्हणजे पाप समजल जायचं. आता शिव्याच एक भाषा झाली आहे.

एक एक वाक्यात मुलांच्या ४-५ शिव्या हमखास असतातच. लहान चिंटू पिंटू मुलेही फाडफाड शिव्या देतात....शिव्यान शिवाय बोलन त्यांना जमतच नाही. इतक ते त्यांच्या अंगी भिनलंय.

मुलांवर संस्कार करताना ...आई-वडलांनी असे संस्कार करावेत कि त्या मुलांना समजल पाहिजे चांगल्या गोष्टी कोणत्या अन वाईट गोष्टी कोणत्या? कोणत्या गोष्टी समाजातून घेतल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी नाही ...!!

माणूस हा परिस्थिती नुसार घडत असतो. आजूबाजूच्या समाजाच्या वाईट चांगल्या गोष्टींचा त्याच्या मनावर परिणाम होत असतोच. पण
आई वडलांनी जर चांगले संस्कार दिले असतील. तर तो समाजातील चांगल्याच गोष्टी हिरावून घेईल.

मित्रहो,
आपल्या बोलण्यावरून वरून आपल्या स्वभावाची..आपली ओळख इतरांना होत असते.
आपल्या बोलण्यावरून इतर लोक आपल्याला ओळखत असतात.

शब्द हे आपले एखाद्या सुगंधित फुलासारखे असले पाहिजे.
वातावरण प्रफ्फुलीत चैतन्यमय करणार.
संकेत य .पाटेकर
२६.०८.२०११

Unlike ·  · Unfollow post · 26 August 2011 at 10:39

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .