शनिवार, १८ मे, २०१३

दुभंगलेली मन...


दुभंगलेली मन एकत्रित करताना ..आपल्या मनाचा हि त्यात विचार करावा लागतो . सहज जुळलेल , अन जवळीक साधलेल एखादं नातं काही काळानंतर हळूच दूर होत जात.
माणसाची मन जशी एकत्रित येतात तशीच ती दूर हि होतात. त्या मागच कारण शोधायला गेल्यास , एक मात्र कळत.
आपण त्यांच्याप्रमाणे वागत नाही , त्याचं मन राखत नाही . काही ना काही कुठेतरी त्यांच्या मनाला छेदून आपण पुढे जात असतो . ते त्यांच्या मनाला पटेनास होत .
सुरवातीला जीव लावणारी , भरभरून प्रेमाचा वर्षाव करणारी व्यक्ती पुढे मात्र काळा ओघाने आपली साधी विचारपूस करणं हि सोडून देते. तेंव्हा उगाच वाटत .
माणसाच्या मनाचा काहीच भरवंसा नाही , ते कधी हि बदलू शकत . परिस्थितीनुसार नि वेळेनुसार, त्यात बदल हा घडत राहतो . तेंव्हा आहे ते स्वीकारायचं हेच हाती रहात. तरीही मन मात्र प्रश्नाच्या अनेक गुंत्यात स्वतःला झोकून देत . आणि त्याचा त्रास काहीसा होत जातो .
काही प्रश्नांची उत्तर मिळतात ती सहज सोडवता हि येतात . पण काही प्रश्न निरुत्तरच राहतात .
मनातलं काही
संकेत पाटेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .