तिचं अस्तित्व....
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग .........
मोबाईलची रिंग वाजत होती. त्या रिंग ने, ' तिची नजर डेस्क वर असलेल्या आपल्या मोबाईल कडे वळली. आलेला कॉल हा त्याचाच आहे हे कळल्यावर , ती स्वतहा:शीच पुटपुटली- हा पुन्हा पुन्हा का कॉल करतोय ? सांगितले ना एकदा नाही जमणार म्हणून.. पुन्हा पुन्हा तोच प्रश्न ...का त्रास देतोय हा ?
डोक्यावर आपले दोन्ही हात कवटाळून ती स्वताहाच्या नशिबाला दोष देत होती .
ऑफिस मध्ये हि घरातले छोटे मोठे वाद तिला स्वस्त बसू देत न्हवते. त्यामुळे ऑफिसातल्या कामात हि लक्ष लागेनासे झालं होतं विचारांच्या साखळीत तीच मन गुरफटून जात होत.
दोन वर्ष होवून गेली लग्नाला , पण ह्या दोन वर्षात स्वतःसाठी देखील कधी वेळ मिळाला नाही , मानसिक सुख म्हणावं तर नाहीच. त्यात धावपळ ..हा आजारपण कंटाळले मी ह्या जीवनाला..
नकोस वाटतंय आता ....काहीच...
का कुणास ठाऊक लग्न केलं.
खंर तर लग्न लग्न करायचं अस मनात सुद्धा न्हवत, पण मुलीची जात ना, न करून कस चालेल ?
लग्न केलेच पाहिजे,अडकले ह्या बेडीत ..तुरुंगवास नुसता .
जवळच्याच एका मित्र परिवारातील एकाने मागणी घातली होती.
एका कार्यक्रम दरम्यान त्याने मला पाहिलं होत. तितकंच, ' त्याला मी आवडले , तिथपासून भेटीसाठी काही ना काही निमित्त साधून तो आवर्जून येत असे , भेटत असे .
मला तो पसंद होता असे मूळीच न्हवतं .
खंर तर लग्न हा विषयच मला नको हवा होता . मुलगी असून सुद्धा एक मुलगा म्हणून मला माझ्या आई - बाबांच्या सोबत रहायचं होत कायमच . त्यांच्या सेवेत हे जीवन व्यतीत करायचं होत .
आम्हां पाच बहिणींना इतके वर्ष त्यांनी काबाड कष्ट करून ,जीवाचं रान करून आम्हाला शिकून सावरून लहानाचं मोठ केलं, चांगले संस्कार दिले.आणि आता त्यांच्या ओसरत्या वयात अशा आजरपणात मी त्यांना सोडून दुसर्यांच्या घरी जावू ? असे विचार मला नेहमीच गुरफटून ठेवायचे.
मला हे योग्य वाटत न्हवत . पण वाटून न वाटून उपयोग तो काय ?
मी एक मुलगी , आणि मुलींच्या वाटेला हे यायचंच.
कितीसा काळ असतो तो , आई बाबांस सोबत घालवलेला , भुर्रकन उडून देखील जातो. कधी, कसे लहानसे मोठे होतो हे हि कळत नाही. आई -बाबांचा प्रेम , आपल्या बद्दलची त्यांची काळजी , त्याचे प्रेमळ शब्दगुच्छ . त्यांचा मम्त्वेचा स्पर्श ............त्याचा सहवास............. सगळ कस ..........
तेवढ्यात पुन्हा फोन खणाणतो :- ट्रिंग ट्रिंग ट्रिंग
त्या रिंग ने त्या विचारांची संपूर्ण घडीच कोसळते, ती त्या तंद्रीतून बाहेर पडते .
डेस्क वर ठेवलेल्या मोबाईल कडे तिचं लक्ष जात .
पुन्हा त्याचाच कॉल ...क्षणभर ती काहीसा विचार करते ...आणि तो कॉल रिसीव्ह करते .
HELLO HELLO.... बोल ....
-------------------------------------------------------------------------------------------------------------
मनाचा अस्वस्थपणा माणसाला कधी स्वस्थ बसू देत नाही .
त्याच्याशी बोलण झाल्यावर ती पुन्हा तिच्या ऑफिस च्या कामाला लागली.
मनात मात्र तो विषय चघलतच होता. पण तरी हि दिलेलं काम तिला सायंकाळ पर्यंत पूर्ण करायचंच होत. त्यासाठी तो विषय तिने सध्या तरी डोक्यातून बाजूला सारायचे ठरवलं . नि पटपट दिलेल्या कामास जुंपली .
सायंकाळचे ७:०० वाजले होते . दिलेलं काम वेळेत पूर्ण करून ती ऑफिस मधून निघू लागली .
तेवढ्यात मोबाईलची रिंग लागली . त्याचाच call होता , तिने रिसीव्ह केला.\
Hello बोल ..
अ .. मी आता निघतोय ऑफिस मधून , लवकर ये , वेळेत ? त्याने फार काही न बोलता फोन ठेवून हि दिला.
मनातल्या अस्वस्थेचे भावनिक चित्र आता तिच्या चेहऱ्यावर उमटू लागले होते. सकाळपासून त्याचे किती कॉल , दुपारचा तो एक कॉल वगळता मी एकही कॉल त्याचा रिसीव्ह केला न्हवता.
बाहेर जायचं म्हणतोय ? मनाशीच काहीतरी पुटपुटल्यासारख तिन केल . त्याला मी कालच म्हणाले होते, मी उद्या आई कडे जाणार आहे . तरी हि बाहेर जायचं आहे , बाहेर जायचं आहे ? कुठे जाणार आहे ते हि धड सांगत नाही .
कित्येक दिवस झाले आईकडे जाईन म्हणते, पण हल्ली वेळ मिळतोय कुठे ? सकाळी लवकर उठून सर्वांच्या आवडी निवडीचा विचार करून केलेला डबा घेऊन, बाकी इतर गोष्टी पटापटा आटपून धावत पळतच ऑफिस गाठायचं आणि संध्याकाळी उशिरा पुन्हा घरी गेल्यावर पुन्हा त्यातच जुपायचं , धुणी भांडी , कपडे , जेवण करता करताच घड्याळाचे काटे कधी १२ वर स्थिरावतात तेच कळत नाही . रात्री उशिरा झोपायचं नि पहाटे पुनः लवकर उठायचं . हेच नित्य क्रम ठरलेलं...
स्वतःच्या आवडी निवडी पूर्ण करायला ,स्वतःच स्वास्थ्य जपायला इथे सवड नाही. तिथे इतरांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा मी काय पूर्ण करणार ? म्हणूनच आता मी इतर बंधन, नाती गोती ह्या पासून दूरच राहायचं ठरवल आहे. बस्स सध्या तरी काही नकोच .....
ऑफिस मधून ती केव्हाच बाहेर पडली होती ...रस्त्याने चालता चालता हि तिच्या विचारांची गती काही कमी होत न्हवती. विचारांच्या ह्या सोबतीमुळे कधी ती त्या स्थळी पोहोचली ते तिलाच कळल नाही. तेवढ्यात समोरच उभ्या असलेल्या आपल्या नवऱ्या कडे तिचं लक्ष गेल. दोघांची नजर भेट झाली. ती काही बोलली नाही. तो मात्र लगेच बाईक ला किक मारून तयारीत राहिला. ती बाईक वर आसनस्थ झाली. आणि बाईक आणि ते दोघे असा प्रवास सुरु झाला .
------------------------------------------------------------------------------------------------------------
ठरवून सुद्धा काही गोष्टी मना सारख्या होत नाही .तेंव्हा खरच खूप मनस्ताप होतो .केली गेलेली सर्व तयारी, मेहनत त्या क्षणी तरी वाया जाते . आज हे करावं अस मनी ठरवावं , आणि त्याच्या नेमकच उलट विपरीत अस काही घडावं , दुसरं काहीतरी काम निघावं , असच काहीतरी घडतं राहत .
ह्या नियतीचा खेळ देखील अजब असतो आणि ती हा खेळ खेळण्यास नेहमीच तत्पर असते. कधी कुठे , कसे फासे टाकावे, ते तिला चांगलच ठाऊक असतं अन त्यातूनच ती आपल्या प्रसंगी मनाचा वेध घेत असते.
स्वतःला आपण ह्या कडवट जीवन खेळी मधून कसे सावरतो ह्याकडेच तीच कटाक्षान लक्ष लागलेलं असत. आणि त्यावरूनच ती त्या व्यक्तीच्या सहनशिलतेचा,तिच्या जिद्दीचा , तिच्या प्रसंगी मनाचा वेध घेत राहते.
रात्रीचे २ वाजून गेले होते. तीनच्या च्या आसपास तास काटा हळू हळू आगेकूच करत होता. तरी हि तिचं मन काही स्वस्थ बसेना , मनाची तगमग चालूच होती. झोप काही लागत न्हवती. रात्री उशिरा घरी परतल्यावर , सासू आणि तिच्या मध्ये पुन्हा एकदा वाद झाला होता . नेहमीच होतो , होत राहतो , शुल्लक-शुल्लक कारणावरून ...
पण आज वादाचा अवाका जरा जास्तच मोठा होता. आणि त्या विचारांनीच तिला पछाडून सोडले होते .
रात्रभर मनाची ती तळमळ , ते असंख्य विचार , तिला झोप काही लागलीच न्हवती , सकाळी पुनः लवकर उठून सर्व काही आवरता घेत ती पुनः कामावर निघू लागली . मनात एक निश्चय करून ...आज नक्की घरी जाईन .........आई कडे .
------------------------------------------------------------------------------------------------------------
इमारतीतले एक एक मजले - एक एक पायऱ्या सप सप चढत ती दारी - वऱ्हांड्यात पोहोचली. दार अर्ध उघडंच होत .थोड आत सारलं ..
Hiii ...मम्मा ..
कशी आहेस ग ? घरात पाऊल टाकताच क्षणी , आईला पाहून ती म्हणाली. मी बरी आहे, ये बैस
माझं काय, आहे रोजचंच , काढतेय दिवस आपला ..आजार काय पिच्छा सोडत नाही. कामं हि हल्ली होत नाही पण तरी हि करते , करत असते बसायची सवय नाही ना , काही ना काही करत राहील कि बर वाटत बघ ..
प्यायला पाणी आणू ...? तिला पाहून त्या म्हणाल्या. नको , थांब मी घेते , आईला उगाच त्रास नको म्हणून ती स्वतः उठून स्वयंपाक गृहात जाते. अन थोड्या वेळेत पुन्हा आई शेजारी येउन बसते .
बोल , काय चाललंय ? कानावर आल्यात काही गोष्टी माझ्या ? एकवार तिच्याकडे पाहत अन पुन्हा हातातले काम करत , त्या तिला म्हणाल्या .
मम्मा , कंटालळे ग ..
का लग्न केलंत माझं ? काय बिघडल असत का ?
आईनी तिच्याकडे एकवार पाहिलं, ती कुठल्याश्या विचारात मग्न होती अन भरभर बोलत होती.
एक क्षण हि आराम नाही ग , मानसिक शांतता नाही ....... कांटाळले ग मम्मा , खरच खूप कंटालळे , मनातल्या भावनांना ती एक मोकळी वाट करून देत होती. ..
आई हि एकमेव अशी छाया असते , जी आपल्या मुलांच्या सुख दुखाच्या प्रत्येक क्षणी सोबत करते .
आपल्याला समजून घेण्यापासून ते आपल्याला समज देण्यापर्यंत ती नेहमीच पुढाकार घेत असते . त्यामुळे निशंक पणाने आईकडे मन हलकं करतां येत .
ती हि आपल मन हलक करत होती.... मनातल बोलत होती . आई मात्र तिच्या बोलण्याने धीर गंभीर होत होत्या , त्यांच्या मन आता त्यांना स्वस्थ बसू देत न्हवत ,
लाडीगोडीने, प्रेमाने , वाढवलेल्या, आपल्या ह्या मुलीच्या वाटेला काय आलाय हे ,ह्या हे विचारांनी , तिच्या काळजीने ते कष्टी होत होत्या .
इतके चांगले एक एक स्थळ येत होती पण तिने ते नाकारली , म्हणायची , मला लग्नच नाही करायचं , मला तुमच्या सोबतच राहायचं आहे . हट्टी नि तापट स्वभाव थोडा , घेतला रोष ओढवून सर्वांचा , बरेच दिवस तिच्याशी कुणी काही बोलत न्हवते , पण काही एक महिन्यानंतर कशी बशी राजी झाली स्वताहून लग्नासाठी .., पण लग्ना साठी तिने जो वर वरला तो काय विचार करून देव जाणे , सुरवातीचे लग्ना नंतरचे काही दिवस आनंदित होते, पण पुढे मात्र जस जसे दिवस पुढे जावू लागले , तस तसे आनंद तिच्या जीवनातून विरघळू लागला . त्याच अस्तित्वच जणू नाहीस झालं.
रोज रोज घरात वाद वाढू लागले . त्यात एकदा त्याने (तिच्या नवरयाने )तिच्यावर हात हि उचलला होता. आजवर आम्ही कधी आमच्या मुलीवर हात उगारला नाही . पण त्याने कहरच केला . कधी तिला घर सोडून जा म्हणून सांगतो , तर कधी काय तर कधी काय ..........कस होणार ह्या पोरीच .
आपल्या आईच्या चेहरयावरील प्रश्नार्थी काळजीयुक्त भाव पाहून क्षणभर ती थांबली , आपल बोलन तीन थांबवलं .
थोडावेळ ती तशीच शांत राहिली . अन एकाकी बाजूला ठेवलेली पर्स आपल्या हाती घेतली . नि येते ग आई , अस म्हणून निघू लागली .
अग थांब , काहीतरी खाऊन जा ? चपाती भाजी ? चहा ठेवते ......
नको आई , घरी जेवण बनवायच आहे अजून ..बरीच कामे आहेत , निघायला हव . अस म्हणत , आईचा चरण स्पर्श करून , आशीर्वाद घेऊन ती निघू लागली ......भरभर भरभर.. घराचा व्हरांडा ओलांडत ...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
सहवास हा काही क्षणाचाहि का असेना ...पण तो नेहमीच हवासा वाटतो.
जर ती व्यक्ती आपली जिवाभावाची - जिवलग असेल तर ,त्यांच्या सहवासात घालावंलेले , त्यांच्या सहवासातले ते काही क्षण हि मनाला उत्तुंग आनंद देऊन जातात खरच ...
आज किती दिवसाने आईला भेटले ..खरच खूप बर वाटलं. मनाला ताजेपणाचा स्पर्शच झाला जणू ! असे हे क्षण सोडले तर बाकी मात्र मनाला पार खचून टाकतात. अगदी गुदमरून टाकतात हे क्षण ..
आईकडून ती थेट.... घरी निघून आली होती . माहेर नि सासर काही हाकेच्या अंतरावरच .अवघ्या १०-१५ मिनिटाचं पण तरीही आईकडे जाण्यचा योग हा क़्वचित कधी येतो .असो आपल्या नशिबीच हे लिहल आहे. काय करणार , स्वतःच्या मनाशी कुजबूज करत, चालत चालत ती कधी घरा शेजारी पोहचली . ते तिलाच कळल नाही.
गेट शेजारीच सासूबाई कुणाशीतरी फोन वर बोलत उभ्या होत्या .त्यांना पाहून तीचि पाउलं जरा अडखळली . पण काही न बोलता पाउलं पुढे टाकत ती तशीच आत शिरली .
घरात आल्यावर मात्र नेहमी प्रमाणे कामाचा ढीग पसरला होता. भांडी - कपडे होतेच , पुन्हा त्यात जेवण हि , ते हि नवऱ्याच्या आणि सासूच्या आवडी निवडी नुसार बनवायचं .
मी हि घरात आहे , माझ्या हि काही आवडी निवडी आहेत . मला काही हवंय नकोय ह्याच मात्र कुणाला देण घेण नाही . सून हि आपल्या मुलीसारखीच असते . आपल घरदार सोडून सासरी येताना ,सासरी तिला स्वतंत्रपणे वावरायला , मुक्तपणे बोलायला घरातली मंडळी तशी स्वतंत्र मनाची हवी असतात . समजून घेणारी - समजावून सांगणारी हवी असतात .
पण माझ्या नशिबी कुठे आलंय ते ....
- क्रमश :-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .