बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१३

नातं - हृदय अन मनाचं

शांत हो , शांत हो मना..
किती त्रास करून घेशील रे,  स्वतःला ?
 शांत हो, का ओढावून घेतोयस स्वतःला ह्या विशाल दु:ख सागरात ?
जिथे आनंदाचा एक थेंब हि मिळणे कदापि शक्य नाही .
 जिथे हास्याची तरल भावना हि कधीच लहरत नाही . का करून घेतोयस त्रास असा ?
का अशा अपेक्षांचं भार स्वतःवर ओढावून घेतोयस हे ठाऊक असूनही कि त्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. ?
का इतकं प्रेम करतोयस त्या व्यक्तींवर जिथे आपल्या असण्याला, जिथे आपल्या शब्दाला हि मुळीच किंमत नाही ?
का अस करतोयस ?
का अस वागतोयस ?
का असा धडपडतोयस ?
जीवन अवघं काही क्षणाचचं आहे रे ,   कधी कोण जाणे ह्या मृत्यूशी गाठ भेट घडेल .
त्यामुळे जे आहे त्यातचं समाधानी व्हायला शिक., थोडं आनंदात जगायला शिक .,
मोकळेपणे हसायला शिक.,दुखात हि आनंदाची कला जोपायला शिक., स्वतःच दुख लपवून दुसर्यांच्या आनंद बनायला शिक .
ऐकतोयस ना ? मी जे काही बोलतोय ते ऐकतोयस ना?
हृदय अगदी तळमळीने मनास समजावून पाहत होता. शेवटी दोघांमध्ये हि घट्ट मैत्रीच नात जे होतं. जीवापाड प्रेम होतं.
कित्येक दिवस झाले . हास्याचा लवलेश हि त्याने मनाशी फिरकताना पाहिला न्हवता .
एकांतात शांत बसून तो कित्येक तास स्वतःच्याच प्रश्नाची उत्तर शोधू पाहे .
पण उत्तर मिळूनही त्याच समाधान काही होत नसे. त्यामुळे सतत दु:खाच्या छायेखाली तो गुरफटत असे . त्याची हि अवस्था हृदयास पाहवत न्हवती . त्याचं अस वागण हृदयास त्रास दायक हि ठरत होतं .
त्याचा वेग कधी मंदावत तर कधी अधिक वेगाने धडधडत. एक दिवस हे सारं अनावर झालं नि हृदयाने ठरवलं आपण थोडस समजावून पाहू .
आणि त्याने सुरवात केली .
ऐकतोयस ना ? मी जे काही बोलतोय ते .. 
हो , ऐकतोय रे भावा..., सर्व काही ऐकतोय मला हे ठाऊक नाही असं नाही रे , सार काही कळतंय .
जीवन अवघ काही क्षणाचचं आहे , ठाऊक आहे.
आज  आहोत उद्या नसू हि . कोण जाणे कधी मृत्यूशी गाठ भेट घडेल , सांगता येत नाही
आनंदित जगायला हवचं यार ..
पण काही गोष्टी नीटशा कळत नाही रे . त्या विचारात मग दिवस रात्र गढून जातो .
 त्यातून बाहेर हि पडता येत नाही . किंव्हा कसं बाहेर पडावं ते हि कळत नाही .
घरा व्यक्तीरिक्त जेंव्हा आपला बाहेरील जगाशी संबंध येतो. तेंव्हा बऱ्याशच्या गोष्टींचा कळत नकळत आपल्यावर परिणाम होत असतो .
वेगवेगळ्या स्वभावाची , वेग वेगळ्या शैलीची माणसे आपल्या आयुष्याशी जोडली जातात वाटेवरल्या टप्प्या टप्प्या प्रमाणे आणि त्यातूनच मग काही अनामिक नाती निर्माण होतात , काही जिवाभावाची जिवलग प्रेमाची . मना मनाची ...
मग रक्ताची नाती नसली तरी आपण त्यात स्वतःला सर्वस्वी वाहून घेतो.
आनंद उपभोक्तो त्या क्षणांचा . त्यावेळेस वाटत देवाने आपल गाऱ्हांन ऐकलं !
आपल्याला हव ते त्यान दिलं. पण ते काही क्षणाचचं असतं अस पुढे समजतं .
कोणत्याही गोष्टीचा आनंद सदा सर्वकाळ टिकून राहत नाही रे ... तसंच काहीस दु:खाच देखील आहे .
पण शेवटी ते आठवणीतले गोजिरवाणे क्षणच आपली सोबत करतात आयुष्यभर . असो ...

प्रेमा सारखी हसरी आणि दुखी गोष्ट इतर कुठलीच नाही. 
प्रेम हेचि जीवन हे आजपर्यंत मी मानत आलो होतो . पण आता अनुभवाने शिकलोय प्रेम हे जरी जीवन मानलं तरी , जीवन म्हणजे प्रेम नाही रे . प्रेमा पलीकडे हि इतर गोष्टी आहेत . ज्यांचं मोल फार मोठ आहे .पण त्यात हि कुठे ना कुठे प्रेमाचा अंश हा दडलेला आहे हे हि तितकंच खरं आहे . .
छान ! म्हणजे अनुभवाने तुला शहाणे केले तर ; मनाचे मनातले हे अनुभवी बोल इतका वेळ शांतपणे एकूण घेतल्यावर हृदयाने हळूच स्मित हास्य केले अन बोलण्यास सुरवात केली.
'बरोबर आहे तुझं ... प्रेमाचा अंश हा सर्वत्र असतोच , कोणत्या ना कोणत्या स्वरूपांत , त्याचाशिवाय जीवनानंद तो कुठला रे'

फक्त अपेक्षांचं ओझं नको त्यात , असलं तरी त्याच भार इतकं नको घेऊ कि हे जीवनक्षण भकास वाटेल. दुखांनी व्यापलेलं .
आनंद तसा सर्वत्र ओसंडून वाहतच असतो रे...तू पहिलस तर..
पण तशी दृष्टी हवी पाहण्याची आणि तुझ्या वेळीच वळणाची .
तसं अडकून कुठेच राहायचं नसतं . नेहमी मार्ग शोधायचा तो आनंदाचा , हर्षाचा ..., मोकळ्या श्वासेचा , प्रकाशित जीवनाचा . बरोबर ना ? मना हो रे भावा..
दुसर्यांनसाठी जरुरू जगावं , पण त्या आधी स्वत:हा जगायला शिकावं . आनंद घ्यायला शिकावं . आनंद द्यायला शिकावं .
ह्यास जीवन ऐसे नावं !
नातं - हृदय अन मनाचं
संकेत पाटेकर
११.१०.२०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .