जीवनात हर एक स्वभावाची माणसे भेटतात.
प्रत्येक पाउल वाटेवरती एक ना एक नाती जुळतात .
प्रत्येकाचा स्वभाव तसा वेगळा , प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी.
प्रत्येकाशी आपलं मन जुळेलच अस होत नाही . तरीही प्रत्येकाला हृदयी सामावून घ्याव लागतं .
कुठेतरी तडजोड करावी लागते .मनास समजून घ्याव लागतं.
भावनांना हि कधी आवर घालावं लागत .कारण माणसं महत्वाची असतात . नाती महत्वाची असतात .हर एक क्षण महत्वाचा असतो .
जीवन अशा हर एक व्यक्तींनी , ज्या त्या नात्यांनी गुंफल आहे . ते शोभिवंत आपल्याला करावं लागत. वेळोवेळी त्याची काळजी घेऊन , ' तरच त्यातल नव तारुण्य कायम राहतं.
कोण गरीब कोण श्रीमंत, कोण छोटा कोण मोठा ह्याच्याशी काही देण घेण नसत .
प्रेमाचा एक चतकोर हि आनंदाचा अंकुर फुलण्यास पुरेसा असतो.
प्रत्येकाशी आपला स्वभाव आपले विचार जुळतीलच अस नाही . तरीही वेळोवेळी प्रत्येकाशी त्यांच्या स्वभावानुसार, त्यांच्या विचारसरणीनुसार आपल्याला त्यात समरस व्हाव लागत .
हे मानवी स्वभाव वेगवेगळे रंगच आहेत जणू .. प्रत्येक रंगाच अस एक खास वेगळेपण असत .
तरीही त्यातल्या त्यात सफेद रंगाच एक खास वैशिष्ट्य आहे .तो कोणत्याही रंगात मिसळता येतो .
आणि कोणत्याही रंगात मिसळताना तो त्याच मूळ रूप मिटवत नाही तर त्यात त्यात तो अगदी सामावून जातो त्यांना हव तस. ...!!
स्वभाव हा असा हवा ''सफेद'' रंगासारखा ..
सर्वात मिसळता येणारा , त्यात समरस होणारा .
संकेत य पाटेकर
मनातले काही ..
१३.११.२०१३
खूपच छान
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद ...!!
उत्तर द्याहटवावेळेत वेळ काढून ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल अन प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल ... :)