गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१३

एक '' क्षण '' हसरा अन .... !!


आज २१ नोवेंबर , हि तारीख मी कधी विसरणार नाही.
एकीकडे त्या मांगल्य ' क्षणाचा' आनंद तर दुसरीकडे आपल्यापासून ती '' काही महिन्यांपासून योगायोगाने भेट घडलेली अन पुढे हळुवार प्रेमाचा परिश स्पर्श करून मायेने आपलंस करणारी, गोड शब्दांनी ' क्षणांनाही ' अन मनालाही हि फुलवणारी , ती खास जिवलग व्यक्ती आपल्यापासून आता दुरावणार हि भावना मनाला स्वस्थ बसू देत न्हवती . त्यामुळे डोळे हि अशा जड अंतकरणाने भरून आले होते. 
हे नातंच तसं होतं नि आहे . 
एका अनमोल रत्नाच बहिण - भावाचं.
जी गोष्ट आपल्या जवळ नसते . त्याची किंमत माणसाला कळून येतेच . अन त्याच महत्व हि तो जाणून असतो . मग ती वस्तू असो वा व्यक्ती वा तीच प्रेम अन सहवास ते मिळविण्यासाठी तो सतत धडपडत राहतो.
माझ्या बाबतीत हि असचं होत . लहानपणापासून एक आपली हक्काची बहिण असावी अस नेहमी वाटायचं. तिच्यासोबत लाडी बोलीन भांडाव , खेळ - मस्तीत दोघांनी हि रमावं. रक्षाबंधन , भाऊबीज ला तिने मनोभावे ओवाळाव अस मनापासून वाटायचं . पण नुसतं वाटून काय उपयोग .
 योग्य वेळी योग्य तेच द्यायचं हा त्या उपरवाल्याचा शिरस्ता.
त्यामुळे सख्खी बहिण जरी नसली तरी , योगा योगाने तो दिवस जवळ आलाच नि भेट घडून दिली त्याने एका मनमिळावू प्रेमळ बहिणीशी . मनाची शांती झाली . कारण हवी तशी बहिण मिळाली .
तिच्या सहवासातला एक एक दिवस आनंदाने हर्षाने कंठू लागला . नि तोच एक दिवस '' तिचे शब्द कानी पडले '' संकु ' माझ लग्न ठरलंय''
तिचे हे वाक्य इतकं मनाला भिडलं कि डोळे आसवांनी भरून आले . भावना हि हळव्या झाल्या .
आवाज हि कापरा झाला . काय बोलाव ते सुचेना . तरीही शब्द फुटले '' तू मला विसरणार तर नाही ना ?
नाही रे अजिबात नाही !
तू माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग आहेस तुला कस मी विसरणार , समोरून उत्तर आल नि मनाला एक दिलासा मिळाला .
त्या क्षणी आनंद न्हवता असे न्हवे आनंद होताच , कारण मुलींच्या अन मुलाच्या आयुष्यातला तो एक मोठा सोनेरी क्षण , कुणाचं आयुष्याचं त्याने सोन होतं तर कुणाच्या आयुष्याचं मातीमोल . ( अर्थात ते सार एकमेकांना ते कसे समजून घेतात त्यावर अवलंबून असत.)
बहिणीच लग्न होणार होत . त्यामुळे दुरत्वेच्या त्या भावनेने माझ मन मात्र थोडं दुखावलं गेल होत .
 काही दिवसांपूर्वीच तिची भेट घडावी अन एक दोन दिवस तिच्या सहवासात जाताच तोच तीच लग्न ठराव . काय म्हणावं ह्याला ....!
कसं नशीब असत एकेकाचं..न्हाई ! काही गोष्टी मिळतात ते हि क्षणासाठी क्षणभराचा आनंद फक्त , क्षणभराचा सहवास नि प्रेम ....पण तोच पुरतो आयुष्यभर ..!
लग्न हे मुलींच्या आयुष्यातला तसा दुसरा पर्व , दुसरा जन्म ! माहेरील व्यक्तींना सोडून सासरच्या नव्या घरी जाताना तिथल्या लोकांसमवेत सार काही सांभाळताना त्यांच्या मनाची सतत धडपड सुरु असते . अशातच एक एक दिवस निघून जातात . अन आपल्या लोकांनाच वेळ द्यायला त्यांज्याजवळ वेळ पुरत नाही .
लग्ना नंतर तसं एकमेव नातं उरत ते म्हणजे '' नवरा अन बायकोच '' अस माझ प्रामाणिक मत . इतर नाती हि असतातच पण लग्नाआधीचे अन लग्ना नंतरचे दिवस ह्यात फार फरक पडलेला असतो. नाती सर्व तीच असतात . पण बहरलेले ते दिवस पुन्हा येतातच असे न्हवे ...असो शेवटी प्रेम हे प्रेम असत ... त्याला मरण नसतं ते हृदयात नेहमी तेवत असतं ..!!
तुझं ह्या भावावर असलेले प्रेम असंच तेवत रहो ..सदान सदा !!
माझ्या गोड प्रेमळ बहिणीला तिच्या लग्नाच्या वाढ दिवसा बद्दल खूप सार्या हर्षित शुभेच्छा.. !! तुमचं जीवन हास्याने आनंदाच्या सुवर्ण क्षणांनी सदा उजळून निघोत ..हीच त्या परमेश्वरा जवळ प्रार्थना ..!!
संकेत उर्फ संकु ..!!
२१.११.२०१३ गुरवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .