बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१३

अमानवीय...अनाकलनीय...


काही दिवसांपूर्वी मायबोलीवरील एक लिंक वाचली होती '' अमानवीय'' भूता खोतीच्या गोष्टी ..!
मायबोलीकरांनी त्यांना आलेले वेगवेगळे अमानवी अनुभव जे अनाकलनीय होते ते त्यात लिहून काढले होते . ते वाचताना मी मात्र अगदी झपाटून गेलो होतो.
 अर्थात मला अशा गोष्टी कधी कधी वाचायला खूप आवडतात !
असो...
आज ती लिंक माझ्या पुन्हा वाचण्यात आली अन मनाने बस्स ठरवलं , आपणही लिहूया मला आलेले ते २-३ अनुभव..!
अन लिहावयास घेतले.
लहानपणा पासूनच तसं आपण भूता खोतीच्या बऱ्याच गोष्टी ऐकून असतो , आपल्या आजोबांकडून , मामाकडून आई बाबांकडून , मित्र परीवारांकडून ...
पण त्यावर आपला विश्वास असा नसतोच , पण ज्यावेळेस अशा गोष्टी आपण स्वतहा अनुभवतो तेंव्हा मात्र मनाची खात्री पटते . एक अमानवीय शक्ती जरूर असावी अस मन गृहीत धरतं  .
एक वेगळ अस विश्व असावं त्याचं . एक उद्देश असावं त्यांच्या असण्याचा :) अर्थात त्यातल एक , ' आपल्या मनात भीतीच सावट पसरवणं हे , किंव्हा एकतर झपाटून टाकणं हे होय. असो
तर काही वर्षा पूर्वी , ' साधारण ०९-१० वर्षा पूर्वीची हि गोष्ट.
 मी माझ्या आई बाबांसोबत गावी निघालो होतो. आमचं गाव तसं मुंबई पासून फारच जवळ , '' पाली'' बल्लाळेश्वर अष्टविनायक क्षेत्रापैकी एक , तिथपासून एसटी ने पाऊन एक तासात ,
आमच्या गावी पोहचता येत .
संध्याकाळची वेळ होती. खोपोली - पाली एसटी ने आम्ही खुरावला फाट्यावर उतरलो .
 पाली वरून चंदरगाव ला(आमच्या गावी )जाणारी एसटी ५ वाजता रोजच्या तिच्या दिन क्रमानुसार खुरावला फाट्यावर येणार होती . म्हणून आम्ही तिघे, मी बाबा नि आई ताटकळत उभे होतो एसटी ची वाट पाहत .
पण ५ वाजून गेले तरी, अजून एस टी चा काही पता न्हवता.
तेंव्हा मनात एक विचार मात्र येऊन गेला कि समजा एस टी नाही मिळाली , रद्द केली , किंव्हा आलीच नाही तर , तर काय ? इथेच राहायला लागणार कि काय ?
 कि अंधाऱ्या रात्री सामसूम असलेली डोंगर दरयाची निरवस्तीची वाट तुडवीत घर गाठाव लागणार ?
कारण आमच्या गावी जाण्यासाठी हि शेवटची एस टी होती .
आणि आता साधारण पावुणे सात वाजत आले होते . मावळतीचे प्रकाश किरणे हि आता धूसर होत होते.
दिवसातून तसे दोनच वेळा आमच्या गावी '' एस टी' ची चाके डांबरी रस्त्याकडून लाल मातीच्या वळणदार रस्त्यावरून लोळवन घेत इथवर फिरकतात . एक सकाळी आणि एक संध्याकाळी .
त्यामुळे जर का एकदा एस टी रद्द झाली किंव्हा निसटली वेळे आधीच, तर मात्र एक -दीड तासाची डोंगर दर्यातून मळलेली नीर वस्तीची वाट तुडवावी लागे.
एक वेळ शहर असत तर ठीक असत , कारण दिव्यांचा लखलखाट अन मानवी वर्दळ तिथे अहो रात्र हि चालूच असते . पण गावा कडच्या वाटेतून रात्री अपरात्री रानावनातून प्रवास करायचं म्हणजे एक दिव्यच , एक धाडसच जणू , जास्त करून ते शहरातल्याच लोकांना.
वाटेतून जाताना , ' एक एक चित्र - विचित्र , आकृती नजरेसमोर नाचू लागतात काय?
 वेगवेगळ्या आवाजांचा घूमघुमाट कानी येऊ लागतो काय ?
 एक अनाहक भीती मनाभोवती वावरत राहते काही वेळ . जोपर्यंत आपण त्यातून मार्गीस्थ होत नाही.
आज नेमक आमच्या , आमच्या म्हणण्या पेक्षा माझ्या वाटेला हे आलं. . आमच्या गावी जाणारी एस टी काही आली नाही . पण आमचा अमुल्य वेळ मात्र वाया गेला . त्यामुळे रात्री वस्ती ला जाणारी महागाव ह्या शेवटच्या एस टी ने आम्ही पडसारा फाट्याजवळ उतरते झालो.
मी घड्याळात डोकावून पाहिलं , तर साडे सात झाले होते . वर आकाशी पूर्णाकृती चंद्र आणि त्याचा शीतल सौम्य प्रकाश सर्वत्र पसरला होता , त्यामुळे रात्र असूनही प्रकाशाचं तेज आम्हा सोबत होत . त्यामुळे योग्य ती वाट शोधण्यात अडथळा येणार न्हवता .
तसे आम्ही तिघे असल्या कारणाने घाबरण्याचा हि प्रश्न न्हवता . इथून गावं तसं १ तासाच्या अंतरावर . त्यामुळे वेळ न दवडता पायपीट सुरु झाली. आमच्यापैकी फक्त बाबांनाच वाट माहित होती .
त्यामुळे पुढे ते नंतर मी नि मग आई . असा आमचा क्रम लागलेला .
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वत्र तसा शुक शुकाट होता . चांदण्या रात्री मुळे पायाखालची वाट दिसण्यात येत होती . 
 पण रातकिड्यांची किर्र किर्र अन वाऱ्याची लहरी झेप अंगीकानी सर्रकन स्पर्शून जायची . 
 मधेच एखाद्या झाडाची वेडीवाकडी चित्र विचित्र आकृती नजरेस पडायची. आणि भयेच शाषण मनावर लागू व्हायचं. मन स्वतःलाच सावरायचं '' भूत बित काही नसत रे '' तू चल मुकाट्याने .
अशातच आम्ही अर्धा तासाची पायपीट पूर्ण केली .
अर्ध्या वाटेवर पोहचलो अन तोच मागून एक किलकिलाट कानी आला .आणि त्या कर्कश आवजाने कानाच्या दडीच बसल्या , मन कावरं बावरं झालं.
इकड तिकड पाहू लागलं आसपास अन दूरवर हि कुणीच अन काहीच दिसत न्हवत . तो एक आक्रोश होता , लहान मुलाच्या रडण्याचा , पण फारच भयानक .........भयग्रस्त !
तो कुठून कसा येत होता ते काही कळत न्हवत. पण मनाची घाबरगुंडी तेंव्हा नक्कीच उडाली होती.
 तो आवाज हि कुणास ठावूक मलाच ऐकू येत होता . आई बाबा तर निवांत चालत होते.
 त्यामुळे ते भय मनात साठवूनच मी आई बाबांन सोबत पुढे चालू लागलो. अन पुढे एका वाड्या पाशी येउन थांबलो. गुरांचा तो एक जुनाट वाडा होता .
तो सोडल्यास तिथे झाडी झुडपान शिवाय काहीच न्हवतं . बाबा तिथे का थांबले ते कळल नाही तेंव्हा .
पण पुन्हा त्यांनी त्यांची पाउलं मागे घेतली तेंव्हा समजल कि आम्ही वाट चुकलो होतो , भलत्या ठिकाणची येउन पोहचलो . त्यामुळे मनात अजून धडकी भरली.
अजून गाव तसं नजरेस पडल न्हवत . त्यामुळे आपण आजच पोहचू ना ?अशी अवस्था झाली होती .
त्यात तो केविलवाणा आक्रोश हि अधून मधून कानी पडत होता . पिच्छा सोडत न्हवता , त्यामुळे भयाच सावट सारया अंगभर पसरल होत. कधी एकदा घरी पोहोचतोय अस झालं होतं. त्यात आम्ही वाट चुकलो होतो.
पुढे बाबांनी कुठलीशी एक वाट पकडून . झाडी झुडपातून , दगड धोंड्यातून मार्ग काढत पुढची वाटचाल सुरु ठेवली . अन असंच मजल दरमजल करत आम्ही काही वेळेत एका टेकडीवर येउन पोहचलो.
काही क्षण पाउलं तिथेच थांबली दूर वर नजर फिरली, दूरवर काही अंतरावर दिव्यांच्या हलकासा प्रकाश नजरेत भरू लागला . म्हणजेच गाव आता काही हाकेच्याच अंतरावर होत . आणि आम्ही काही वेळेतेच घर गाठणार होतो. त्यामुळे तनामनात पुन्हा शक्ती संचारली अन पाउलं पटपट करत गावच्या दिशेने सरकू लागली .................!
हा माझा पहिला अनुभव होता ...! तो '' केविलवाणा पण भयग्रस्त आवाज '' हा भास होता कि दुसर काही ते माहित नाही . पण तेंव्हा मनाची घाबरगुंडी नक्कीच वळली होती . :)
२८.११.२०१३
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
हा माझा पहिला अनुभव होता ..आता दुसर्या अनुभवाकडे कडे वळूया....
उत्सवाचे दिस होते..
घरा घरात गणपती बाप्पाचे अगदी थाटा माटात आगमन झाले होते.
उदबत्ती नि आरास अन देखण्या बाप्पाच्या प्रतिमेने एक एक घर अगदी उजळून निघाले होते .
 रात्रीच्या लुकलुकत्या काजव्यां सारखं गावं हि आता शहरातल्या आप्त मंडळींनी अन विविध रंगी प्रकाश छटांनी अगदी रंगून गेलं होतं . चैतन्याचा नवां गंध सर्वत्र दरवळू लागला होता .
 ' गणपती बाप्पा मोरया ' च्या गजरात ध्यान मग्न होवून भक्तिरसात जो तो न्हाहून निघत होता.
त्याची कृपा दृष्टी सदैव आपल्या सोबत राहावी ह्यासाठी त्याच्या चरणी जो तो माथा टेकी. नतमस्तक होई. आपलं मन हलक करी.
अन पुन्हा इतक्या दिवसाच्या भेटीने एकमेकांची खुशालकी विचारात अवांतर गप्पा गोष्टींत लहान थोर सारेच दंग राही.
ह्यातच दिवस पलटत होते. बाप्पाच्या परतीचे दिवस जवळ येऊ लागले होते. दीड दिवसाच्या बाप्पाला ' पुढच्या वर्षी असाच लवकर ये' म्हणत आनंदाश्रुने निरोप दिला जात होता.
आता वेळ होती ती पाच दिवसाच्या गणपती बाप्पाची . दीड दिवसाच्या विसर्जना नंतर एकामागाहून एक दिवस कसे पटापट निघून गेले हे लोकांना हि कळेना .
आनंदाचे हसरे क्षण कसे पटकन निघून जातात न्हाई . त्यांना थांबवता येत नाही. अन मुठीत हि ठेवता येत नाही पण आठवणीच्या गाठोड्यात त्यांना जागा मिळून जाते. कधीतरी पुन्हा एके क्षणी मुखी हास्य फुलविण्यासाठी . तर असो.
गौरीचं एव्हाना आगमन झालं होतं . पाच दिवसाचे आपले लाडके बाप्पा आपल्या घरी परतले होते.
काही अजून २ दिवस थांबू म्हणत भक्ताच्या प्रेमापोटी थांबले होते . ' मी बाबा आता आपल्या आई सोबतच परतणार अस जणू हट्टाने म्हणत .... पण काही पाहुणे मंडळीची रजा संपल्यात जमा होती.
त्यामुळे त्यांना शहरात परतन क्रमपात होत. कामावर जे पुन्हा रुजू व्ह्यायचं होतं.
रात्रीची साडेबारा एकचि वेळ डोंगर दर्यातलं निसर्गाच्या कुशीत वसलेलं आमच चिमुकलं अस गावं . रातकिड्यांच्या किर्र किर्र आवजात संगीत खेळीत मश्गुल झालं होत. गावाच्या वेशीवर गावातला सारा गोतावळा एकवटीने जमा झाला होता. पाहुणे मंडळीनां निरोप धाडायास. अजून दोन दिस थांबा , गौरी विसर्जन करूनच जा . अस कुणीतरी त्यातच आग्रहान्रे म्हणालं. पण जाणे भागच होतं.
दिवसाभरातुन दोनच वेळ इस्टी ची काय ती सेवा . सकाळ - सायंकाळ . ती हि मनधरणी प्रमाणे. आली तर आली. वरना छु .. त्यामुळे गावातलाच एक धान्याची ने आण करणारा टेम्पो आधीच पाहून ठेवला होतां . रातीच्या प्रवासासाठी. ....
साधारण १७-१८ जनाचा आमचा चमू निघण्यास तयार झाला. सुसाट सुटणाऱ्या गाडीच्या वेगा सारखा घड्याळाचा काटा हि सुसाट सुटला होता .
गणेशाला वंदन करून , अन नारळ फोडून ..सर्वांचा निरोप घेत गाडीने हळू हळू वेग धरला अन रात्रीच्या निरव शांततेत आमचा प्रवास सुरु झाला . सुरवातीला सुरु असलेली आप आपसातली बडबड काही वेळाने शांत झाली. अन एक गूढ शुकशुकाट पसरला . घनदाट काळोख्या जंगलातून , दुर्तफा झाडीतून गाडी पुढे सरकू लागली. टेम्पोच्या अगदी शेवटच्या टोकाला मी बाहेरच काळोख दृश्य मनात साठवत होतो.
किती रहस्यमय रात्र आहे ..... एक अनोखं जग..... किती गूढ दडले असतील ह्यात.... आपल्यासाठी रात्र जरुरू आहे . पण इतर जीवांसाठी मात्र दिवस ... . मनातच एक एक विचाराला उधाण आले होते. बाहेरच जग न्ह्याहाळ न्यात जणू नजर अगदी उतावळी झाली होती.
अशातच कश्ल्याश्या आवाजाने कान टवकारु लागले. काहीतरी नजरेसमोर चमकू लागलं . नजरेसमोर ती आकृती आकार घेऊ लागली. दोन ईसम, बाईक वरती स्वार असलेले नजरेस दिसू लागले. पण कालोख्यामुळे चेहरा स्पष्ट दिसत न्हवता. जवळ जवळ रात्रीचे दोन वाजत आले होते . इतक्या अंधुक राती , घनदाट जंगलातून कोण बरे येत असणार , मनात शंकाची पाल चूकचुकली. शेवटच्या टोकाचे आम्ही २-३ सोडले तर इतर सर्व गाढ झोपी गेले होते.
नजर एकसारखी बाहेर पडे. लपाछुपीचा खेळ मांडावा तसा ते बाईक स्वार मधेच गायब होतं मधेच दिसे . त्यामुळे एक भीतीदायक वलय मनाभोवती फिरकू लागलं होतं . काहीतरी अघटीत होईल ह्याची चाहूल मनाला लागू लागली. तरीही धीटपणाने मन स्वतःशीच पाठ थोपू लागला. अन गाडी त्याच वेगात पुढे मार्गीक्रमण करू लागली. घनदाट काळोख्या जंगलाचा मार्ग आता मागे राहिला होता. रस्त्याच्या कडे कडे ने उभ्या असलेल्या मोठ मोठ्या कारखान्याच्या दिशेने गाडी पुढे सरकू लागली. मनातली शंकाची पाल केंव्हाच मिटली होती. रात्रीची झोप मात्र आता अनावर झाली होती . त्यामुळे डुलक्या येऊ लागल्या. तन-मन पेंगू लागलं . अन तेवढ्यात धाड ssss म असा आवाज झाला. एकंच किलकिलाट सुरु झाला .
क्षणभरातच गाडीने पलटी घेतली . गाडीच्या एका बाजूला असलेले सारे दुसर्या बाजूकडे फेकले गेले. एकमेकांवर आदळले गेले. ... टेम्पो मध्ये ठेवण्यात आलेला एक भला मोठा टायर हि खालच्या दिशेने फेकला गेला. त्याच्या लोखंडी कडयान मात्र कुणी एक जखमी झालं . तर कुणाला मुका मार लागला .तर कुणी ढसा ढसा रडू लागलं. पण नशिबाने मात्र सारेच बचावले होते .
मनात चूकचूकलेली ती शंका शेवटी खरी ठरली होती. एक अघटीत घडल होतं. पण ते बाईकस्वार कोण? कुठले होते , इतक्यां रात्री ते अचानक कुठून आले अन कुठे गेले. अन मलाच का दिसत होते ,कि तो निव्वळ भास होता ? कि इतर काही ? त्याचं कोड अद्याप हि सुटलं न्ह्वत.
अमानवीय...अनाकलनीय...
- संकेत पाटेकर
०२.०९.२०१४

२ टिप्पण्या:

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .