ट्रेन मधून येता येता आज हे असे काही शब्द कानी पडले.
अन नजर त्या आवाजाच्या दिशेने त्या व्यक्तीचा शोध घेऊ लागली.
साधारण साठी च्या आसपास असणारे ते गृहस्थ , आपल्या इवल्याश्या गोड नातवाला , 'दरवाज्यात उभ्या असलेल्या एका ओळखीच्या व्यक्ती कडे देऊन , मोठ्याने त्याच नाव चार चौघात विचारात होते.
ते हि हरामखोर अस पद लावून ?
बोल रे रताळ्या..बोल ? कुठे चाललो आपण ? बोल परेल ला ? बोल ?
घाटकोपर दम्यान आपल्या नातवा सोबत ट्रेन मध्ये चढलेले ते आजी आजोबा ..त्याच ते चार चौघातल संभाषण दादर येऊ तोपर्यंत मी ऐकत होतो. ऐकण भागच होत म्हणा कान बंद तरी कसे करणार ..
ह्याचे आई बाबा खूप standard आहेत बर ..पण बापूस हरामखोर, आणि आईस पण तशीच . , अगदी मोठ्या आवजात ते गृहस्थ इतरना सांगत .
एका कोपरयात उभी असलेली ती आजी त्याचं बोलणं मात्र निमुटपणे ऐकत . एकवार त्यांच्या नजरेला नजर देत अन पुन्हा इकडे तिकडे पाहत ...अन स्वतःच्या कुठल्याश्या विचाराशी मग्न होतं.
सुरवातीला वाटलं कस सहन करत आल्या असतील ह्या बाई म्हणजे त्या आजी आपल्या नवऱ्याला. इतके दिवस इतकं वर्ष ... चार चौघात नको ते शब्द वापरून ...अगदी मोठ्याने खंबीरपणे बोलणं ...ते हि आपल्या बायको सोबत असताना . ...
क्षणभर डोळे भरून आले ..कुणास ठाऊक , काही एक ओळख नसताना ..फक्त चेहरा अन ते संवाद पाहून डोळे भरून आले. विचारत गढून गेलो काही क्षण ....पण नंतर जाणवलं.
त्यांच्या त्या नको त्या शब्दा मागे प्रेमाचा ओलावा हि होता . वर वर कठोर स्वभावाची दिसणारी माणसे हि आतून काही वेळा फणसाच्या गरया सारखी अगदी मऊ अन गोड असतात ...खरचं..!
ते इथे जाणवलं ..!
असचं लिहिता लिहिता ..
संकेत य पाटेकर
२७.१२.२०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .