अशातच नव नवीन नात्याची गुंफण मनाभोवती जुंपली जाते.
कुठल्याश्या एका क्षणी प्रेमाची गुलाबी झळ मनाला अलगद स्पर्शून जाते .
पहिल्या भेटीची पहिल्या अनामिक ओढीची ती वेळ अगदी समीप येते.
स्वप्नातली स्वप्न सुंदरी , प्रत्यक्षात सामोरी उभी राहते. अन नजरेतली लपाछुपीच्या खेळास प्रारंभ होऊ लागतो , हास्याची गोड कुपी हळूच उमलू लागते.
प्रेमाचा सुगंधित वारा हृदयातील स्पंदना सोबत हळूच झुलू लागतो . अन प्रेमाचा ज्वर अंगभर जडू लागतो .
आयुष्यात एकदा तरी आपण कुणाच्या तरी प्रेमात पडतोच .
तेंव्हा मन गाऊ लागतं , नाचू बागडू लागत , पंख नसताना हि दिशा दिशा तिच्या शोधार्थ घिरट्या घेऊ लागतं . स्वस्थता हि कुठे नसतेच तशी मनाला...
विचार हि तिचेच , भास ते हि तिचेच. स्वप्नात ती मनात ती सर्वत्र तीच अन तीच ...
प्रेम हे अस असतं वेड पीस ...
स्वतःच अस्तित्व हि विसरायला लावणारं स्वर्गाहून सुंदर...
पण ते मिळाल तर अन्यथा स्वतःच्या अस्तित्वाची पुन्हा पुन्हा जाणीव करून देणार , जीवनाची व्याख्या अनुभवाने आपल्या मनाशी ठसवून सांगणार अस हे प्रेम ....
काही वर्षापूर्वी असच एका प्रवासात तिची नि माझी भेट घडली .
अन पाह्ताच क्षणी प्रेमातं पडणं म्हणजे नक्की काय असत ते प्रत्यक्ष अनुभवलं .
तीच गोड स्मित हास्य , तिचे मधाळ शब्द , तीच हसर साजेर रूप मनावर जादू करून गेल .
एक अनामिक ओढ लागली मनास , क्षण क्षण तिच्या आठवणीत गुंफू लागले. शब्दांनाही कवितेची धार चढू लागली. अन हा हा म्हणता पहिली कविता तिच्यावर रचली गेली.
शब्द होते वेडे वाकडेच पण भावना मात्र कागदावर हळूच उमटून गेल्या .
पुढील भाग लवकरच ... :)
क्रमश :-
संकेत य पाटेकर
०३.१२.२०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .