त्यातले चेहरे बदलत नाही. चेहर्या वरचे हाव भाव बदलत नाही. त्या व्यक्ती बदलत नाही .
जे आहे ते आहे वर्षानुवर्ष तसच...बदल अजिबात नाही .
म्हणून ते पाहताना ........गेलेले क्षण पुन्हा तसेच्या तशे नजरे समोर येतात .
अन आपण त्या हसर्या आठवणीत आपलं भान हरपून घेतो. मन स्वतःशीच प्रश्नोत्तराच खेळ खेळू लागतो.
किती हसरे क्षण होते ना ते ? किती सोनेरी दिवस होते ? काश ते दिवस ते क्षण पुन्हा बहरून आले तर...
पण ह्या जर अन तर च्या गोष्टी, कारण आपण वेळेसोबत पुढे आलेलो असतो .
काल बदलला असतो. परिश्तिती बदलेली असते. व्यक्ती व्यक्ती बदलेल्या असतात. पण आठवणी ह्या अश्याच अजूनही ताज्या टवटवीत ...
मनाला प्रसन्न्तेचा लेप देत असतात.
संकेत पाटेकर
२१.०२.२०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .