जिथे गेलो होतो त्याघरी मायेचं अन प्रेमळ मनाचं पाठबळ मिळालं.
(माझ्या त्या दोन बहिणी अन मावशी )...त्यामुळे सावरलो ..काही वेळेतच ..!
आयुष्यात बरीच अशी माणसे भेटतात ...पण त्यातलीच काहीच अगदी जिवाभावाची बनतात ...
जिथे प्रेम अन मायेचं , आपलेपनाच खर खुर दर्शन घडतं. .... मी स्वतःला भाग्यवान समजतो अशी माणसं लाभलेत .
-------------------------------------------------------------------------------
ऑफिस मधून घरी परतत असता ...रस्ता ठिकाणी रोज एक व्यक्ती दिसते .
अंगावर फाटके तुटके मळके कपडे असलेली , केसांची जठा झालेली . एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला निवांत पडून असते ... त्या व्यक्तीला पाहून क्षणभर विचार मनात घोळू लागतो.
ह्या व्यक्तीला मायेचं अस कुणीच नाही , कुणी आपुलकीनं विचारणार हि नाही , कशी जगत असेल हि व्यक्ती, तेंव्हा प्रेम प्रेम करत असलेल मन , प्रेमासाठी धडपडत असलेल मन म्हणत अरे बघ तिथे त्याकडे ....
कुणीच नाही रे त्याचं.. तुझ्याशी बोलणारे , मायेन आपलंस करणारे तरी आहेत कि रे .....
-संकेत य पाटेकर
०५.०२.२०१४
मनातले काही...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .