सोमवार, ७ डिसेंबर, २०१५

मनाचे आर्जव...

ह्या मनाचे देखील किती हे ..आर्जव... 

नको नको म्हणतो , तरी देखील स्वतलाच सावरतं , विश्वास देत ते म्हणतं ..बघ रे , 
पुन्हा एकदा प्रयत्न करून ....वातावरण काहीसं निवळल असेल आता...
बरेच दिवस झाले रे....बोललो नाही. 
भेटलो नाही , कुठलाच संवाद नाही. हा नाही कि हु नाही .
निशब्दी मनाचे गहिरे अन दाह उसवणारे वारे फक्त वाह्तायेत. 
त्याचाच हा परिणाम अन होणारा त्रास ... म्हणूनच रुकरुक लागले रे, शांत राहवत नाही. 
चीड चीड होतेय नुसती मनाची ,संयम हि तुटू जातोय. तरीही स्वतःला सावरत मी पुन्हा प्रयत्न करतोय.....

नातं अन दुरावलेलं मन जर आपल्या पुढाकारानेच , पुन्हा जुळत असेल किंव्हा जुळणार असेल तर, प्रयत्न करायला काय हरकत आहे. हे ना ? 
अस स्वतःला बजावत मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो, पण किती वेळ रे , कितीदा ? मर्यादा नावाची देखील रूपरेखा असते कि नाही? 

कधी कधी खरच प्रश्न पडतो कि ज्याच्यावर जीव ओवाळाव . प्रेम करावं , ते इतके भावनाशुन्य , भावना कठोर कसे काय होतात ? 

कधी काळी आपल्याशीच मनमोकळे पणाने वावरणारी , न राहवून स्वत:हून संवाद साधणारी ,आपल्या काळजीत वेडीपीसी होणारी अन वचन बद्ध असणारी अन आपलीच म्हणून जवळ केलेली आपली हि लोकं , अशी कशी बऱ वागू शकतात ? प्रश्नावर प्रश्नांचे एक एक इमले रचले जातात . 

उत्तर मात्र असूनही नसल्यासारखं अन नकोसच वाटतं.
किती रे उरलो आपण त्यांच्या जीवनात , काय उरलेय किंम्मत आपली ? 
आणि नेमकं असं काय घडलंय इतकं कि ज्याने आपल्याला साफ दूर्लक्षिलं जातंय ? का ? 
ते नक्की कळत नाही . समोरून कोणताच प्रतिसाद मिळत नाही . 

पण आपली धडपड एकतर्फी चालू असते ... आज ना उद्या .......काहीतरी घडेलच , मनासारखं .., ह्या आशेवरच...
पण प्रयत्न करूनही पुन्हा पुन्हा मन निराशेच्या डोहात ढकलल जातं . 

अन वेदनेला नवां अंकुर फुटत जातो. हताश होवून जातो आपण .., डोळ्यावर एकाकी अंधारी यावी तसा काहीसा अंधार पसरतो .
दोष तरी कोणाला द्यावा , न्हाई ?

समोरच्याला कि स्वतःला , कि बदलेल्या ह्या परिस्थितीला , कि नशिबाला ? कळत नाही. 
तरीही आपण म्हणतो दोष नकोच ना कुणाला द्यायला . का द्यावा ?
पण कुठेतरी शेवट मात्र असतोच . पूर्णविराम द्यावा लागतो . 
जर हे असंच चालू राहील तर .....
कारण संयमाला देखील मर्यादा असतात. आपल्या उदारत्या प्रेमाला नसल्या तरी .., कारण प्रेम हे आजीवन असतं . त्याला मरण नाही. अंत नाही . संयमाच मात्र तसं नाही. त्याला हवा तो प्रतिसाद मिळाला तर तो टिकून , अन्यथा ते लुडबुड करतं...

अन शेवटी मनाला गुण गुणाय लावतं. 
अपनी अपनी जिंदगी है भाई , अपने अपने रास्ते..और अपनी अपनी मंजिले ! 
- संकेत य. पाटेकर 
०५.१२.२०१५




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .