सोमवार, ७ डिसेंबर, २०१५

आठवणींच्या भावगर्दीत ..

किती हसरे असतात एकेक 'क्षण' न्हाई ....नजरेच्या आकंठ साठलेल्या भाव सागरात अन हृदयाच्या ध्यानस्थ मंदिरात , तिच्या व त्याच्या सहवासाने गंधित झालेले ते हसरे क्षण, एकदा का प्रवेश करते झाले कि 
ते अधून मधून मनाच्या तळघरात मिश्र भावनांचा, ' एकच हळवा तवंग निर्माण करतात . 

आठवणीच्या साच्याने , ' ज्यात आपण पुरतं आपलं देहभान हरपून जातो '.
तो जुन्या आठवणीतला अत्तरी रंग , सुगंधासह असा काही उधळला जातो कि डोळ्यातून क्षणभर अश्रू हि घळाळू लागतात .
काय काय घडतं. ह्या क्षणानुसार ......

हि वेळ पुढे सरत जाते . बदलाचे वारे वाहत जातात. माणसं माणसं बदलत जातात . 
अनुभवाने सिद्ध होतात. कुणी आधीपेक्षा अधिक कठोर तर कुणी हळवी अजून हळवी झालेली असतात. 
कुणी दूर तर कुणी हृदयाशी अजूनही जवळीक साधून असतात. . 
काहींच अजूनही त्याच शैलीतलं दिलखुलास बोलण असतं भेटन असतं . काहींच्या विचारांना अहंकारी लेप चढलेली असते. किंव्हा कुणाला आता आपणंच नकोस झालेलं असतो .
सांर चित्र पालटलेलं असतं. काही मात्र अजूनही तेच पुर्वीसारख भासतं .

पण हसऱ्या क्षणांचा आठवणीचा तो ठेवा , मात्र अजुनी तसाच टवटवीत, अन प्रसन्नतेने सदा बहारलेला असतो. तो क्षणभर कवटाळून घ्यावा , किंव्हा घटाघटाने पियुनी घ्यावा अस मनोमन वाटून जातं. अन त्यातच शब्दांचा फुलोरा ओठावर स्थिरावला जातो.
किती हसरे क्षण होते ते ...जुन्या मैफलीतले ...., तो मोकळा संवाद , तो हवासा सहवास ..ती संस्मरणीय भेट ! निसटले सगळे ......, आठवणीचा गंधित दर्प लेऊन ..!

असंच काही मनात आलेलं...अन न राहून लिहिलेलं 
संकेत य पाटेकर 
०६.१२.२०१५


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .