रविवार, १७ एप्रिल, २०१६

जीवन प्रवास...


अस वाटतं हे….चौकटीतले आठ नऊ तासाचे ऑफिसचे काम धंदे सोडून ....सरळ... मुक्तवाटे ..
ह्या माझ्या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातुनी वणवण भटकत राहावे , मैलो मैलांचा वेड्या वळणाचा खडतर प्रवास साधत .. 
इथल्या लोक संस्कृतीचा लोकजीवनाचा, मानवतेचा तसेच दुखीव अश्रूंचा आणि निसर्गाच्या अलौकिक, अद्भुत सौंदर्यतेचा आणि तिथल्या हर एक घटकांचा नजरेशी आढावा घेत ...
जगाच्या कानाकोपऱ्या पर्यंत झेप घ्यावी .

सामाजिक बांधिलकी जपत हवं त्या समयी स्वतःला मानवतेशी जोडून घ्यावे.(.निर्मळतेने)
...तसेच लेखणीने एक एक अनुभव शब्दबद्ध करत रहावे .

अन त्याबरोबर कलेशी हि संधान बांधत कलागुणाशी (मग ते छायाचित्रण , अभिनय , साहित्य , वा इतर कुठल्याही कला क्षेत्र असो ..त्यांशी ) जुळवून घेत त्यात बेधुंद व्हावे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 
प्रेम अन शांतीचा अनमोल संदेश देत , आपलेपणाने एक एक नाती हृदयाशी कवटाळत , लोकांच्या हृदय मंदिरात स्थान मिळवत हा देह अलगद ह्या मातीशी ठेवून ह्या जगाचा अखेरचा निरोप घ्यावा . 
बस्स.... 
जीवन प्रवास हा असाच हवा. 
- संकेत पाटेकर 
१६.०४.२०१६


२ टिप्पण्या:

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .