ऐ ,
तू सिरीयस आहेस का ?
मग थांब
तिथे...आलो मी..
मला
तुझ्या समोर हे ऐकायचं आहे. प्रत्यक्ष ..
Then
.. Step away ..
घाटकोपर
ला मेट्रोच्या रांगेत उभे असता. माझ्याच मागे
उभ्या असलेल्या, साधारण चाळीसच्या आसपास असलेल्या... त्या व्यक्तीच हे वाक्य , कानी भरभर आदळू लागलं.
‘मला
हि त्रास होतोयं , समजलं …’
सैरभैर अवस्थेतील , रागारागाने फणफणत , फोन वरून सुरु असलेलं, त्यांचं हे असं संभाषण..सरळ सरळ कानी येत होतं.
त्याने
मनाच्या विचारांची घडी एकाकी बिघडत गेली. मी
आपल्याच विचारात असा मशगुल होतो गेलो.
‘एकमेकांच्या
सहवासात इतकी वर्ष घालावल्यांनंतर हि, वयाच्या ह्या स्टेज ला , नात्यात अशी दुंभगता यावी ? नात्यातली विश्वनीय फळी तुटावी . ह्यानेच मन
काहीसं प्रश्नार्थी होऊन गेलं . ‘
वाढत्या
वयो- मानानुसार आणि मिळालेल्या अनुभवानुसार,
आपली बौद्धिक जाण व समज अधिकाधिक दृढ
होतं जाते. असं काहीसं मी आजवर मानत आलो होतो ... पण आता ..
तितक्याच
, मेट्रो आल्याची चाहूल झाली . त्या तंद्रीतून
मी बाहेर पडलो.
घाटकोपर
ते चकाला असा पुढचा प्रवास सुरु झाला.
गर्दीने
भरलेली मेट्रो आपल्या लयीत सुरु झाली. आणि नव्यानं , नवी काही वाक्य अलगद कानी झेपावली
. ह्यावेळेस लाडीगोडीनं भरलेला असा
प्रेमळ संवाद खिदळून हसत होता.
त्याने
मन हळूवार मोहरत गेलं. किंचित आधी ऐकू आलेले
ते बोल , तो नात्यातला राग... आता धूसर होत जाऊन , प्रेमाने बाजी मारली होती .
क्षणातच
सगळं बदललेलं. भाव बदलले. जागा बदलेली आणि
ती व्यक्ती हि बदलेली .
मी पुन्हा
आपल्याच विचारात असा गर्क झालो.
मनाच्या ह्या सगळ्या भाव 'अवस्था' आहेत .
त्या त्या क्षणा- नुसार
किंव्हा घटना-क्रमानुसार , आपल्यातल्या सुप्त जाणिवांना
वास्तव्याचा स्पर्श देतं . आपल्यातला 'माणूस' आणि 'माणूसपण' दाखवून देणारया
'अवस्था'
- संकेत
पाटेकर
०६.०४.२०१७
Khup chan.
उत्तर द्याहटवाधन्यवाद ..!! :)
उत्तर द्याहटवा