रविवार, १९ एप्रिल, २०२०

क्योंकि रिश्ते सारे अब इसी में कैद हैं ..



आज कामाचा इतका काही ताण न्हवता.मोकळा असा वेळ मिळाल्याने वेळेचा सदुपयोग म्हणून काहीतरी वाचावे म्हणून प्रतिलिपी वर गेलो. तिथल्या मोजक्या अश्या कथा वाचण्यात इतका दंग झालो कि त्यातच सहा कधी झाले ते माझं मलाच कळलं नाही. 
ऑफिस मधून निघायची वेळ ती. पटापटा आवरतं घेतलं.
कॉम्पुटर बंद केला. डेक्सवरच्या फाईल्स, ड्राइंग्स जागच्या जागी ठेवल्या.
आणि अंधेरीकडे निघालो. ऑफिस ते अंधेरी स्टेशन पायी गाठलं. कालच लोकल पास संपल्याने, तिकीट काउंटर वर जाऊन ‘जोगेश्वरी ते कळवा’ असा महिन्याभराचा पास काढून घेतला आणि फलाटाकडे निघालो.
ऐन गर्दीतून मार्ग काढत पुढे सरकत होतो.
तेवेढ्यात काहीतरी राहून गेल्याचं लक्षात आलं.
पण नक्की काय ते कळत न्हवतं. म्हणून उगाच शर्टाचे खिसे चपापून पाहिले. बॅग- खण एकेक तपासून पहिले आणि लक्षात आलं.
अरेच्चा..!
आपण आपला अमूल्य ठेवा तर ऑफिस मधेच विसरून आलो. श्याsssss श्याsssss..श्याsssss..
जे ह्यापूर्वी कधी घडलं नाही ते पहिल्यांदा घडून आलं.

मुळात एकमेकांच्या सहवासाची इतकी सवय कि हे घडलं कसं ह्याच विचारात होतो. पण त्याचं कारण हि लगेच ध्यानीं आलं. आणि मनातूनच स्वतःला बडबडत राहिलो.
एव्हाना सात वाजत आले होते. पुन्हा ऑफिसला जाणे म्हणजे कसरत..
काय करावं तो निर्णय होत न्हवता. पण एकदाचा तो घेतला.

ऑफिसला तडक निघालो. पोहचता पोहचता पंचवीस एक मिनिटे निघून गेली. चालून चालून शरीर घामाने डबडबलेलं. पूर्णता घामाने निथळलो होतो.
तसाच ऑफिस मध्ये पोहचलो.
बिग बॉस अजूनही ऑफिसलाच होते.
त्यांना कळायला नको म्हणून त्यांच्या नकळत आत शिरलो.

ऑफिसात उपस्थित असलेल्या एका मित्रांला डेस्क वरचा तो जिवाभावाचा मोबाईल आणायला सांगितला. त्याने तो आणून दिला. तेंव्हा मोबाईल हाती आल्याचा किती आनंद झाला म्हणून सांगू ?
ते पाहून मित्राच्या कपाळी मात्र रेषा उमटल्या, त्याने प्रश्न केला.
काय रे, ह्या मोबाईलसाठी इतका धावत पळत आलास तो..इतक्या लांब पुन्हा..
ठेवला असता ड्रॉवर मध्ये…, एका दिवसाने काय फरक पडला असता? 

मी क्षणभर हसलो.
कधीतरी कुठेशी वाचनात आलेल्या त्या ओळी पटकन ओठी स्थिरावल्या.
खुद से ज्यादा संभालकर रखता हूं मोबाइल अपना, क्योंकि रिश्ते सारे अब इसी मै कैद है ।

माझंच मी हसलो अन चालू पडलो..
घराच्या दिशेने..
संकेत पाटेकर

 चॅनेल Subscribe करायला विसरू नका. 
''क्योंकि रिश्ते सारे अब इसी में कैद हैं .. ''
https://youtu.be/Am9KaQcr94g 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .